Profile picture
, 15 tweets, 19 min read Read on Twitter
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट गावातले दत्ता असलकर नावाचे शेतकरी. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांनी दोन गायी विकत घेतल्या , एक गाय ७०००० रुपयांना पडलेली.दुष्काळाची तीव्रता जशी वाढली तशी चाऱ्याची टंचाई वाढली.
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
त्यामुळे ह्या गायी विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. गायींसाठी पाच लाख खर्चून बांधलेला गोठा रिकामा पडलेला आहे. कारण ह्या गायी सोबत त्यांच्या आधीच्या चार अश्या एकूण सहा गायी विकाव्या लागल्यात.त्याही फक्त २५००० रुपयांना एक ह्या प्रमाणे
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
सगळा व्यवहार फक्त तोट्याचा.उपलब्ध सरकारी आकडेवारी नुसार एकट्या भूम तालुक्यात ८९००० प्राणी आहेत ( गायी-म्हशी ) दुष्काळाची तीव्रता अशी आहे कि पर्यायी उत्पन्नाच साधन असलेल पशुधन गमवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
“ एरवी एक गाय ७०००० रुपयाला गेली असती तिला आज ३०००० रुपयांना विकण्याची वेळ आलीय , पर्याय उरला नाही “ ह्याच ईट गावातले शंभूराजे देशमुख हे शेतकरी सांगतात.
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
चारापाण्याची टंचाई असताना सरकारने तातडीने गुरांच्या छावण्या सुरु करणं अपेक्षित आहे मात्र सरकारी पातळीवर हालचाल नाही. 'एकट्या भूम तालुक्यात किमान १८७ छावण्या सुरु करण गरजेच असताना अजून एकही सुरु झालेली नाहीये' पत्रकार समाधान डोके
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
गावातले सामाजिक कार्यकर्ते प्रतापराजे देशमुख सांगतात,सध्याच्या काळात दुधव्यवसाय हाच शेतकऱ्यांच जगण्याचा एकमेव साधन असल्याने शेतकरी हताश झालेत भूम मधलं दूधसंकलन ३५०००० ली आहे पाथरूड गावातला खवा थेट मुंबई बाजारात विकायला जात होता
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
अश्या स्थितीत छावण्या अनिवार्य आहेत.चाऱ्याची पेंढी मागच्या आठवड्यात ४० रुपयाला झालीय. गायीला रोज किमान सहा पेंढ्या लागतात. रोजचा खर्च २४० रुपये. पशुखाद्य-औषधपाणी ह्याचा खर्च रोजचा ६० रुपये धरला तर एक गायीला रोज ३०० रुपये लागतात.
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
साधारण गायीपासून रोज १५ लिटर दुध मिळत, त्याचा आजचा भाव २० रुपये. उत्पन्न झालं ३०० रुपये आणि खर्च तेवढाच. मग शेतकऱ्याने जगाव कस ? असा प्रश्न विचारतात शिवाजी बारहाते, पाथरूड गावातले.
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
जर छावण्या सुरु झाल्या तर चाऱ्याचा खर्च कमी होईल सोबतच पाण्यासाठी वणवण कमी झाली तर तो खर्च कमी होईल , मग कुठेतरी खर्च आणि उत्पन्न ह्याचा मेळ बसेल.
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
पाथरूड गावातल्या अप्पासाहेब चव्हाण ह्या शेतकऱ्याने आपली ज्वारी दोन गायी आणि एक म्हशीला खायला काढली आहे. ते म्हणतात, "माझ्याकडे चारा नाहीये आणि ज्वारी बाजारात नेऊन भाव मिळणार नाही त्यापेक्षा तीच जनावरांना खाऊ घातलेली काय वाईट ?"

#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
मग छावण्या सुरु का होत नाहीत?

जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने सरकारला अहवाल पाठवलाय, इथे हिरवा चारा उपलब्ध आहे जो १५ मार्च पर्यंत पुरेल. मग छावण्या कशा सुरु होतील ? असा प्रश्न ज्येष्ठ स्थानिक पत्रकार महावीर जालन ह्यांनी विचारलाय.

#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
पूर्वी सरकार दुष्काळात नोव्हेंबरमध्ये छावण्या सुरु करायचं त्यामुळे कमी किमतीला जनावर विकण्याची अगतिकता नव्हती अस असलकर म्हणतात. श्री.असलकर कट्टर शिवसैनिक आहेत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत २०१७ ला सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढलेले आहेत.

#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
चारा छावण्या जर सरकारला भ्रष्ट्राचाराचे कुरण वाटत असतील तर छावण्या सुरु करून त्याची कडक तपासणी, आठवड्याला ताळेबंद , पडताळणी असे अनेक उपाय आहेत.

#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
भ्रष्ट्राचार होतो म्हणून छावण्या उघडायच्या नाहीत हे कुठल नियोजन ? ह्या गायींच्या किमती मध्ये झालेली घट आणि चाऱ्याचे आभाळाला भिडलेले भाव ह्याला गोवंश हत्याबंदी कायदाही कारणीभूत आहे.
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
महाराष्ट्राच्या भीषण दुष्काळावर पत्रकार @ameytirodkar यांनी @newsclickin साठी लिहिलेली #MahaDrought हि मालिका @marathi_netive साठी @AnandShitole यांनी भाषांतरीत केली आहे.

#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
#महादुष्काळ१
Missing some Tweet in this thread?
You can try to force a refresh.

Like this thread? Get email updates or save it to PDF!

Subscribe to sahil
Profile picture

Get real-time email alerts when new unrolls are available from this author!

This content may be removed anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!