Ruchira Sawant Profile picture
Dreamer🌠 Co- Founder, MakeShift | Education | Innovation | Explorer | Story Teller | Space Science Writer with hands on experience | Space Science Educator 🚀✨

Jul 14, 2022, 15 tweets

जेम्स वेब टेलिस्कोपने प्रतिमांचा पहिला सेट प्रसिद्ध केला आणि जगभर उत्साहाची लाट आलीय. या निमित्ताने जेम्स वेब टेलिस्कोप विषयी मराठीमध्ये थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न या थ्रेडमध्ये करते आहे.
#JamesWebbSpaceTelescope #JWTInMarathi

जेम्स वेब टेलिस्कोप ही जगातील आतापर्यंतची सर्वात मोठी, सर्वात शक्तिशाली आणि आजतोवर तयार केलेल्या अवकाशीय दुर्बिणींमध्ये सर्वात कॉम्प्लेक्स ठरलेली इन्फ्रारेड स्पेस ऑब्झर्व्हेटरी आहे.
#JamesWebbSpaceTelescope
#JWTInMarathi

१९९६ मध्ये या दुर्बिणीचं काम सुरु झालं तेव्हा तिला 'नेक्स्ट जनरेशन स्पेस टेलिस्कोप' असं संबोधण्यात आलं. पण नंतर २००२ मध्ये नासाचे दुसरे प्रशासक म्हणून नियुक्त झालेल्या 'जेम्स वेब' यांच्या स्मरणार्थ या दुर्बिणीला 'जेम्स वेब टेलिस्कोप' हे नाव द्यायचं ठरलं.

सुरुवातीला ही दुर्बीण २००७ मध्ये प्रक्षेपित करायची असा मानस होता. पण अनेक कारणांमुळे २०२१ उजाडलं. आणि २५ डिसेम्बर २०२१ ला फ्रान्समधून ही दुर्बीण अवकाशात प्रक्षेपित करण्यात आली. नासाची, युरोपियन स्पेस एजन्सी, कॅनेडियन स्पेस एजन्सी यांच्या एकत्रित प्रयत्नातून मोहीम आकारास आली आहे.

३० दिवसात १६ लाख किलोमीटर अंतर पार करून अवकाशात आपल्या लँगरेंज पॉईंट पर्यंत पोहोचलेल्या या दुर्बिणीला सोन्याचे आवरण दिलेले बेरोलीयमपासून बनवलेले षट्कोनी आकाराचे १८ आरसे (एकूण २१ फूट व्यास), तापमान अतिशीत ठेवण्यासाठी व्यवस्था, उच्चस्तरीय तंत्रज्ञान, पाच लेयर्स असलेलं सनशिल्ड आहे.

या दुर्बिणीने मिळवलेल्या नासाने प्रकाशित केलेल्या प्रतिमांविषयी आता जाणून घेऊया.
#JamesWebbSpaceTelescope
#JWTInMarathi

# गॅलॅक्सी क्लस्टर SMACS 0723:
या प्रतिमेला वेब्स फर्स्ट डीप फिल्ड असं म्हटलं आहे.
हजारो दीर्घिका दाखवणारी आणि तरीसुद्धा विश्वाचा एका गव्हाच्या दाण्याइतकंच अवकाश कैद करणारी विश्वाची ही प्रतिमा आजवरची सर्वात डीप आणि शार्प प्रतिमा आहे.

या प्रतिमेत दिसणारा प्रकाश हा १३ बिलियन वर्ष जुना आहे. म्हणजे बिग बँग नंतर काही काळातलाच. असं म्हणतात की या विश्वाची निर्मिती करणारं बिग बँग फक्त १३.८ बिलियन वर्षांपूर्वी झालं होतं. अंदाज येतोय का की या प्रतिमेसोबत आपण विश्वनिर्मितीच्या घटनेच्या किती जवळ पोहोचलो आहोत!

आता जुलै १२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ७:३० नंतर प्रकाशित केलेल्या प्रतिमांविषयी आपण बोलूया.

#JamesWebbSpaceTelescope
#JWTInMarathi

सुरुवात नेब्युलाच्या दोन प्रतिमांपासून करू.
त्याआधी नेब्युला म्हणजे काय हे समजून घेऊ. कोट्यवधी वर्षानंतर जेव्हा तारे मृत पावतात तेव्हा ते प्रकाशसोबत ताऱ्यातील धूळ व वायू बाहेर टाकले जातात. त्यापासून त्या ताऱ्याच्या परिघात ढग तयार होतात. या ढगांना नेब्युला म्हणतात.

# हा सदर्न रिंग नेब्युला आहे. हा मृत पावणारा तारा असून केंद्रस्थानी असलेले जुळे तारे आपले वायू आणि धूळ प्रकाशासोबत बाहेर टाकत नष्ट होताहेत. २ हजार प्रकाशवर्ष दूर असलेल्या या नेब्युलाचे इतके स्पष्ट फोटो मिळवणं जेम्स वेबमुळे शक्य झालं आहे.

# हा आहे करीना नेब्युला. सदर्न रिंगच्या अगदी विरुद्ध इथे हजारो बेबी स्टार्स जन्माला येताहेत. म्हणजे ताऱ्यांचं नर्सिंग होमच जणू. तेथील कॉस्मिक क्लिफवर फोकस करून प्रतिमा मिळवताना तारे तयार होत असतानाची या आधी कधीच न दिसलेली एक अत्यंत जलद फेज जेम्स वेबने आपल्यासमोर उलगडली आहे.

हा आहे स्टीफन क्विंटेट. यात तुम्हाला पाच आकाशगंगांचा समूह दिसेल. या प्रतिमेमुळे दीर्घिकांमध्ये होणाऱ्या आंतरप्रक्रियेमुळे होणारी ताऱ्यांची निर्मिती व त्यासाठीची अनुकूल परिस्थिती वैज्ञानिकांना समजून घेता येणार आहे.
हा पाच दीर्घिकांचा समूह आपल्यापासून २९० मिलियन प्रकाशवर्ष दूर आहे

WASP-96b स्पेक्ट्रम चा हा फोटो आहे. हा बाह्य सूर्यमालेतील एका ग्रहाच्या वातावरणाचा वर्णपट (ग्राफ) आहे. या वर्णपटाच्या आधारे वातावरणात बाष्प सापडल्याने तिथे पाण्याचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. दुसऱ्या ग्रहमालांमधल्या वातावरणाचा अभ्यास करणं या फोटोमुळे शक्य होणार आहे.

जेम्स वेबमुळे आपल्याला आजवर माहीत असलेल्या जगाच्या पलीकडच्या अज्ञाताचा शोध घेता येणार आहे. तसेच मानवाला अवकाशाबद्दल पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतील आणि सोबतच आणखी नवे प्रश्नही तयार होतील.

#JamesWebbSpaceTelescope
#JWTInMarathi
#NASA #ESA #CSA

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling