नेताजी सुभाष बाबुंचे सावरकर आणि हिंदुत्ववाद्यांबद्दल नक्की काय विचार होते?
1938 मध्ये सुभाष चंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी संघटनेच्या घटनेमध्ये एक दुरुस्ती प्रस्ताव आणला.
1/12
सुभाषबाबुंच्या ह्या प्रस्तावाद्वारा हिंदू-महासभा अथवा मुस्लिम लीग ह्या दोन जातीय संघटनांचे सदस्यत्व असलेल्या कुणाही व्यक्तीस काँग्रेस संघटनेच्या कोणत्याही निर्वाचित समितीचे सद्स्यत्व देण्यापासून प्रथमच रोख लावण्यात आली.
2/12
कलकत्ता कॉर्पोरेशनच्या निवडणुकीं संदर्भातल्या 1 मार्च 1940 च्या ‘फॉरवर्ड’ मधील आपल्या संपादकीय लेखात सुभाष बाबूंनी हिंदू महासभा आणि इंग्राजांच्या संगनमताबद्दल स्पष्टपणे लिहिलं आहे. ते लिहितात,"हिंदू महासभेच्या नेत्यांनी केलेल्या कट-कारस्थानाने मी व्याथित आणि दुखी झालो आहे.
3/12
त्यांची ही खेळी स्वच्छ आणि शुद्ध पणाची नव्हती. इंग्रज आणि त्यांचे भाडोत्री उमेदवार यांच्याशी साटं-लोटं करून संयुक्त अघाडी तयार करण्यामध्ये त्यांनी शक्ती पणाला लावली. हिंदू महासभेने हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की इंग्रजांना कॉर्पोरेशनपासून दूर ठेवण्यापेक्षा
4/12
त्यांना अधिक रस हा काँग्रेसला पाडण्यामध्ये आहे.1942 मध्ये गांधीजींनी ब्रिटिशांविरुद्धचं अखेरचं आणि निर्णायक भारत छोडो आंदोलन छेडलं. सारा देश ढवळून निघत होता. नेताजी त्यावेळी परदेशात होते आणि ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढण्याची तयारी करीत होते.
5/12
गांधीजींशी मतभेद असूनही आणि काँग्रेसपासून दूर जाऊनही नेताजी 1942 मध्ये भारतीय जनतेला भारत छोडो आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत होते. त्यांनी आझाद हिंद रेडिओ द्वारा भारतीय जनतेला उद्देशून दिलेली सारी भाषणे आज इंटरनेट वर उपलब्ध आहेत.
6/12
हिंदू महासभेने मात्र ह्या आंदोलनाचा बहिष्कार करत मुस्लिम लीगची साथ दिली. हे पाहून ऑगस्ट 1942 च्या रेडीओ वरील भाषणात नेताजी म्हणाले,
“श्री जिन्ना आणि श्री सावरकरांना, जे आजही ब्रिटिशांबरोबर तडजोड करू पाहताहेत त्यांना मी स्पष्ट्पणे सांगू इच्छितो की,
7/12
भविष्यातील उद्याच्या जगामध्ये ब्रिटिश साम्राज्याचा लवलेशही नसेल हे लक्षात घ्या! व्यक्ती, समूह किंवा दल, जे जे म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या या लढ्यात सहभागी होतील त्यांना उद्याच्या त्या भारतात मानाचं स्थान असेल..... पण
8/12
ब्रिटिश साम्राज्याच्या पाठ राख्यांना मात्र त्या स्वतंत्र भारतात काहीही किंमत नसेल.”
आज स्वातंत्र्याला 70 वर्ष उलटून गेल्यावर धर्मांध शक्ती प्रबळ झालेल्या पाहून सुभाष बाबू काय म्हणाले असते?
9/12
मला वाटतं, 12 मे 1940 रोजी बंगालच्या झारग्रामला त्यांनी निवडणुक सभेमध्ये लोकांना जे सांगितलं तेच नेमकं म्हणाले असते! ते म्हणाले होते, “हिंदू-महासभेने मतांची भीक मागण्यासाठी हातात त्रिशूळ घेऊन साधू आणि साध्वींना तैनात केलं आहे.
10/12
त्रिशूळ आणि भगवी-वस्त्र पहाताच सामान्य हिंदूं नत-मस्तक होतात. अशा प्रकारे धर्माचा गैर-वापर करीत हिंदू-महासभेने राजकारणाच्या अखाड्यात प्रवेश केला आहे.
11/12
ही कृती धर्माला अपवित्र करणारी आहे. म्हणूनच याचा विरोध करणे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. ........
ह्या गद्दरांना राष्ट्रीय जीवनातून हद्दपार करा. त्यांचं अजिबात ऐकू नका!”
सरदार वल्लभाई पटेल यांना हायजॅक करण्यास #RSS व भाजपाने इतकी घाई का ? केली हे समजून घेण्यासाठी अगदी मुद्देसुद्द असणारा अत्यंत महत्त्वाचा लेख आहे अगदी आवर्जून वाचा.
#नेहरूंचे_महत्व_नाकारणारी_पटेलवादी_विध्वंसक_तत्वे
+
सरदार वल्लभभाई पटेल हे खरेच जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा मोठे होते ? पंतप्रधानपदावर खरेच नेहरूं ऐवजी पटेल यांचा हक्क होता ? कशामुळे ? नेहरूंऐवजी पटेल पंतप्रधान झाले असते तर भारतीय राष्ट्रीय समाज जीवनात क्रांतिकारक बदल झाले असते ? हे सारे प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे
+
हिंदुत्ववाद्यांनी फार पूर्वीपासून नेहरू विरूध्द पटेल असे द्वंद्व उभे करून ठेवले आहे, हे आहे. नेहरू हे मवाळ होते, आणि पटेल लोहपुरुष होते असा त्यांचा दावा असतो. ते लोहपुरुष कसे होते हे सिध्द करण्यासाठी त्यांनी भारतातील ५६५ संस्थाने नव भारतात विलीन करून घेतली हे त्यांच्या
+
सावरकरांची समुद्रात मारलेली उडी घराघरात पोहोचली पण अजूनही इंग्रजांना चुकवणार्या खालील 4 जणांच्या उड्या लोकांना माहीत नाही
1) क्रांतिसिंह नाना पाटील यांनी अटकेत असताना रेल्वेतून कृष्णेच्या पात्रात मारलेली उडी.
2) वसंतदादा पाटील यांनी पाठीमागून सुरू असलेला इंग्रज पोलिसांचा गोळीबार चुकवत ( यात वसंतदादांचे 2 साथीदार शहिद झाले होते ) दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीत 40 फुटांवरून मारलेली उडी यावेळी कुंडल चे क्रांतिकारक मामासाहेब पवार यांचा ही सहभाग होता.
3) सातारा सेल्युलर जेल फोडून नागनाथअण्णा नायकवडी यांनी कारागृहाच्या भिंतीवरून मारलेली उडी
4)आणखीन एक उडी आहे ज्याची फारशी चर्चा नाही.शिवाजीराव पाटलांनी धुळ्याच्या जेलमधील भिंती वरुन मारलेली उडी. तीस एक फूट तरी नक्कीच होती.ते चिमठाणा येथील साडे पाच लाखाच्या दरोड्यांतले आरोपी होते
भगतसिंग लिहितात..."जेव्हा माणूस पाप किंवा गुन्हा करत असतो तेव्हाच त्याला तुमचा तो सर्वशक्तिमान परमेश्वर त्यापासून परावृत्त का करत नाही? हे तर तो अगदी सहज करू शकतो. त्याने युद्ध करणाऱ्या राजांना का ठार मारले नाही किंवा त्यांच्यातील युद्धाची उर्मी गाडून का टाकली नाही,
आणि याप्रकारे विश्वयुद्धामुळे मानवतेवर पडलेल्या संकटापासून त्याने का नाही वाचवले ? भारताला स्वतंत्र करण्याची भावना त्याने इंग्रजांच्या मनात का नाही निर्माण केली ? उत्पादनाच्या साधनांवर असलेला आपला व्यक्तिगत मालकीहक्क सोडावा अशी भांडवलदारांच्या मनात परोपकाराची भावना तो का उत्पन्न
करत नाही आणि अशा प्रकारे सर्व श्रमिकांचीच नव्हे तर संपूर्ण मानवी समाजाची भांडवलशाहीच्या खोडातून मुक्तता तो का करत नाही? समाजवादी तत्वज्ञानाच्या व्यवहार्यतेविषयी तुम्हाला वाद घालायचा आहे ना, मी तो प्रत्यक्षात उतरवण्याचे काम तुमच्या परमेश्वरावरच सोपवतो.
७० च्या पिढीत मी मोठा झालो. जेंव्हा मी शाळेत होतो आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक निवृत्तीच्या जवळ आलेले आणि गांधी-नेहरूना जवळून पाहिलेले त्यांच्या विचारांनी भारवलेले होते
बहुदा त्यांची ही शेवटची पिढी...
माझे मराठी आणि इतिहासाचे शिक्षक #कॉँग्रेस विचारधारा मानणारे होते पण त्यांनी कधीही आमच्यावर ती थोपवली नाही उलट आम्हाला आमची स्वतःचं मत व्यक्त करायलाच शिकवलं. केंद्रात आणि राज्यात कॉँग्रेसचीच सरकारे होती पण तरीही आमच्या अभ्यासक्रमात #सावरकर होते....
या देशासाठी योगदान देणार्या कोणालाही कॉँग्रेसने कधीच कमी लेखलं नाही.मला आठवतं सावरकरांची " सागरा प्राण तळमळला" ही कविता आमचे हेच कॉँग्रेस विचाराचे असणारे गुरुजी किती तळमळीने डोळ्यात पाणी आणून शिकवायचे आणि ऐकताना आम्ही मूलमुली अक्षरशः रडायचो !!...
बरेच लोक केनियाने पाठवलेल्या १२ टन धान्याची थट्टा करीत आहेत. केनियाला सोशल मीडियावर "भिकारी, गरीब" इत्यादी म्हटले जात आहे. तर एक छोटीशी कथा ऐका..
तुम्ही अमेरिका, मॅनहॅटन, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ओसामा बिन लादेन ही सर्व नावे ऐकली असतीलच.
बहुतेक लोकांनी जे ऐकले नसेल, ते म्हणजे 'केनिया आणि टांझानियाच्या सीमेवर पडणारे 'इनोसाईन' गाव आणि येथील स्थानिक जमात "मसाई"!
अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्याची बातमी मसाई लोकांपर्यंत पोहोचायला कित्येक महिने लागले. आपल्या जवळच्या गावात राहणारी आणि
स्टॅनफोर्ड विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी किमेली नाओमा सुट्टीवर जेव्हा केनियाला परत आली, तेव्हा तिने स्थानिक मसाई लोकांना ९/११ च्या हल्ल्याविषयी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली घटना सांगितली.
एखादी इमारत इतकी उंच असू शकते की ती पडली तर तिच्याखाली दबून इतकी
चहा, कॉफी, भुईमूग अशी केनियात पिकलेल्या १२टन खाद्यपदार्थांची भेट केनियाने भारताला देऊन करोना संकटात आपला मैत्रभाव व्यक्त केला आहे. मुंबईतील कोविड फ्रंटलाईन फायटर्सना मुख्यतः ही अन्नाची पॅकेट्स देण्याची इच्छा त्या देशाच्या भारतातील
उच्चायुक्तांनी व्यक्त केली आहे.
चहा, कॉफी, भुईमूग यांची भारतात वानवा आहे असे नाही. आपण जे देतोय ते अन्नपदार्थ भारतासाठी काही फार मोठे अप्रूप नसणार याची केनियाला कल्पना नाही, असेही नाही. पण थेट आपल्या शिवारातील वानोळा देण्यामागे जी " संकट काळात आम्ही सोबत आहोत " ही भावना या
लहानशा देशाने दाखवली आहे त्याला खरी दानत म्हणतात !
केनियातील माणसे आपण विडिओत पाहतो. काटक शरिराची व कणखर मनाची. तिथल्या वैविध्यपूर्ण निसर्ग व प्राण्यांशी एकरूप झालेली. चित्र विचित्र पोशाखाची. पर्यटकांशी देहबोलीतून हितगुज करणारी. निखळ, निर्व्याज मनाची.