#थ्रेड #रवीश_कुमार चं जुनं आणि एक ट्विट दाखवून अनेक जण त्यांना ट्रोल करतात.
ट्विटमध्ये त्यांनी "Army chief must join hands with Anna."
असं लिहिलं होतं.या वाक्याचे अनेक अर्थ निघतात. प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार याचे अर्थ लावतो.मी देखील लावला होता.पण हे अर्थ तेव्हाच निघतात(1/9)
जेव्हा आपल्याला हे एकच ट्विट दाखवलं जातं आणि त्याच्या आधीचे किंवा नंतरचे ट्विट दाखवले जात नाहीत किंवा मुद्दाम लपवले जातात.
अनेक जण त्या ट्विट ला कोट, रिप्लाय करत #रवीश_कुमार ला ट्रोल करत असतात. यात प्रामुख्याने काँग्रेसचे अंधभक्त, इथे पुरोगामी,रॅशनल म्हणून वावरणारे इ. आहेत.
(2/9)
त्या ट्विट वर आत्ताही जाऊन बघा,रोज अनेक जण रिप्लाय करत असतात,कोट करत असतात.
लिंक देतोय इथे त्या ट्विटची.👇
हा सगळा गोंधळ यामुळे होतोय की या ट्विटचा संदर्भच बऱ्याच जणांना माहीत नाहीये.
झालं असं होतं की तत्कालीन आर्मी चीफ जनरल व्ही के सिंग यांनी
(3/9)
त्यावेळी वक्तव्य/दावा केला होता की त्यांना कुणीतरी 14 करोडची लाच देऊ केली होती.
या घटनेसंदर्भात #रवीश_कुमार यांनी ट्विट करून काही प्रश्न विचारले.ही घटना होती 26 मार्च 2012 ची.त्यावेळी,2012 मध्ये ट्विटरवर आतापेक्षा शब्दमर्यादा कमी होती.
रवीश कुमारांनी ट्विट करताना
(4/9)
ते ट्विट थ्रेड स्वरूपात करण्याऐवजी किंवा प्रत्येक ट्विटला नंबर देण्याऐवजी सेपरेट ट्विट केले.आणि ट्रोल करणारे त्या 3 ट्विट मधील एकच ट्विट शेअर करून लोकांना येड्यात काढायला बघतात.
या सिरीज मधलं पहिलं ट्विट #रवीश_कुमार ने केलं 26 मार्च 2012 ला सकाळी 11.07 वाजता.दुसरं ट्विट
(5/9)
जे स्वतंत्रपणे दाखवलं जातं ते केलं पुढच्याच मिनिटाला म्हणजे 11.08 वाजता. आणि तिसरं आणि शेवटचं ट्विट 11.19 ला त्यांनी केलं.
हे ट्विट क्रमाने वाचल्यावर समजेल की या ट्विट मधून #रवीश_कुमार आर्मी चीफने केलेल्या दाव्यांबद्दल प्रश्न विचारत आहेत. आणि तो दावा खरा असेल तर
(6/9)
आर्मी चीफ ने स्पष्ट करावं आणि या 14 करोडच्या लाच देणाऱ्या विरोधात लढण्यासाठी अण्णा हजारे सोबत हातमिळवणी करावी
त्यानंतर परत 2 दिवसांनी #रवीश_कुमार यांनी ट्विट करून आर्मी चीफ कडे पुरावे सादर करण्याची मागणी केली होती.
असं प्रकरण आहे हे .
भाजपचे अंधभक्त अर्धवट माहिती
(7/9)
अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर टाकत असतात ज्यातून संदर्भ न समजल्याने वेगवेगळे अर्थ निघत असतात,पण आता काँग्रेसी भक्त सुद्धा तेच करायला लागलेत असं दिसतंय.
ते एकच ट्विट बघून माझा सुद्धा गैरसमज झाला होता पण काल मला त्यामागील बॅकग्राउंड समजलं,ते सगळ्यांना समजावं यासाठी हा थ्रेड.(8/9)
#रवीश ने अण्णाच्या आंदोलनाचं समर्थन केलं होतं हे खरं आहे. पण अण्णा एवढा ढोंगी निघेल हे तेव्हा कुणालाच वाटलं नव्हतं आणि त्यामुळे चांगले चांगले त्यावेळी फसले होते ज्यात #रवीश_कुमार देखील होते.
आज अनेकांना अण्णाचं त्यावेळी समर्थन केल्याचा मनातून पश्चाताप होतोय हे ही खरं आहे.
(9/9)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
कोणत्या पक्षाचे किती खासदार आहेत हे बघून पत्रकाराने पत्रकारिता करायला पाहिजे का?😄
यातून असा अर्थ निघतो की तो पत्रकार चमकोगिरी साठी मोठमोठे पक्ष निवडून त्याबद्दल बातम्या करतोय.
आप आणि केजरीवाल ज्या पद्धतीचं राजकारण आणि जाहिरातबाजी करतंय त्याची वेळीच दखल घेऊन जनतेला
(1/7)
जागरूक करणं पत्रकारांचं कर्तव्य आहे.
ज्या दिल्ली मॉडेलची मार्केटिंग आप करतंय त्यात खरंच तथ्य आहे का हे बघायला नको का?लोकांना त्याबद्दल सत्य सांगायला नको का?
मोदींनी जेव्हा गुजरात मॉडेल ची मार्केटिंग केली तेव्हा वेळीच जर त्या मॉडेलचं सत्य पत्रकारांनी जनतेसमोर आणलं असतं तर
(2/7)
गुजरात मॉडेल,अच्छे दिन या भूलथापांना लोकं बळी पडले नसते आणि देशाचं एवढं नुकसान झालं नसतं.
केजरीवालचा ढोंगीपणा बघा.पंजाबमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांच्या नावावर राजकारण केलं.हे दोघेही धार्मिक राजकारणाच्या विरोधात असणारे होते.
जेव्हा केजरीवाल पंजाब निवडणूकीत
(3/7)
रविश कुमारांच्या काँग्रेस सरकारच्या काळातील काही भूमिका वादग्रस्त होत्या हे कुणीही नाकारू शकत नाही.जसं ती आर्मी चीफ ने अण्णा सोबत हात मिळवावा ही भूमिका असेल किंवा अण्णा हजारे बद्दलच्या भूमिका असतील.
पण जेव्हा भाजप सरकार आल्यावर अनेक पत्रकार सत्तेचे गुलाम होत सरकारची(1/11)
चाटूगिरी करू लागले तेव्हापासून आजपर्यंत रविश कुमारांनी सत्तेत बसलेल्याना प्रश्न विचारणारा पत्रकार म्हणून स्वतः चं अस्तित्व टिकवलं हे ही कुणी नाकारू शकत नाही. आज बोटावर मोजता येतील इतकेच असे पत्रकार उरलेत जे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतात,सामान्य जनतेचे मुद्दे उचलतात.
(2/11)
आणि त्यात रविश कुमार आहेत.
रवीश कुमार सारख्या पत्रकाराने तेव्हा असे ट्विट/वक्तव्ये केले असतील यावर विश्वास बसत नाही कारण आर्मी चीफ सारखे ट्विट संविधानाला आणि लोकशाहीला धरून नाहीत.
पण mainstream media मध्ये सरकारला प्रश्न विचारणारा पत्रकार म्हणूनच रवीश यांनी काम केलं
(3/11)
महात्मा गांधी आणि इतर कैद्यांसाठी ब्रिटिश सरकारने पास केलेल्या बजेट चे फोटो सोशलमीडियावर टाकून अनेक भक्त सावरकरांचा बचाव करू पाहतात.भक्त दावा करतात की सावरकरांना तर 60 च रुपये मिळत होते,पण गांधीना एवढी मोठी रक्कम मिळत होती.
प्रथमतः यातून भक्त हे तर मान्य करतात की
(1/6)
सावरकरांना 60 रुपये मिळत होते.
आता वरील फोटो टाकून करण्यात येणाऱ्या दाव्यांबद्दल बोलायचं झालं तर 1942-43 साठी गांधीजी आणि त्यांच्यासोबत स्थानबद्ध असणाऱ्या इतर लोकांच्या खर्चासाठी जे पैसे ब्रिटिश सरकारने मंजूर केले होते त्याबद्दलचा तपशील त्या फोटो मध्ये दिसतो त्यामुळे
(2/6)
पहिली गोष्ट ती पेंशन नाही जी माफी मागून सुटका झाल्यानंतर मिळत होती.
दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गांधीजींनी यासंदर्भात 1943 मध्ये एक पत्र लिहिलं होतं ज्यात त्यांनी त्यांच्या व इतर लोकांच्या सुटकेची मागणी केली होती. या पत्रात गांधीजी लिहितात
"अशा देशात जिथे लाखो ..
(3/6)
अनर्थमंत्री निर्मला अक्का ने ऑईल बॉण्ड वर पुन्हा एकदा संसदेत भाषण देत लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला.
ऑइल बॉण्डचं व्याज आणि परतावा मोदींना करावा लागतोय,त्या इथपर्यंत म्हणाल्या की 2026 मध्ये पण आम्हालाच परतावा करावा लागणार आहे.त्यांच्या बोलण्याचा सूर असा होता की
(1/6)
जसं तत्कालीन 2005 मध्ये असणाऱ्या सरकारला स्वप्न पडलं होतं की 2014 ला मोदी सत्तेत येणार आहे त्यामुळे आपण बॉंडचं व्याज आणि परतावा त्यांच्या माथी मारण्यासाठी 2014 पासून repayment सुरू करू.😅
ऑईल बॉण्ड वर अनर्थमंत्री पहिल्यांदा बोलत आहेत असं नाही,2021 मध्येही त्यांनी यावर
(2/6)
भाषण देऊन पेट्रोल डिझेल वरील टॅक्स कमी करण्यासाठी हे ऑइल बॉण्ड्स कशाप्रकारे अडथळा ठरत आहेत हे सांगितलं होतं.
पण वस्तुस्थिती वेगळी आहे,यांनी इंधनावरच्या वाढवलेल्या टॅक्स मधून एवढा पैसा कमावला आहे की त्याच्यासमोर या ऑईल बॉण्डचं रिपेमेंट काहीच नाही.
त्यासंदर्भातील हा लेख .
(3/6)
बातम्यांच्या चॅनलवर आता अशा प्रकारची जाहिरातबाजी चालू झाली आहे.17 हजारांचा कोर्स 7 वाजेपर्यंत विकत घेतल्यास 2400 मध्ये मिळवा वगैरे.
यात 2-4 लोकांच्या प्रतिक्रिया पण दाखवतात जे सांगत असतात की या सरांकडून ट्रेडिंग शिकल्याने खूप फायदा झाला वगैरे.
पण ट्रेडिंग करताना (1/7)
कुणी आपल्याला 80-90% accuracy असलेली स्ट्रॅटेजी शिकवू द्या, जर आपण रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट प्रॉपरली फॉलो केलं नाही तर शेवटी आपल्याला लॉस होतो.
आपण 80-90% accuracy मध्ये छोटे प्रॉफिट घेण्यात यशस्वी ठरतो पण जे 20% ट्रेड आपले फेल जातात तिथे आपण मोठे लॉस घेऊन बसतो
(2/7)
आपण मोठे लॉस सहन करू शकतो पण मोठे प्रॉफिट सहन करणं अवघड असतं. थोडा प्रॉफिट व्हायला लागला की आपल्याला वाटतं की मिळतंय तेवढं पदरात पाडून घ्या.पण जेव्हा लॉस होत असतो आणि आपण स्ट्रिक्टली स्टॉप लॉसचे रुल्स फॉलो करत नाही तेव्हा आपण वाट बघत बसतो की price आपल्या buying Price ला येईल(3/7)
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताला ओळखलं जातं. या लोकशाहीचा पंतप्रधान गेल्या आठ वर्षात भारतात भारतीय पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेऊ शकला नाही.ती 1 पत्रकार परिषद सोडून द्या ज्यात धरून आणल्यासारखं पंतप्रधानांना बसवलं होतं.
पंतप्रधान ज्या स्क्रिप्टेड मुलाखती देतात
(1/4)
त्यात त्यांना प्रश्न विचारले जातात की तुम्ही थकत का नाही,एवढी एनर्जी कुठुन येते वगैरे.
देशात बेरोजगारी,महागाईचा भडका उडाला असताना पंतप्रधान त्यावर बोलत नाहीत.
नुकतेच पंतप्रधान युरोप दौऱ्यावर असताना पत्रकारांचे प्रश्न न घेतल्यामुळे पंतप्रधानांवर टीका होत आहे.
(2/4)
डॅमेज कंट्रोल साठी भाजप IT cell कडून आणि भाजप नेते, मंत्री,गोदी मीडिया यांच्याकडून 65 तास ,3 देश वगैरे मेसेज सोशल मीडियात पोस्ट केले जात आहेत.
हेच गोदी मीडिया आणि IT सेल भारत विश्वगुरू,महासत्ता वगैरे झाल्याचं दाखवत असतात.
ज्या देशांसोबत आपण भारताची तुलना करतोय
(3/4)