आयपीएलच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सने एक मोठा डाव टाकला आहे. यंदाची आयपीएल रिलायन्सच्या जिओ सिनेमा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर संपूर्णपणे मोफत दाखवण्यात येणार आहे. आयपीएलच्या टीव्ही प्रसारणाचे हक्क स्टारकडे आहेत. #म #मराठी #IPL2023 #IPLonJioCinema
मात्र स्टारच्या जास्तीत जास्त युजर्सला आपल्याकडे वळवण्यासाठी रिलायन्सने आता मोठी खेळी केली आहे.
आपल्या हाताशी असलेल्या तीन मोठ्या केबल नेटवर्क कंपन्या वापरून रिलायन्स जवळपास १ कोटी ७० लाख युजर्सला आयपीएल पाहण्यापासून वंचित ठेवू शकते. #म #मराठी #IPL2023 #IPLonJioCinema
भारतामध्ये एकूण १४ कोटी टीव्ही केबलवर चालतात. या १४ कोटींपैकी १ कोटी ७० लाख टीव्हींवर खालील तीन कंपन्यांचे कनेक्शन्स आहेत.
जी टी पी एल हाथवे - ८० लाख
हाथवे केबल अँड डेटाकॉम लिमिटेड - ४७ लाख
डेन नेटवर्क लिमिटेड - ४० लाख
#म #मराठी #IPL2023 #IPLonJioCinema
गमतीची बाब म्हणजे डेन आणि हाथवे या दोन्ही कंपन्यांमध्ये रिलायन्स मेजॉरिटी स्टेकहोल्डर आहे. जी टी पी एल मध्ये रिलायन्सचा २८% इनडायरेक्ट स्टेक आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे या १ कोटी ७० लाख ग्राहकांना रिलायन्स केबल सेवा पुरवत आहे.#म #मराठी #IPL2023 #IPLonJioCinema
त्यामुळे साहजिकच या ग्राहकांना त्यांच्या बेस पॅकेजमध्ये कोणते चॅनेल्स दिसतील? हे ठरवण्याचा अधिकार आता रिलायन्सकडे आहे. स्टार स्पोर्ट्सच्या एकूण २२ वेगवेगळ्या चॅनेल्सवर यंदा आयपीएलचे प्रसारण होणार आहे. #म #मराठी #IPL2023 #IPLonJioCinema
मात्र रिलायन्सने आपल्या तीन केबल ऑपरेटर कंपन्यांना हाताशी धरून हे चॅनेल्स त्यांच्या बेस पॅकेजमधून काढून टाकले आहेत.
म्हणजे एक एप्रिलपासून या तीन कंपन्यांच्या ग्राहकांना जर आयपीएल बघायची असेल तर त्यांच्याकडे तीन पर्याय आहेत. #म #मराठी #IPL2023 #IPLonJioCinema
१. बेस पॅकेजहून अधिक महाग पॅकेज घेणे
२. स्टार स्पोर्ट्स चॅनेल वेगळे विकत घ्यावे लागेल
३. आपला डिश ऑपरेटर बदलावा लागेल जे आणखी महाग ठरू शकते
हे सगळं रिलायन्सने आयपीएल सुरू होण्याच्या फक्त सात दिवस अगोदर केलेले आहे. #म #मराठी #IPL2023 #IPLonJioCinema
म्हणजे जर स्टार स्पोर्ट्स मॅनेजमेंटला या तीन केबल कंपन्यांशी चर्चा करायची म्हटली तरी त्यांच्याकडे फक्त सात दिवस हातात आहेत. शिवाय स्टार स्पोर्ट्स मॅनेजमेंटला आता या तीन केबल ऑपरेटर कंपन्यांना त्यांना हव्या तशा टर्म अँड कंडिशन्स पुरवाव्या लागतील.#म #मराठी #IPL2023 #IPLonJioCinema
याशिवाय स्टार स्पोर्ट्सवर जे जाहिरातदार करोडो रुपये खर्च करून जाहिराती दाखवणार आहेत त्यांना देखील मनवण्याची मोठी जबाबदारी स्टार स्पोर्ट्स मॅनेजमेंटकडे आलेली आहे.कारण जर हवी तशी व्ह्यूअरशिप मिळाली नाही #म #मराठी #IPL2023 #IPLonJioCinema
तर हे जाहिरातदार स्टार स्पोर्ट्सकडे आपले कॉन्ट्रॅक्ट आणखी कमी किमतीला मिळावे म्हणून निगोसिएशन करू शकतात.
थोडक्यात काय तर रिलायन्सने ऐन मोक्यावर डाव टाकत स्टार स्पोर्ट्स मॅनेजमेंटला खिंडीत गाठले आहे.
मूळ थ्रेड @jshilanjanm
#म #मराठी #IPL2023 #IPLonJioCinema
पैसापाणीचा व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल आताच जॉईन करा.
🎙व्हॉट्सॲप- chat.whatsapp.com/DLkYagsIHB0GCw…
🎙युट्यूबला सबस्क्राईब करा- youtube.com/@PaisaPani/?su…
🎙टेलीग्राम- t.me/paisapani
#म #मराठी #IPL2023 #IPLonJioCinema
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.