फॉर्म्युला वन रेसिंग #F1 #Thread
ह्या स्पर्धेचे आयोजन फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल ऑटोमोबाईल (FIA) तर्फे केले जाते. ह्या स्पर्धेला फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिप (F1) म्हणून देखील ओळखतात. जगभरातील वेगवेगळ्या २० ते २२ रेसिंग ट्रॅक्सवर ही स्पर्धा होते. 🛣️
#Formula1 #FormulaOne #रेसजगत
ह्या स्पर्धेत एकूण १० संघ असतात आणि प्रत्येक संघाचे २ असे एकूण २० चालक असतात. ह्या रेस मध्ये २ प्रकारच्या स्पर्धा असतात एक कार चालकांसाठी तर दुसरी कारच्या बांधणीबद्दल संघासाठी. प्रत्येक रेसच्या निर्णयानंतर मिळणारे सर्व अंक मिळून शेवटी विजेता ठरतो. 🏆
#F1 #Formula1 #रेसजगत
रेस मधील पहिल्या १० स्थानावरील चालकांनाच अंक मिळतात. विजेत्याला २५ अंक, दूसऱ्या स्थानाला १८ अंक, तिसऱ्याला १५, तर ४-१० क्रमांकाना अनुक्रमे १२, १०, ८, ६, ४, २, १ असे अंक दिले जातात. सर्वात जलद लॅप पूर्ण करणाऱ्या चालकाला (तो पहिल्या १० मध्ये असेल तर) १ गुण बोनस दिला जातो. #रेसजगत
#F1 चा कार्यक्रम साधारण ३ दिवसांचा असतो (शुक्रवार ते रविवार). ज्याच्या मध्ये २ सराव सत्र असतात. प्रत्येक संघाला फक्त दोनच कार्स वापरण्याची परवानगी असते.
#Formula1 #FormulaOne #AzerbaijanGP #रेसजगत
सराव सत्रांनंतर पात्रता फेरी होते. ज्यामध्ये कार चालकाला रेसिंग ट्रॅकचा एक लॅप सर्वात कमी वेळात पूर्ण करायचा प्रयत्न करायचा असतो. ज्याची वेळ सर्वात कमी त्याला मुख्य रेस साठी पोल पोझिशन म्हणजेच मुख्य रेस मध्ये पहिल्या स्थानापासून सुरुवात करायची संधी मिळते.
#रेसजगत #F1 #Formula1
मुख्य रेसची सुरुवात ही वॉर्मअप लॅपने होते. त्या नंतर सर्व कार्स ह्या क्वालिफाइंग राऊंडच्या ग्रीड पोझिशन वर येऊन थांबतात. जो चालक ठरलेले लॅप्स सर्वात आधी पूर्ण करतो तो विजेता ठरतो.
#Formula1 #रेसजगत #F1 #FormulaOne #AzerbaijanGP
संपूर्ण रेससाठी २ तासाचा अवधी असतो पण काही कारणांमुळे रेस थांबली तर एक तास जादा वेळ देण्यात येतो. रेसचे एकूण अंतर कमीतकमी ३०५ किलोमीटर एवढे मर्यादित केले आहे. पूर्ण रेस मध्ये चालक टायर बदलण्यासाठी, इंधनासाठी किंवा गाडीच्या इतर डागडुजीसाठी पिट-स्टॉप घेऊ शकतात
#Formula1 #रेसजगत #F1
रेस चालू असताना चालकांना इशारे देण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे फ्लॅग्स (झेंडे) दाखवले जातात.
#रेसजगत #F1 #Formula1 #FormulaOne #AzerbaijanGP
यलो फ्लॅग: एखाद्या गाडीचा अपघात किंवा ट्रॅकवर आलेले अडथळे चालकांना कळण्यासाठी हा फ्लॅग दाखवतात. हा फ्लॅग दाखवल्यानंतर चालकांना गाडीचा वेग कमी करावा लागतो तसेच गाड्यांना ओव्हरटेक करता येत नाही. ह्या फ्लॅग सोबत सेफ्टी कारही ट्रॅकवर येते जी सर्व चालकांच्या पुढे धावत असते
#रेसजगत #F1
ग्रीन फ्लॅग: ट्रॅकवरील सर्व अडथळे बाजूला केल्यानंतर रेस पूर्ववत चालू करताना ग्रीन फ्लॅग दाखवतात.
रेड फ्लॅग: ट्रॅकवर कोणताही मोठा अपघात, खराब हवामान किंवा गंभीर धोका निर्माण झाला असेल तर रेड फ्लॅग दाखवतात. ह्या नंतर सर्व चालकांना तत्काळ रेस बंद करुन पिट लेन मधे परतावे लागते.
#F1
संभाव्य धोका टळल्यानंतर रेस पुन्हा ग्रीड लाईन वरुन चालू होते.
ब्लू फ्लॅग: एखादया चालकाने अख्खा एक लॅप पूर्ण करुन शेवटच्या चालकाला गाठले तर त्याला वाट मोकळी करुन देण्यासाठी शेवटच्या चालकाला ब्लू फ्लॅग दिला जातो.
#Formula1 #FormulaOne #F1 #रेसजगत #AzerbaijanGP
ब्लॅक फ्लॅग: रेसमध्ये ट्रॅकवर अतिशय धोकादायक वर्तणुकीबद्दल चालकाला ब्लॅक फ्लॅग दिला जातो. हा फ्लॅग दिल्यावर चालक रेस मधून अपात्र केला जातो.
व्हाईट फ्लॅग: चालकांच्या समोरील गाडी कमी वेगाने धावत असेल तर सावध करण्यासाठी व्हाईट फ्लॅग दाखवतात. हा फ्लॅग जास्त सराव,पात्रता फेरीत वापरतात
चेकर्ड फ्लॅग: 🏁
रेस संपताना किंवा पात्रता फेरीची वेळ संपली हे दर्शवण्यासाठी चेकर्ड फ्लॅग दाखवतात. हा फ्लॅग दाखवल्यानंतर कोणालाही नवीन लॅप सुरु करता येत नाही.
#रेसजगत #Formula1 #FormulaOne #F1 #AzerbaijanGP
प्रत्येक गाडीला सराव सत्रांसह एका रेससाठी १३ टायर्सचे सेट दिले जातात. हे टायर्स स्लिक, इंटरमिडीएट आणि वेट अशा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सामान्यतः रेससाठी स्लिक टायर्सचा वापर करतात. ह्या टायरचे सॉफ्ट, मिडीयम आणि हार्ड हे तीन प्रकार आहेत. #रेसजगत
#F1 #Formula1 #FormulaOne
सॉफ्ट टायर्स लाल, मिडीयम पिवळ्या तर हार्ड टायर्स पांढऱ्या रंगाने निर्देशीत केले जातात.
सॉफ्ट टायर्स वेगवान पण लवकर खराब होणारे असतात तर हार्ड टायर्स टिकाऊ पण कमी वेगवान असतात.
#Formula1 #FormulaOne #F1 #रेसजगत
पावसाळी वातावरणात वेट टायर्सचा वापर होतो. ज्यामुळे ट्रॅकवर खूप पाणी असतानाही वेगवान गाड्यांची ट्रॅकवर पकड मजबूत राहते. हे टायर्स निळ्या रंगाने निर्देशित केले जातात.
तर इंटरमिडीएट टायर्स थोडा पाऊस असताना किंवा ट्रॅक ओला असताना वापरले जातात. हे टायर्स हिरव्या रंगाने निर्देशित करतात
रेसदरम्यान प्रत्येक कारला ह्यापैकी किमान दोन प्रकारचे टायर वापरावे लागतात. त्यामुळे ट्रॅकचा आराखडा, हवामान ह्यांचा अंदाज बांधून प्रत्येक कारसाठी योग्य धोरण बनविण्यात खरा कस लागतो. रेसच्या किमान ८ आठवडे आधी कुठल्या प्रकारचे टायर्स लागतील ह्याची माहिती टायर कंपनीला द्यावी लागते.#F1
पहिल्या १० ड्रायव्हर्सना दुसऱ्या सराव सत्रात सर्वात जलद लॅप पूर्ण करताना ज्या प्रकारचे टायर्स असतात त्याच प्रकारच्या टायर्सनी रेस सुरू करावी लागते, तर ११ ते २० क्रमांकाचे ड्रायव्हर कुठल्याही प्रकारच्या टायर्सनी रेस सुरू करू शकतात.
माहिती कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद 🙏
#रेसजगत
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.