Sahil Kalloli Profile picture
You may say I'm a dreamer, But I'm not the only one
May 6, 2020 30 tweets 11 min read
#छत्रपती_शाहू_महाराज (कोल्हापूर):(२६ जून १८७४–६ मे १९२२) महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती, थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद तसेच अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. राजांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी हा थ्रेड

#लोकराजा
१ १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला; त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.

#लोकराजा
Apr 9, 2019 15 tweets 19 min read
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट गावातले दत्ता असलकर नावाचे शेतकरी. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांनी दोन गायी विकत घेतल्या , एक गाय ७०००० रुपयांना पडलेली.दुष्काळाची तीव्रता जशी वाढली तशी चाऱ्याची टंचाई वाढली.
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना त्यामुळे ह्या गायी विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. गायींसाठी पाच लाख खर्चून बांधलेला गोठा रिकामा पडलेला आहे. कारण ह्या गायी सोबत त्यांच्या आधीच्या चार अश्या एकूण सहा गायी विकाव्या लागल्यात.त्याही फक्त २५००० रुपयांना एक ह्या प्रमाणे
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना