Ajay Profile picture
उद्देश - मराठी घरात गुंतवणूक रुजावी ह्यासाठी प्रयत्न करणे..🔥 स्वप्न - मराठी माणूस म्हणजे 'गुंतवणूकदार' अशी ओळख जगभर झालेली बघणे..✌️🔥

Feb 14, 2023, 17 tweets

Dedicated Freight Corridor म्हणजेच ' रेल्वेच्या फक्त मालगाड्या चालण्यासाठीचा वेगळा रुळ ' हा भारतातील प्रत्येक नागरिकाला मदत करेल असा महत्त्वाचा प्रोजेक्ट..!

पण..

फक्त एक वेगळा रुळ काय बनवला त्यात इतके काय विशेष आहे ???

उत्तर ह्या 👇👇👇 चित्र धाग्यात -
१/n

@dfccil_india

#म

भारतात जगातील सर्वात मोठ्यापैकी असे रेल्वेरुळांचे जाळे आहे..पण..त्या जाळ्यात स्वातंत्र्यानंतरही फारशी वाढ झाली नाही,
कारण-पैसा..!

रस्ते तयार करायला तुलनेने रेल्वेपेक्षा फार कमी खर्च येतो..म्हणून भारताने रस्ते तयार केले..आणि म्हणूनच भारतातील बहुतेक वाहतूक रस्त्याने होते..👇

बरं हे असं प्रवासी वाहतुकीचेच👆 होते असे नाही..तर भारतातील बहुतेक माल वाहतूक ही रस्त्यानेच होते..👇

आता हा १९५१ पासूनचा हा ग्राफ बघा ना..👇

१९५१ला भारतातील ~९०% वाहतूक रेल्वेने आणि ~१०% वाहतूक रस्त्याने व्हायची आणि हा वाहतूक विभागाचा रिपोर्ट २०१२ला आला तोपर्यंतच रेल्वेने ~२५% आणि रस्त्याने
~७५% वाहतूक व्ह्यायला लागली होती ! 👇👇👇

आता तर हे प्रमाण साहजिकच व्यस्त झाले आहे.

मग आता प्रश्न पडतो की वाहतूक कशानेही झाली तर काय फरक पडतो ?

त्याचे उत्तर आहे- पैसा,प्रदूषण न् सोय !

कमीत कमी किमतीत..(पैसा)
कमीत कमी फेऱ्यात..(प्रदूषण)
जास्तीत जास्त सामान..(सोय)

नेता येत असेल तर उत्तम..म्हणून वाहतुकीचे प्राधान्य नेहमी असते👇

सागरी > रेल्वे >> रस्ते >>>विमान

म्हणजेच जमिनीवरील वाहतुकीसाठी रेल्वे वाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतूक आहे ह्यात वादच नाही कारण

जिथे प्रवासी वाहतुकीचा विचार केला बस वाहतूक ही रेल्वेपेक्षा ~ दुप्पट महाग पडते

तिथेच

माल वाहतुकीचा विचार केला तर ट्रक वाहतूक की रेल्वे पेक्षा ~ ५ पटीहून जास्त महाग पडते..🤯🤯

👇👇👇

आणि असे असूनही भारतातील ८०% हून जास्त वाहतूक रस्त्याने होते..😐

ह्याने २ गोष्टी होतात-

१.आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक वस्तूच्या किमतीतील ~१४% किंमत 👇 ही फक्त ती वस्तू वाहतूक करून आपल्यापर्यंत पोचली यासाठी खर्च करावा लागतो..म्हणूनच डिझेलचे भाव वाढले की लगेच महागाई वाढते !

२. आणि ह्या महागाईला फक्त लोकांनाच तोंड द्यावे असे नाही तर उद्योगांनाही ह्याचे फळ भोगावे लागते.

वाहतुकीची किंमत इतर देशांपेक्षा, विशेषतः चीनपेक्षा 👇 जास्त असल्याने आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तू जागतिक स्पर्धेत महाग वाटून बाहेर पडतात !

पर्यायाने निर्यात कमी होते .

पण मग बहुतेक सर्व वाहतूक रेल्वेने करावी म्हटले तर

भारत तुलनेने गरीब व लोकसंख्ये्ने मोठा असल्याने आपल्याला मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वे चालवाव्या लागतात

आणि मग प्रवासी रेल्वेसाठी मालगाड्या वारंवार सिग्नल देऊन थांबवाव्या लागतात..😐

अशाने मालाची एकंदर वाहतूक फार संथ होते..👇

म्हणजे मालाची वाहतूक करायची तर आहे रेल्वेने..पण ती वाहतूक म्हणावी तशी उपयुक्त करता येत नाही..😐

आणि ह्या अडचणीतून भारताला..बाहेर काढायचा मार्ग म्हणजे..DFC..!

संकल्पना तशी सोपी आहे - आधीच्या रुळाच्या बाजूलाच एक नवीन रुळ 👇 टाकायचा..ज्यावरून फक्त आणि फक्त मालगाड्या धावतील..!

आणि त्या खास ट्रॅकनी मुंबई - चेन्नई - कोलकाता - दिल्ली ही चार महानगरे जोडायची..!

आणि का म्हणाल तर -

ही चार महानगरे जोडणाऱ्या 👇 राष्ट्रीय महामार्गांची लांबी ही देशातल्या एकूण महामार्ग लांबीच्या फक्त ०.५% आहे..पण..फक्त ह्या ०.५% वरून देशातील ४०% रस्ते माल वाहतूक होते..🤯🤯🤯

आणि म्हणूनच २००५-०६ च्या रेल्वे बजेट मध्ये DFC स्थापन करण्याची घोषणा तत्कालीन रेल्वे मंत्री लालू यादव यांनी केली..व फक्त DFC साठी २००६ मध्ये DFCCIL ह्या सरकारी कंपनीची स्थापना करण्यात आली.👇

तसे पाहिले तर - DFC प्रकल्प देशाची गरज ओळखून एका पक्षाच्या सरकारने जन्म दिलेला प्रकल्प -

कारणी नेण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या सरकारने कसा जोर लावला ह्याचे छान उदा होऊ शकते..कारण DFC चे बांधकाम २०१६ला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या बजेटनंतर सुरू झाले.

सुरुवात..भारताच्या सागरी वाहतुकीपासून सर्वात दूर असलेल्या भागाला जोडण्याच्या दिल्ली-मुंबई व दिल्ली-कोलकाता नी झाली👇

अशा ह्या DFC च्या वेगळ्या रुळांमुळे फक्त मालवाहतुकीचा वेगच वाढणार नाही (२५किमी/तास ते ६५किमी/तास) 👇

तर

डबल डेकर कंटेनर नेऊ शकत असल्याने एकाच वेळी जास्त टन (सध्या एका वेळी ५४०० ते १२०००टन) सामानही नेऊ शकणार आहे.👇

पर्यायाने देशाच्या पैशाची बचत होईल.

बरं..DFC ने फक्त पैशाचीच बचत होईल असे नाही तर त्याने प्रदूषण ही बरेच कमी होणार आहे.

साधारण २०-३० टन नेऊ शकणारा भारतीय ट्रक धरला तर DFC वरील एका ट्रेनची एक फेरी रस्त्यावरील ४-६०० ट्रक व त्या निगडित प्रदूषण कमी करू शकेल..🤯🤯🤯

👇👇👇

हे झालं..पैसा आणि प्रदूषणचं..आणि सोयचं म्हणाल तर

१.मालगाडी वेगळ्या रुळावर धावली तर प्रवासी रेल्वे अधिक वेगवान व अचूक होतील

२.महामार्गावरील जास्तीची ट्रकची गर्दी कमी होईल.पर्यायाने अपघात कमी व प्रवास वेगवान होईल

सर्वात महत्त्वाचे म्हणजे

३.महागाई कमी होईल न् निर्यातही वाढेल 🤞

टीप - ह्या थ्रेडमधील सर्व माहिती, आकडे व चित्रे विविध सरकारी संकेतस्थळे व सरकारी अहवाल यामधून घेतले आहेत ह्याची नोंद घेण्यात यावी..🙏

#DFC
#Gamechanger
@TheFactFindr

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling