फक्त आंबेडकर कळाले,वाचले, आत्मसात केले, अन् आचरणात आणले म्हणुन ...
नाही अजिबात नाही .....सांगतो👇
#म
#AmbedkarJayanti
नाव ठेवलं गेलं अन् आडनाव लावलं की एका धर्माचा झालो.
शाळेत जायला लागलो की नावापुढे जात आली.
थोडफार शिक्षण घेतलं की उपजात कळायला लागली.
#बाबासाहेब_आंबेडकर
जसं की.... हा भीमाचा, हा महाराचा, तो मांगवाड्यातला, ते खालच्या जातीचे.......
काही गोष्टी कानावर पडून त्याबद्दल मत तयार झालं.
जसं की.... काय लावलाय तसला महार मांगी तमाशा...
#जयभीम
त्यावेळेस लक्षात न आलेली गोष्ट...
एखाद्या सणवार असला की त्यांना लावल्या गेलेल्या सवयीप्रमाणे रात्री उशिरा अगर दुसऱ्यादिवशी सकाळी त्यांनी भाजीला तांब्या अन् ताट घेऊन यायचं .
#AmbedkarJayanti
गावात थाटामाटात घर तुमचं अन् त्यांचं मात्र पत्र्याच ते पण गावाच्या बाहेर. का?
#Ambedkar
का नाही त्यांना माणूस म्हणून स्वीकारलं कधी का .
पाडल्या असतील जाती कोणी तरी पण का पोसल्या आम्ही.
त्यांनी रक्ताच पाणी केलं आमच्यासाठी अन् आम्ही त्यांचंच रक्त पित राहिलो.
#AmbedkarJayanti
परत एकदा बाबासाहेब तुम्हाला माझा मानाचा मुजरा अन् कोटी कोटी नमन 🙏
जय भीम जय भीम 🙌
~शुभम गरड
#म
#मराठी
#बापमाणुस
#AmbedkarJayanti