अमुक अमुक कारणामुळे हिंसा योग्य आहे अशी समर्थनं स्वतःला पुरोगामी, संविधानवादी म्हणवणाऱ्यांकडून येणं हिंदुत्ववाद्यांना अधिक चिथावणी देणारं तर आहेच, परंतु +
गोरक्षांची हिंसा होते तेव्हा "तुमच्या गाई चोरल्या असतील तर पोलिसांत तक्रार द्या...स्वतः कायदा हातात घेऊ नका" असं म्हणणारे लोकच मोठ्या संख्येने आहेत भारतात. आपला चरितार्थ ज्या पशूंवर अवलंबून आहे, +
अश्या परिस्थितीत जर कुरमुसे मारहाणीसारख्या घटना घडत असतील तर त्याने परिस्थिती अधिक चिघळणार नाही का? +
हा विचार दोन्हीकडील पक्ष समर्थक व कार्यकर्ते करतीलच असं नाही. कारण त्यांच्या प्राथमिकता, त्यांच्या भूमिका ठरलेल्या आहेत. +
आपण गोरक्षकांच्या हिंसेवर तुटून पडत असू तर यावेळी विरुद्ध भूमिका घेऊन चालणार नाही - हे कळणं तसं फारसं अवघड नाही. परंतु, असं दिसतंय की हे भान भले भले पत्रकार, विचारवंत हरवून बसले आहेत. +
बाकी, पुरोगामी आहात, सुज्ञ असालच.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com