PaisaPani Profile picture
अर्थ विषयावरील सर्व अपडेट्स आपल्या मराठी भाषेत तुमच्यासाठी... 📲Whatsapp- https://t.co/G87QKpUJZs 📲Telegram- https://t.co/oO9DDgqffm 📲YouTube- https://t.co/dwgx70PxBb

Mar 1, 2023, 7 tweets

म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स रेशोवर सेबीची नजर

म्युच्युअल फंडामध्ये आपण जे पैसे गुंतवतो त्यातील काही पैसे या फंडांकडून त्यांचा मार्केटिंग, रिसर्च, कमिशन यासाठी होणारा खर्च भरून काढण्यासाठी वापरले जातात. #म #मराठी #mutualfund #MutualFundsSahiHai

त्यासाठी प्रत्येक फंड आपला एक्सपेन्स रेशो जाहीर करत असतो. म्युच्युअल फंडाच्या स्कीमनुसार एक्सपेन्स रेशो कमी जास्त होतो. या एक्सपेन्स रेशोमध्ये बदल करण्याचे अधिकार म्युच्युअल फंडाकडे असतात. #म #मराठी

मात्र आता सेबीने याबाबत पाऊल उचलण्याचे ठरवल्याचे दिसते. सेबीने सुचवलेला प्रस्ताव मान्य झाला तर म्युच्युअल फंडांना प्रत्येक कॅटेगरी मधील सगळ्या स्कीमला सारखाच एक्सप्रेस रेशो ठेवावा लागेल. #म #मराठी

म्हणजेच जर म्युच्युअल फंडाच्या एकूण दहा स्कीम इक्विटीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या असतील तर त्या प्रत्येक स्कीमला सारखाच एक्सपेन्स रेशो लागू राहील. #म #मराठी

यामुळे ग्राहकांचा फायदा कसा होऊ शकेल?
बऱ्याचदा म्युच्युअल फंड विकणारे एजंट ज्या स्कीमचा एक्सपेन्स रेशो जास्त आहे त्या स्कीम मध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देता. कारण त्यामध्ये त्यांना मिळणारे कमिशन जास्त असते. #म #मराठी

मात्र आता हा एक्सपेन्स रेशो सगळ्या स्कीम मध्ये सारखाच राहिल्याने त्याचा ग्राहकांना तोटा होणार नाही.

सेबीने याआधी सप्टेंबर २०१८ मध्ये एक्सपेन्स रेशोची रचना बदलली होती. #म #मराठी

पैसापाणीचा व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल आताच जॉईन करा.

🎙व्हॉट्सॲप- chat.whatsapp.com/DLkYagsIHB0GCw…

🎙युट्यूबला सबस्क्राईब करा- youtube.com/@PaisaPani/?su…

🎙टेलीग्राम- t.me/paisapani

#म #मराठी

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling