विशाल/ вишал Profile picture
सिव्हिल इंजिनिअर | फैन ऑफ नेताजी सुभाषचंद्र बोस | वाचक | भगतसिंग आणि गांधीवादी | एकांती | आळशी | इतिहास प्रेमी | सत्तेचा कायमस्वरूपी विरोधक | AB+| @ManUtd @NUFC

Jan 23, 2023, 12 tweets

नेताजी सुभाष बाबुंचे सावरकर आणि हिंदुत्ववाद्यांबद्दल नक्की काय विचार होते?

1938 मध्ये सुभाष चंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी संघटनेच्या घटनेमध्ये एक दुरुस्ती प्रस्ताव आणला.

1/12

सुभाषबाबुंच्या ह्या प्रस्तावाद्वारा हिंदू-महासभा अथवा मुस्लिम लीग ह्या दोन जातीय संघटनांचे सदस्यत्व असलेल्या कुणाही व्यक्तीस काँग्रेस संघटनेच्या कोणत्याही निर्वाचित समितीचे सद्स्यत्व देण्यापासून प्रथमच रोख लावण्यात आली.

2/12

कलकत्ता कॉर्पोरेशनच्या निवडणुकीं संदर्भातल्या 1 मार्च 1940 च्या ‘फॉरवर्ड’ मधील आपल्या संपादकीय लेखात सुभाष बाबूंनी हिंदू महासभा आणि इंग्राजांच्या संगनमताबद्दल स्पष्टपणे लिहिलं आहे. ते लिहितात,"हिंदू महासभेच्या नेत्यांनी केलेल्या कट-कारस्थानाने मी व्याथित आणि दुखी झालो आहे.

3/12

त्यांची ही खेळी स्वच्छ आणि शुद्ध पणाची नव्हती. इंग्रज आणि त्यांचे भाडोत्री उमेदवार यांच्याशी साटं-लोटं करून संयुक्त अघाडी तयार करण्यामध्ये त्यांनी शक्ती पणाला लावली. हिंदू महासभेने हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की इंग्रजांना कॉर्पोरेशनपासून दूर ठेवण्यापेक्षा

4/12

त्यांना अधिक रस हा काँग्रेसला पाडण्यामध्ये आहे.1942 मध्ये गांधीजींनी ब्रिटिशांविरुद्धचं अखेरचं आणि निर्णायक भारत छोडो आंदोलन छेडलं. सारा देश ढवळून निघत होता. नेताजी त्यावेळी परदेशात होते आणि ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढण्याची तयारी करीत होते.

5/12

गांधीजींशी मतभेद असूनही आणि काँग्रेसपासून दूर जाऊनही नेताजी 1942 मध्ये भारतीय जनतेला भारत छोडो आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत होते. त्यांनी आझाद हिंद रेडिओ द्वारा भारतीय जनतेला उद्देशून दिलेली सारी भाषणे आज इंटरनेट वर उपलब्ध आहेत.

6/12

हिंदू महासभेने मात्र ह्या आंदोलनाचा बहिष्कार करत मुस्लिम लीगची साथ दिली. हे पाहून ऑगस्ट 1942 च्या रेडीओ वरील भाषणात नेताजी म्हणाले,
“श्री जिन्ना आणि श्री सावरकरांना, जे आजही ब्रिटिशांबरोबर तडजोड करू पाहताहेत त्यांना मी स्पष्ट्पणे सांगू इच्छितो की,

7/12

भविष्यातील उद्याच्या जगामध्ये ब्रिटिश साम्राज्याचा लवलेशही नसेल हे लक्षात घ्या! व्यक्ती, समूह किंवा दल, जे जे म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या या लढ्यात सहभागी होतील त्यांना उद्याच्या त्या भारतात मानाचं स्थान असेल..... पण

8/12

ब्रिटिश साम्राज्याच्या पाठ राख्यांना मात्र त्या स्वतंत्र भारतात काहीही किंमत नसेल.”

आज स्वातंत्र्याला 70 वर्ष उलटून गेल्यावर धर्मांध शक्ती प्रबळ झालेल्या पाहून सुभाष बाबू काय म्हणाले असते?

9/12

मला वाटतं, 12 मे 1940 रोजी बंगालच्या झारग्रामला त्यांनी निवडणुक सभेमध्ये लोकांना जे सांगितलं तेच नेमकं म्हणाले असते! ते म्हणाले होते, “हिंदू-महासभेने मतांची भीक मागण्यासाठी हातात त्रिशूळ घेऊन साधू आणि साध्वींना तैनात केलं आहे.

10/12

त्रिशूळ आणि भगवी-वस्त्र पहाताच सामान्य हिंदूं नत-मस्तक होतात. अशा प्रकारे धर्माचा गैर-वापर करीत हिंदू-महासभेने राजकारणाच्या अखाड्यात प्रवेश केला आहे.

11/12

ही कृती धर्माला अपवित्र करणारी आहे. म्हणूनच याचा विरोध करणे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. ........
ह्या गद्दरांना राष्ट्रीय जीवनातून हद्दपार करा. त्यांचं अजिबात ऐकू नका!”

#NetajiSubhashChandraBose

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling