पुणे मेट्रोच्या एका टप्प्याचं आज उद्घाटन झालं. मेट्रो होतेय हे भारीच आहे. आनंदच आहे.. ❤️ पण ज्याचं उद्घाटन झालंय तो टप्पाही पूर्ण झालेला नाही हे आज प्रवास केला तेव्हा लक्षात आलं. कौतुकाचं अनेकांनी लिहिलं, मी उद्घाटन पुणेकरांऐवजी निवडणुकीसाठी झालंय यावर लिहितो. #thread#PuneMetro
पाच पैकी ज्या दोन स्थानकांचा वापर पंतप्रधानांनी केला तिथेच काम पूर्ण झालंय, इतर तीन स्थानकांवर अगदी जिन्यासारखी मूलभूत कामं सुद्धा अर्धवट आहेत.. फलाटावर सुरक्षेसाठी पिवळी पट्टी फक्त गरवारे स्थानकावर आखली होती, वनाझला पंतप्रधान गेले नव्हते त्यामुळे तिथे ती नव्हती (छायाचित्र ४).
पहिल्याच दिवशी वनाझ स्थानकावर आग लागल्याची सूचना आणि सायरन वाजला, उद्घोषणा झाली. परंतु नक्की ड्रिल होतं की आग लागली होती की चुकून अलार्म वाजला होता यावर तिथल्या गोंधळलेल्या नागरिकांना उपस्थित स्टाफने काहीही स्पष्टीकरण दिलं नाही, खरंच पळा की पळू नका हेही सांगितलं नाही.
वनाझ स्थानकावर तुम्ही आयडियल कॉलनी स्थानकावर आहात असा फलक जमिनीत नट बोल्टने फिट करून लावला आहे, यावरून उद्घाटनासाठी काम उरकलंय हे जाणवलं.. स्थानकात असताना पटकन बाहेरचं शहर लक्षात येत नाही, त्यामुळे दोन क्षण मीही गोंधळलो.
सरकते जिने अर्ध्या क्षमतेनेही चालू शकत नव्हते, बंद पडत होते. परतीच्या प्रवासाचं तिकीट घेतलं तर पैसे पूर्ण घेतले गेले पण तिकीट एका बाजूच्या प्रवासाचंच मिळालं. त्यावर प्रवास मात्र परतीचाही झाला म्हणजे स्थानकातून बाहेर निघताना तिकीट तपासणी यंत्राने त्याचं काम केलं नाही.
या सगळ्यात एक गोष्ट व्यवस्थित वाटली ती म्हणजे स्वतः मेट्रो गाडी, जी खचाखच गर्दीने भरलेली असून व्यवस्थित वेगात इकडून तिकडे घेऊन गेली.. प्रवास अलगद होता, झटके किंवा कर्कश आवाज वगैरे आले नाहीत.
मात्र अर्ध्या तासाने एक मेट्रो हे रोजचं असेल तर ती फ्रिक्वेन्सी/क्षमता खूपच कमी वाटली.
एकंदरीत.. पुण्याला मेट्रो हवीच आहे, खूप आधीपासून हवी आहे.. पण तुम्ही (सगळेच) अतिशय संथ गतीने काम करताय.. वेग पकडा. 🙏🏻
केवळ निवडणूक येत आहे म्हणून अर्धवट मार्गाचे अर्धवट काम झाले असताना उद्घाटन केलं, ते काही पटलं नाही. #PuneMetro#आपलीमेट्रो
असो. इथे मांडलेल्या मुद्द्याकडे लक्ष देऊन @metrorailpune योग्य त्या वेगाने योग्य ती पावले उचलेल आणि लवकरच पूर्ण मार्गावर - पूर्ण क्षमतेने चालू झालेल्या आपल्या मेट्रोचा प्रवास रोज करायला मिळेल अशी अपेक्षा.. तोपर्यंत वाट पाहू. 🙂 @metrorailpune ला शुभेच्छा!💐 #PuneMetro#आपलीमेट्रो
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मनसेवाल्यांच्या खळ्खट्याक टोलधाडीमुळे झालेल्या महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या आर्थिक नुकसानाची आकडेवारी! एक थ्रेड(पूर्ण वाचा, मोठा आहे, फोडलेच तितके टोल तर आता काय...)
#Thread
1/20
टोल मध्ये झोल आहे असं म्हणत मनसेने २०१२-१४ मध्ये टोलविरुद्ध आंदोलन छेडलं आणि त्यात अनेक ठिकाणचे टोल फोडले गेले. कालही समृद्धीवरचा एक टोल फोडला गेला. त्या ठिकाणच्या पोलीस तक्रारीत मॅनेजरने २ लाखांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. 2/20
२०१४ मध्ये जेव्हा मनसेने आंदोलन छेडले ते राज्यभर होते, ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटले. ५-६ जिल्ह्यात जोर होता पण आपण आकडेवारी आणि हिशोबासाठी राज्यातील साधारण ३५ जिल्ह्यात प्रत्येकी २ याप्रमाणे ७० फुटले असं धरू. 3/20
कृपया पुणे शहरातल्या मेट्रो स्टेशनला ब्रँडची नावे जोडू नका!
तुमच्या ब्रँडचे नाव पुण्यातल्या मेट्रो स्टेशनला पाच वर्षांसाठी जोडायचे असेल तर त्यासाठी पुणे मेट्रोने टेंडर काढले आहेत. म्हणजे उद्या ओप्पो कोथरूड, विवो छत्रपती शिवाजीनगर, अशी नावे दिली जातील. #थ्रेड 1/n
मेट्रोला जाहिरात करायची असेल आणि त्यातून उत्पन्न मिळवायचे असेल तर पूर्ण स्थानकभर करावी पण स्थानकांना नाव देण्याचा पराक्रम करू नये! एकदा स्थानकाला नाव दिले की ते नाव अंगवळणी पडते, पाच वर्षात त्या नावाचीच सवय होते, पुन्हा पाच वर्षांनी बदलायला गेलात तर लोकांचा गोंधळ उडतो.
2/n
शिवाय बऱ्याचदा ओप्पो कोथरूड मधलं कोथरूड जाऊन ओप्पो असाच वापर होतो पूर्ण उच्चार होत नाही. (उदा. मुंढवा भागात डायमंड नावाचा बस स्टॉप आहे, ते नाव का होतं कळायचंच नाही, खूप वर्षांनंतर कळालं की तिथे डायमंड वॉच कंपनी होती म्हणून तसे नाव पडले होते).
3/n
Punekars used to tease mumbaikars on water clogging. Well, the same thing has happened to Pune for the 2nd year running. So what exactly went wrong?
One liner answer: Voted for PMC, with eyes still on Delhi.
Detailed Answer 👇🏻 1/8
In september 2019, Pune saw floods for the first time in years. Since then, everyone kept on asking the PMC to clean the drainage, get rid of the encroachments but the Mayor, his 100 corporators, Commissioner were unmoved. 2/8
Huge rains yesterday and story from last year almost repeated itself. The roads, bridges constructed last year were washed out yesterday. In a year?
Development of Pune had come to standstill because of the rivalry between Dada's NCP and Bhai's Congress for few years.
3/8
गेल्या वर्षी मोठा पाऊस आला, पूर आला, तेव्हापासून सगळे सांगत होते नालेसफाई करा, अतिक्रमणे काढा. महापौर, त्यांचे १०० नगरसेवक आणि प्रशासन ढिम्म. काल भयानक पाऊस आला, पुन्हा तीच परिस्थिती. गेल्या वर्षीच्या पावसानंतर केलेले पूल, रस्ते काल वाहून गेले. एका वर्षात?
२/७
भारताचं राजकारण बदलणारं २०१४ वर्ष येण्याआधी पुण्याचा विकास दादांची राष्ट्रवादी आणि भाईंची काँग्रेस यांच्या कुरघोडीच्या राजकारणात अडकला होता. मग २०१४ आलं. पुणेकरांनी शहरातील सर्व ८ आमदार आणि एक खासदार भाजपच्या पारड्यात टाकले.
३/७