#थ्रेड
#रवीश_कुमार चं जुनं आणि एक ट्विट दाखवून अनेक जण त्यांना ट्रोल करतात.
ट्विटमध्ये त्यांनी "Army chief must join hands with Anna."
असं लिहिलं होतं.या वाक्याचे अनेक अर्थ निघतात. प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार याचे अर्थ लावतो.मी देखील लावला होता.पण हे अर्थ तेव्हाच निघतात(1/9)
जेव्हा आपल्याला हे एकच ट्विट दाखवलं जातं आणि त्याच्या आधीचे किंवा नंतरचे ट्विट दाखवले जात नाहीत किंवा मुद्दाम लपवले जातात.
अनेक जण त्या ट्विट ला कोट, रिप्लाय करत #रवीश_कुमार ला ट्रोल करत असतात. यात प्रामुख्याने काँग्रेसचे अंधभक्त, इथे पुरोगामी,रॅशनल म्हणून वावरणारे इ. आहेत.
(2/9)
त्या ट्विट वर आत्ताही जाऊन बघा,रोज अनेक जण रिप्लाय करत असतात,कोट करत असतात.
लिंक देतोय इथे त्या ट्विटची.👇
हा सगळा गोंधळ यामुळे होतोय की या ट्विटचा संदर्भच बऱ्याच जणांना माहीत नाहीये.
झालं असं होतं की तत्कालीन आर्मी चीफ जनरल व्ही के सिंग यांनी
(3/9)
त्यावेळी वक्तव्य/दावा केला होता की त्यांना कुणीतरी 14 करोडची लाच देऊ केली होती.
या घटनेसंदर्भात #रवीश_कुमार यांनी ट्विट करून काही प्रश्न विचारले.ही घटना होती 26 मार्च 2012 ची.त्यावेळी,2012 मध्ये ट्विटरवर आतापेक्षा शब्दमर्यादा कमी होती.
रवीश कुमारांनी ट्विट करताना
(4/9)
ते ट्विट थ्रेड स्वरूपात करण्याऐवजी किंवा प्रत्येक ट्विटला नंबर देण्याऐवजी सेपरेट ट्विट केले.आणि ट्रोल करणारे त्या 3 ट्विट मधील एकच ट्विट शेअर करून लोकांना येड्यात काढायला बघतात.
या सिरीज मधलं पहिलं ट्विट #रवीश_कुमार ने केलं 26 मार्च 2012 ला सकाळी 11.07 वाजता.दुसरं ट्विट
(5/9)
जे स्वतंत्रपणे दाखवलं जातं ते केलं पुढच्याच मिनिटाला म्हणजे 11.08 वाजता. आणि तिसरं आणि शेवटचं ट्विट 11.19 ला त्यांनी केलं.
हे ट्विट क्रमाने वाचल्यावर समजेल की या ट्विट मधून #रवीश_कुमार आर्मी चीफने केलेल्या दाव्यांबद्दल प्रश्न विचारत आहेत. आणि तो दावा खरा असेल तर
(6/9)
आर्मी चीफ ने स्पष्ट करावं आणि या 14 करोडच्या लाच देणाऱ्या विरोधात लढण्यासाठी अण्णा हजारे सोबत हातमिळवणी करावी
त्यानंतर परत 2 दिवसांनी #रवीश_कुमार यांनी ट्विट करून आर्मी चीफ कडे पुरावे सादर करण्याची मागणी केली होती.
असं प्रकरण आहे हे .
भाजपचे अंधभक्त अर्धवट माहिती
(7/9)
अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर टाकत असतात ज्यातून संदर्भ न समजल्याने वेगवेगळे अर्थ निघत असतात,पण आता काँग्रेसी भक्त सुद्धा तेच करायला लागलेत असं दिसतंय.
ते एकच ट्विट बघून माझा सुद्धा गैरसमज झाला होता पण काल मला त्यामागील बॅकग्राउंड समजलं,ते सगळ्यांना समजावं यासाठी हा थ्रेड.(8/9)
#रवीश ने अण्णाच्या आंदोलनाचं समर्थन केलं होतं हे खरं आहे. पण अण्णा एवढा ढोंगी निघेल हे तेव्हा कुणालाच वाटलं नव्हतं आणि त्यामुळे चांगले चांगले त्यावेळी फसले होते ज्यात #रवीश_कुमार देखील होते.
आज अनेकांना अण्णाचं त्यावेळी समर्थन केल्याचा मनातून पश्चाताप होतोय हे ही खरं आहे.
(9/9)
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.