, 53 tweets, 30 min read Read on Twitter
नमस्कार, मी निवेदिता खांडेकर. या वर्षीच्या, म्हणजेच २०१९च्या ट्विटरसंमेलनात भाग घेताना अत्यंत आनंद वाटतोय. मला सलग तिसऱ्या वर्षी इथे बोलावल्याबद्दल @marathiword यांचे मनःपूर्वक आभार. #ट्विटरसंमेलन
नागपूर शहर व विदर्भातल्या इतर जिल्ह्यातल्या काही ठळक वारसा वास्तूंविषयी मी आपल्याला माहिती सांगणार आहे. यात काही प्राचीन, पुरातत्वीय अवशेष किंवा इमारती आहेत तर काही बऱ्यापैकी नव्या पण तरीही गेल्या शंभरएक वर्षातल्या आणि अगदी एकच ५० वर्षांहून कमी वय असलेली वास्तू आहे. #ट्विटरसंमेलन
महाराष्ट्राबाहेर तर जाऊच द्या, दूरवरच्या मुंबई-पुण्याकडेही जाऊद्या, पण दुर्दैवानी विदर्भातल्या अनेकांना देखील या समृद्ध वारश्याची ओळख नाही. त्या त्या गावात, शहरात माहिती असते आणि बऱ्यापैकी स्थानिक वर्दळ असते. पण त्या त्या जिल्ह्याबाहेर फारच कमी माहिती असते. #ट्विटरसंमेलन
प्रसारमाध्यमांकडूनही हवी तशी दखल घेतल्या जात नाही. म्हणूनच माझा आजचा प्रयत्न आहे, तुम्हा सर्वांना या गतकालीन वैभवाची ओळख करून द्यावी. तुम्ही आनंद घ्या आणि या अनेक इमारती, जागा इत्यादींना भेट द्या, त्या बघायला जा. #ट्विटरसंमेलन
सर्वात आधी थोडक्यात या परिसराची ओळख. अगदी वनवासात असलेल्या श्रीरामांनी जिथे विश्राम केला असे ‘रामटेक’ पासून, महाभारतकालीन विदर्भनरेशाची कन्या रुक्मिणी असल्याचा उल्लेख आहे. प्राचीन वत्सगुल्म नगरी म्हणजेच आजचे वाशीम. अशी विदर्भाची जुनीच तोंडओळख. #ट्विटरसंमेलन
खुद्द नागपूर शहराच्या अगदी जवळ तीन हजार वर्षांआधीपासून, अर्थातच इसवी सनपूर्व आठव्या शतकापासून मानवी अस्तित्व असल्याचे पुरावे सापडतात. जुनापानी परिसरातील मेहीर समाधीमुळे मेगालिथीक स्मारकांची संस्कृती (Megalithic stone circles) अस्तित्वात असल्याचे संकेत मिळतात.
#ट्विटरसंमेलन
याविषयी अजून माहिती पुढील दुव्यावर मिळेल ... tifr.res.in/~archaeo/paper…

#ट्विटरसंमेलन
सरकारी कागदपत्रांप्रमाणे नागपूर शहराचा पहिला संदर्भ १०व्या शतकात वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे आढळून आलेल्या ताम्रपटावर आहे. या ताम्रपटात नागपूर-नंदिवर्धनच्या विसाया भागातले एक गाव 862 मध्ये राष्ट्रकुटचे राजे कृष्णा (तृतीय) यांच्या काळात दान दिल्याचा उल्लेख आहे. #ट्विटरसंमेलन
तिसऱ्या आणि चौथ्या शतकात वाकाटक राजे, नंतर हा प्रांत बदामीचे चालुक्य, राष्ट्रकुट यांच्या अधिकारात आले आणि त्यानंतर या प्रांतावर यादवांचे साम्राज्य आले. अलाउद्दिन खिल्जीने यादव साम्राज्यावर आक्रमण करून देवगिरीवर ताबा मिळविला. #ट्विटरसंमेलन
त्यानंतर 1317 मध्ये तुघलक आलेत. सतराव्या शतकात मुघलांचा अंमल. परंतु, प्रांतीय प्रशासनाची सूत्रे देवगड नागपूरच्या गोंड राजांकडेच होती. #ट्विटरसंमेलन
देवगड—नागपूर साम्राज्याचे राजकुमार बख्त बुलंद यांनी नागपूरची स्थापना केली; 1743 नंतर रघुजी भोसले यांच्यापासून सुरुवात होऊन मराठा राज्यकर्ते सत्तेवर आलेत व देवगड, चांदा आणि छत्तीसगड या प्रांतांवर त्यांनी 1751 पर्यंत राज्य केले. #ट्विटरसंमेलन
साधारण 1803 ते 1840 पर्यंत सतत मराठा-ब्रिटीश संघर्ष असला तरी मराठ्यांचीच सत्ता होती. राघोजी (तृतीय) यांच्या निधनानंतर 1853 मध्ये ब्रिटिशांनी नागपूरची सूत्रे आपल्या हातात घेतली. या भागाच्या इतिहासाविषयी अधिक माहिती पुढील संकेतस्थळावर मिळेल nagpur.gov.in/mr/%E0%A4%87%E…

#ट्विटरसंमेलन
इतिहासाचा हा धावता आढावा याकरीता की पुढे ज्या ज्या वारसा वास्तूंविषयी मी माहिती देणार त्यांचा साधारण काळ लक्षात यावा. अनेक प्रकाशचित्र मी पोस्ट करणार. बरीचशी माझीच काढलेली प्रकाशचित्रे आहेत. जिथे जिथे मी नेटवरून घेतलेली आहेत, अर्थातच तिथे क्रेडीट दिलेलं असेल. #ट्विटरसंमेलन
सर्वात पहिले नागपूरची खास ओळख असलेला ‘झिरो माईल’ चा स्तंभ. इंग्रजांनी ‘सर्वे ऑफ इंडिया’ ची स्थापना करून आधुनिक नकाशे बनवण्याचे काम सुरु केले. त्यावेळी, तत्कालीन अखंड भारताचा मध्य बिंदू म्हणून नागपूर अंकित करण्यात आहे. त्याकरता भारताचा हा ‘झिरो माईल’. #ट्विटरसंमेलन
नागपूरकरता हा अर्थातच मानबिंदू. पण स्वतंत्र भारताचा हा आता मध्यबिंदू राहिलेला नाही. काहीवर्षांपूर्वी नागपूरच्या उत्तरेला, भोपाळच्या जवळ एका जागेला तो मान दिला, सरकारनी.
#ट्विटरसंमेलन
नाग नदीवरून ‘नागपूर’ हे नाव पडलं. शहराच्या पश्चिमेला असलेल्या अंबाझरीतलावातून उगम होऊन नागमोडी वळणे घेतघेत नाग नदी पूर्वेकडून बाहेर पडते आणि नंतर कन्हान नदीला जाऊन मिळते. नागनदीचा आज नागनाला झाला असला तरीही काही जागा आजही गतकाळाचे वैभव दाखवतात. #ट्विटरसंमेलन
आज भर नागपूर शहरात, अगदी मध्यवर्ती भागात असलेल्या या जागेला म्हणतात संगम; नाग नदी आणि एक छोटी उपनदीचा संगम. आणि त्या संगमावर असलेले संगमेश्वर महादेवाचे देऊळ. #ट्विटरसंमेलन
अनेक छोटी-मोठी देवळे होती, त्यातली दोन मुख्य बऱ्यापैकी स्थितीत आहेत, तर बाकी पडीक. अजूनही या देवळांवर सुंदर कोरीव काम दिसतं. काही अगदी वेगळ्याच मूर्तीपण आहेत. या प्रकाशचित्रांवरून कल्पना येईल. #ट्विटरसंमेलन
नाग नदीच्या किनाऱ्यावरच्या नागपुरात नागोबाची पूजा आजही आवर्जून होते हं.
हे बघा ... आज जरी उघड्यावर विराजमान असले तरीही कधीकाळी यांनाही छान देऊळ होते.
#ट्विटरसंमेलन
मुधोजी (द्वितीय) भोसले यांनी मराठा-इंग्रज (Anglo-Maratha) युद्ध्याच्या आधी सीताबर्डी किल्ला बांधला होता. सीताबर्डी नावाच्या भागात एका टेकडीवर असलेल्या किल्ल्यात नंतर अनेक वर्षे इंग्रजांचा अंमल होता, त्यांचे सैन्य होते.
(प्रकाशचित्र: nagpuronline.in ) #ट्विटरसंमेलन
आताही हा किल्ला भारतीय सैन्याच्या अखत्यारीत आहे. महाराष्ट्र दिन, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला हा किल्ला, खरं तर किल्ल्याचा काही भाग, आम जनतेसाठी खुला करतात.
#ट्विटरसंमेलन
पुढील प्रकाशचित्रे आहेत सोनेगाव तलावाजवळच्या हमामासारख्या structure ची. भोसले काळातील ही जागा सरकार एकदम विसरल्यागत झालेली आहे. मजबूत दगडी बांधकाम असलेली, पायऱ्या चढून जायची, ही वास्तू दुर्लक्षित आहे. चक्क त्याच्या आत क्रिकेट खेळतात जवळपासचे रहिवासी.
#ट्विटरसंमेलन
शहरातल्या दक्षिण-पश्चिम भागातल्या सोनेगाव तलावाजवळचच हे एक भोसले कालीन देऊळ. अश्या बांधणीची अनेक देऊळे नागपूर शहरात आणि आसपास आहेत.
#ट्विटरसंमेलन
पूर्व नागपुरात असलेल्या गांधीसागर तलावा जवळ, ज्यालाच शुक्रवार तलाव देखील म्हणतात, हे १८८८ मध्ये बांधलेले विश्वेश्वर महादेवाचे मंदिर. ह्या मंदिराच्या कोरीव कामाचा एक सर्वात सुंदर नमुना म्हणजे एका भिंतीवर असलेले एक छोटेसे मंदिर, मंदिराची प्रतिकृती. #ट्विटरसंमेलन
पुढची आहे ... जुनी उच्च न्यायालयाची इमारत. मार्च २०१८ मध्ये या इमारतीला पुरातत्व खात्याच्या राष्ट्रीय संरक्षित स्मारकांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

(ज्यादा माहिती करता हे वाचा ... thehitavada.com/Encyc/2018/3/3… )

(प्रकाशचित्र: द हितवाद, नागपूर)

#ट्विटरसंमेलन
विधानसभा इमारत – इंग्रजांनी बांधलेली. याची पायाभरणी १० डिसेंबर १९१२ मध्ये झाली होती. त्याकरता खुद्द तत्कालीन वाईसरॉय आणि गवर्नर जनरल आले होते.

(प्रकाशचित्र: nagpurtoday.in)

#ट्विटरसंमेलन
नागपुरात रेल्वे सेवा जरी १८५३ (भुसावळकडे) आणि १८६१ (कलकत्त्याकडे) पासून सुरु झाली, तरी आजचे हे भव्य स्थानक नंतर बनले. १५ जानेवारी १९२५ रोजी उद्घाटन झालेले हेच ते सुंदर नागपूर रेल्वे स्थानक. त्यासमोरचे इंजिन अगदी अलीकडे बसवले.
(प्रकाशचित्र: en.wikipedia.org/wiki/Nagpur)
#ट्विटरसंमेलन
भारतातल्या अनेक शहरांत असतात तश्या असंख्य ब्रिटीशकालीन इमारती नागपुरातपण आहेत. त्यातल्यापैकी बऱ्याचश्या सरकारी कार्यालयांच्या. नागपुरातही उच्च न्यायालयाची इमारत, वनविभागाचे बंगले असं बरंच काही आहे.
#ट्विटरसंमेलन
त्यातलीच ही एक प्रमुख – रिझर्व बँकेची इमारत. मजबूत दगडी बांधणीची. (प्रकाशचित्र: en.wikipedia.org/wiki/Nagpur#/m…)
एखाद्या शहराच्या जडण-घडणीत जसा तिथल्या राज्यकर्त्यांचा प्रभाव असतो तसाच तिथल्या धनिकांचा पण. नागपूरचे असेच एक श्री कस्तुरचंद डागा होऊन गेलेत. मुळ राजस्थानातल्या या व्यापाऱ्याचे रंगून पासून कराची पर्यंत सगळीकडे बिझिनेस होते.
#ट्विटरसंमेलन
जागोजागी त्यांनी समाजोपयोगी कामे केलीत. नागपुरात रेल्वेस्थानकाच्या जवळ त्यांची मोठी जागा दान दिली. तेच कस्तुरचंद पार्क. जवळजवळ शंभर वर्षांपूर्वीपासून तिथे हे structure आहे, बँड स्टँड नाव.
(प्रकाशचित्र http://164.100.185.246/ehtmldocs/left_link/culture.html )
#ट्विटरसंमेलन
स्वातंत्र्यपूर्व काळातल्या अनेक राजकीय सभा पाहिलेलं हे मैदान आज पुरतं रया गेलेलं आहे. बंजारा समाजाची पालं, अनेक प्रदर्शने, क्रिकेट, दसऱ्याला रावण दहन असे काहीबाही सुरु असते. पण या सुंदर मूळ, राजस्थानी कामाची झलक असलेल्या वास्तूला कुणी वाली नाही.
#ट्विटरसंमेलन
पुढची इमारत नागपूर शहरातली सर्वात तरुण वारसा वास्तू. ओळखलेच असेल - प्रसिद्ध दीक्षाभूमीचे स्तूप.
ही साधारण नव्वदीत पूर्ण झालेली इमारत. ह्याच जागी, खुल्या मैदानात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली दसऱ्याच्या दिवशी धम्म परिवर्तनाची दीक्षा घेतली. म्हणून दीक्षाभूमी.
#ट्विटरसंमेलन
आता प्रवास नागपूर बाहेरचा. विदर्भाच्या सगळ्याच जिल्ह्यांमधून असंख्य वारसा वास्तू आहेत, गेल्या हजारो वर्षांपासूनच्या आहेत. पण नागपुरातल्या काय किंवा विदर्भातल्या काय, सगळ्या गोष्टी इथे वेळेअभावी/जागेअभावी देणे शक्य नाही.
म्हणून काही ठळक वास्तू.
#ट्विटरसंमेलन
मगाशी म्हंटल्याप्रमाणे नागपूर-विदर्भाचा पार रामायणाशी संबंध आहे. रामटेक, जेथे वनवासी राम आरामाकरता टेकले. त्या रामटेकच्या मुख्य मंदिराला म्हणतात ‘गडमंदिर’. हे खरं तर temple complex आहे. वेगवेगळी देवळं असलेलं.
(प्रकाशचित्रे: कार्तिक ठाकूर, nationnext.in/ramtek-lord-ra… )
#ट्विटरसंमेलन
नागपूरच्या अनेकांना आणि बाहेरून येणाऱ्या पण अनेकांना हे गडमंदिर नक्की माहिती असते. पण जे माहिती नसते वा अगदी कमी जणांना माहिती असते ते वेगळंच.
#ट्विटरसंमेलन
रामटेकच्या गडाच्या पायथ्याशी आहे एक पुरातन पाण्याचे टाके, खरं तर छोट्या पाझरतलावाला सुंदर मंदिराचे बाह्य रूप दिलेले. (rainwater harvesting चे उत्कृष्ट उदाहरण). याचे आजचे नाव ‘कपूर बावडी’.
#ट्विटरसंमेलन
रामटेकचे अजून एक वैशिट्य. हेही अनेकांना माहिती नाही. ते म्हणजे किमान हजार वर्षे जुने जैन मंदिर. अत्यंत बारीक, नक्षीदार कोरीव कामाचा उत्तम नमुना.
(प्रकाशचित्र: कार्तिक ठाकूर, nationnext.in/ramtek-lord-ra… )
#ट्विटरसंमेलन
रामटेकच्याच अगदी जवळ आहे नगरधनचा किल्ला. गढीसारखा एकदम वेगळा किल्ला, हा वाकाटक काळातला. भुईकोट किल्ला म्हणतात याला.

#ट्विटरसंमेलन
इ.सनाच्या ४थ्या शतकातले हेच 'नंदीवर्धन', नगरधन अपभ्रंश. गावाच्या पश्चिमेस या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. आत शिरल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तटबंदीवर निरीक्षणासाठी मनोरे केलेले आहेत.

किल्ल्यात पाण्याच्या व्यवस्थेसाठी एक बावडी पण आहे, stepwell.
#ट्विटरसंमेलन
पुढची वास्तू चिखलदऱ्याला असलेला गाविलगढ. चिखलदरा हे विदर्भातले थंड हवेचे ठिकाण. सातपुडा पर्वतराजीत वसलेले. ह्याच ठिकाणाहून उत्तरेतून येणाऱ्या दुष्मनीफौजांना दख्खनमध्ये प्रवेश असायचा, म्हणून हे दख्खनचे प्रवेशद्वार म्हणतात.

#ट्विटरसंमेलन
१४व्या शतकात बहामनी सुलतान, १६व्या शतकात मोगलाई, १८व्या शतकात मराठे आणि नंतर इंग्रज, अश्या अनेकांच्या हातातून जात, आज फक्त भग्नावशेष उरला आहे. इथे देखील पाण्याची टाकी आहेत, मोठाले दरवाजे आहेत आणि एक जुनी मशीद. ह्याचा कारभार वनखात्याकडे, कारण किल्ला वनक्षेत्रात आहे.
#ट्विटरसंमेलन
जगप्रसिद्ध लोणार सरोवर जवळ जवळ सगळ्यांनाच माहिती असतं. पण तिथे असंख्य सुंदर सुंदर पुरातत्वीय वास्तू आहेत हे फार कमी जणांना माहिती असतं. असंच एक सुंदर ... गायमुख मंदिर टाके (Gaimukh temple tank).
(प्रकाशचित्र: commons.wikimedia.org/wiki/File:Gomu… )
#ट्विटरसंमेलन
बाळापुरचा किल्ला, जिल्हा अकोला. औरंगझेबाच्या मुलांनी म्हणजे मिर्झा आझम शाहनी बांधायला सुरु केलेला पण एलीचपूरच्या नवाबानी १७५७ साली पूर्ण केलेला. जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वी पुरानी फार नुकसान केलं, नंतर तो दुरुस्त केल्या गेला.
(प्रकाशचित्र: jnvakola.org.in/english-visiti… )

#ट्विटरसंमेलन
अकोला जिल्ह्यातच आहे बार्शी टाकळी. हे तेथील कालिका मंदिर. सरकार दफ्तरी भवानी मंदिर पण म्हणतात. बांधकामाचा नक्की कालावधी मला नाही माहिती.
(प्रकाशचित्र: पुरातत्व विभाग asinagpurcircle.org/ifm/Akola,%20B… )

#ट्विटरसंमेलन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनातली अनेक वर्षे सेवाग्राम येथे घालवली. तिथली बापू कुटी हा सर्वांसाठी अमूल्य ठेवाच आहे. जेव्हा जेव्हा गांधीजी इथे असत, देशाचा कारभार इथूनच चालायचा.
(प्रकाशचित्र: mkgandhi.org )
#ट्विटरसंमेलन
पुढची जागा, आणि या ट्वीट-प्रवासातली शेवटची जागा, म्हणजे विदर्भातले माझे सर्वात आवडते ठिकाण. वैनगंगा नदीच्या किनारी असलेले मार्कंडीदेवस्थान. याला मार्कंडा असे पण म्हणतात.
इथे वैनगंगा उत्तरवाहिनी असल्यामुळे या जागेला विदर्भातली काशी मानतात.
#ट्विटरसंमेलन
नवव्या शतकातल्या बांधकामाचे हे देऊळ म्हणजे विदर्भातले खजुराहोसारखे temple complex, फक्त तितके मोठे नाही आणि त्याइतके नावाजलेलेही नाही. त्यामुळे अर्थातच दुर्दशा.
ही काही नक्षीदार उदाहरणे.
#ट्विटरसंमेलन
गडचिरोली पासून अगदी ३०-odd किमी वर असलेल्या ह्या देवस्थानात मार्कंड ऋषींचे मंदिर आहे कारण ही त्यांची तपोभूमी होती असे सांगतात.
असंख्य कोरीवकाम केलेले दगड विखुरलेले आहेत, तरीही स्थानिक लोकांचा नेहमी राबता आहे. शिवरात्रीला मोठी जत्र भरते.
#ट्विटरसंमेलन
वैनगंगेच्या अगदीच किनाऱ्यावर असलेल्या ह्या मंदिराला खरं तर जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान हवे. पण एकूणच स्वतः दुर्लक्षित राहिलेल्या पुरातत्व विभागाला या जागेची आठवण येऊन ह्याचे conservation करावे असे कधी वाटेल कोण जाणे.
#ट्विटरसंमेलन
विदर्भातल्या पुरातत्व खात्याच्या वारसा स्थळांची यादी ... ही central government ची यादी.
http://121.242.207.115/asi.nic.in/alphabetical-list-of-monuments-maharashtra-nagpur/
#ट्विटरसंमेलन
तर असे हे वैभव नागपूर विदर्भाचे. जरासे माहिती, बरेचशे दुर्लक्षित. तरी यात चंद्रपूरचे, भंडाऱ्याचे, यवतमाळचे, अमरावतीचे काही नाही. काहीच ठळक जागांचीच माहिती दिली. मला आशा आहे की या ट्वीट व्याख्यानामुले याविषयी उत्सुकता वाढीस लागून तुम्ही सर्व हे बघायला नक्की याल.
#ट्विटरसंमेलन
आज मला आपल्यासर्वांना नागपूर शहर आणि विदर्भातल्या वारसा स्थळांविषयी सांगण्याची संधी दिल्याबद्दल @marathiword चे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. आपणा सर्वांचे पण धन्यवाद. (इति)
#ट्विटरसंमेलन
Missing some Tweet in this thread?
You can try to force a refresh.

Like this thread? Get email updates or save it to PDF!

Subscribe to Nivedita Khandekar
Profile picture

Get real-time email alerts when new unrolls are available from this author!

This content may be removed anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member and get exclusive features!

Premium member ($3.00/month or $30.00/year)

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!