PaisaPani Profile picture
अर्थ विषयावरील सर्व अपडेट्स आपल्या मराठी भाषेत तुमच्यासाठी... 📲Whatsapp- https://t.co/G87QKpUJZs 📲Telegram- https://t.co/oO9DDgqffm 📲YouTube- https://t.co/dwgx70PxBb

Jul 25, 2022, 13 tweets

शाळेत असताना आपण सगळ्यांनीच नटराज आणि अप्सरा ब्रँडच्या पेन्सिल आणि खोडरबर वापरले आहेत. त्यावेळी नटराज थोडा स्वस्त आणि अप्सरा थोडा महाग ब्रँड असायचा. अजूनही तसेच आहे. या दोनपैकी अप्सरा हा भारीतला ब्रँड समजला जायचा. #म #मराठी

पण हे दोन्ही ब्रँड एकाच कंपनीचे आहेत हे तुम्हाला माहित आहे का?

होय, हिंदुस्थान पेन्सिल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे हे दोन ब्रँड आहेत.

ही कंपनी १९५८ पासून या व्यवसायात असून आजघडीला भारतातील सर्वात मोठी पेन्सिल मॅन्युफॅक्चरर आहेत. #म #मराठी

कंपनी आपले प्रॉडक्टस ५० हून अधिक देशांमध्ये विकते. कंपनी प्रत्येक दिवशी ८५ लाख पेन्सिल्स, १७ लाख शार्पनर्स, २७ लाख खोडरबर, १० लाख पेन आणि ३ लाख पट्ट्या बनवते. ही सगळी प्रोसेस ऑटोमेटेड आहे. कंपनीचे स्वतःचे १२ मॅन्युफॅक्चरींग प्लॅन्ट्स आहेत. #म #मराठी

कंपनीचे २८०० हून अधिक रिजनल डिस्ट्रिब्युटर्स तर जवळपास पावणेदोन लाख डायरेक्ट डिस्ट्रिब्युशन आउटलेट्स आहेत.

भारत पारतंत्र्यात असताना पेन्सिलसुद्धा आयात केली जात असे. ती प्रामुख्याने युके, जपान आणि जपान या देशांमधून मागवली जाई. #म #मराठी

मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर ही निर्यात जवळपास ठप्प झाली. त्यावर पर्याय म्हणून भारतातच काहीजणांनी पेन्सिल बनवण्याचे कारखाने सुरु केले. मात्र दुसरे महायुद्ध संपल्यावर पुन्हा एकदा परदेशी पेन्सिल्स भारतात आयात होऊ लागल्या. #म #मराठी

भारतात ज्यांनी हा व्यवसाय सुरु केला होता त्यांची अडचण झाली. भारतात बनवल्या जाणाऱ्या पेन्सिल्स या तुलनेने तकलादू आणि महाग असत. त्यामुळे साहजिकच त्यांनी खरेदी करणे ग्राहकांनी थांबवले. अशात या पेन्सिल कारखानदारांनी सरकारचे दरवाजे ठोठावले. #म #मराठी

सरकारने आयातबंदी करून काही प्रमाणात त्यांची मदतही केली.

अशातच पेन्सिल व्यवसाय नक्की कसा करावा? मॅन्युफॅक्चरिंग कसे केले पाहिजे?यासारख्या महत्वाच्या गोष्टी शिकण्यासाठी बी जे संघवी, रामनाथ मेहरा आणि मनसुखानी हे तीन मित्र जर्मनीला जाऊन आले. #म #मराठी

सगळे शिकून त्यांनी १९५८ मध्ये हिंदुस्थान पेन्सिल्सची मुहूर्तमेढ रोवली.

सगळ्यांचा लाडका आणि बहुतेकजणांचा आयुष्यातील पहिला पेन्सिल, खोडरबर ब्रँड हा कंपनीचासुद्धा पहिला ब्रँड होता. लोकांना व्हॅल्यू फॉर मनी देता यावी हेतूने कंपनीने तो लाँच केला होता. #म #मराठी

अर्थातच त्यात ते यशस्वी झाले. पुढे १९७० दशकात कंपनीने अप्सरा हा थोडा प्रीमियम ब्रँड लाँच केला. या ब्रॅण्डलादेखील ग्राहकांनी आपलेसे केले.

पुढे जाऊन कंपनीने पेन्सिल्सबरोबरच खोडरबर, शार्पनर, बॉल पेन, जेल पेन, कलर पेन्सिल असे वेगवेगळे #म #मराठी

प्रॉडक्टस लाँच करत मार्केटमधील आपला दबदबा वाढवत नेला. आजही पेन्सिल, खोडरबर, शार्पनर मार्केटचा ६०% अधिक शेअर हिंदुस्थान पेन्सिल्सकडेच आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीच्या नफ्यामध्ये घट होत आहे. #म #मराठी

त्यात गेली दोन अडीच वर्षे शाळा, कॉलेज ऑनलाईन झाल्याने प्रॉडक्टसच्या खपावर त्याचा परिणाम झाला. आता येणाऱ्या काळात कंपनी या सगळ्याला कसे तोंड देते याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. #म #मराठी

भारतातील पेन्सिल मार्केट गेली अनेक वर्षे हिंदुस्थान पेन्सिल्स, कॅम्लिन, डॉम्स आणि महाराष्ट्र पेन्सिल्स या चारच कंपन्यांनी आपल्या ताब्यात ठेवले आहे. #म #मराठी

मध्यंतरी कंपनीने एका आईच्या पात्राला प्रतिसाद देताना तिच्या डावखुऱ्या मुलीला पेन्सिलला टोक करणे सोपे जावे म्हणून खास वेगळे शार्पनर बनवून तिला पाठवले होते.

थ्रेड आवडल्यास रिट्विट नक्की करा.
#म #मराठी

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling