My Authors
Read all threads
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोना विषाणू संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले:
लॉकडाऊन करून आजचा ७-८ वा दिवस निघून गेला, आपल्याला कल्पना पण आली नाही. ही लढाई अजूनही चालू आहे. या लढाईमध्ये जसे दिवस जात आहेत, तसे आपण आपली पकड मजबूत करत चाललेलो आहोत. पण अजूनही हे युद्ध संपलेले नाही आहे.
या लढाईमध्ये आपला संयम आणि आपली जिद्द ही आपली तटबंदी आहे. या तटबंदीवर त्या विषाणूने कितीही टकरा मारल्या तरी आपण लेचेपेचे नाही आहोत. आपल्या आत्मविश्वासाची, संयमाची, जिद्दीची तटबंदी ही मजबूत आहे.
मी परवा नायडू हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी बोललो. मला असं वाटलं की किट आणि मास्क घातलेला एखादा गणवेशधारी सैनिकच मला समोर दिसत होता.
"कोणाचाही पगार आपण कपात केलेला नाही, त्याची आपण टप्प्यात विभागणी केली आहे."
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
जिथे जिथे आपल्याला पॉझिटीव्ह रुग्ण सापडतात, त्यांच्या अलीकडचे आणि पलीकडचे आपण संपर्क शोधतो आणि त्यांच्यापासून इतरांना कोणाला संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेत आहोत.
-
AC चा वापर कमी करा, साधं पाणी प्या, गरम पेय प्या एकूणच अॅलर्जीपासून दूर रहा. सर्दी खोकल्यापासून दूर रहा.
आज सुद्धा अनेक ठिकाणी खाजगी डॉक्टर्स आहेत त्यांचे दवाखाने त्यांनी बंद ठेवले आहेत. मी त्यांना पुन्हा सांगतो की तुमची आज नितांत गरज आहे, एका बाजूला हॉस्पिटलमधील कर्मचारी जीवावर उदार होऊन अहोरात्र मेहनत करत आहेत, आपण सुद्धा पूर्ण काळजी घेऊन आपला दवाखाना उघडा.
साधारणत: हजार एक केंद्रे आपण सुरू केलेली आहेत, सर्व मजुरांची काळजी घ्यायला, त्यांना जेवण देण्यासाठी. किमान दोन सव्वादोन लाख मजुरांची आपण जेवणाची व्यवस्था केली आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा साठा, अन्नधान्याचा साठा हा आपल्याकडे पुरेसा आहे, मुबलक आहे. त्याच्यात कुठेही टंचाई होणार नाही, होऊ देणार नाही.
मेडिकल शॉप्स, फार्मसी, दिवसरात्र काम करणारे ST, BEST चे कर्मचारी आहेत, मला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आपण सगळे २४ तास घरी जरी असलो तरी ही सगळी लोकं २४ तास आपल्यासाठी रस्त्यावर आहेत.
"एकच मंत्र, अनावश्यक गर्दी करायची नाही."
-
"हे संकट आहे, हे युद्ध आहे, या युद्धामध्ये आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच!"
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with CMO Maharashtra

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!