इग्नाईटेड माइन्ड्स मध्ये कलामांनी एक प्रसंग सांगितला आहे. सॅटेलाइट लॉंचिंग व्हेईकल (SLV) बनवण्यासाठी भारताला बेरिलीअम डायफ्राम ची गरज होती. कुठे मिळतात? माहीत झालं- न्युयॉर्कमध्ये! अमेरिकेला भारताने वरील डायफ्राम मागितले.
मग जरा शोध घेतला गेला, कसे बनतात हे बेरिलीअम डायफ्राम? उत्तर मिळालं जपान बेरिलीअम शीट बनवतं आणि अमेरिकेला निर्यात करतं.
भारत काही विशिष्ट भावाने हे बेरिलीअम खनिज जपान ला निर्यात करतो; जपान त्याच्या शिट्स बनवून दहापट भावाने अमेरिकेला विकतो आणि अमेरिका त्याचे डायफ्राम बनवून शंभर पट भावानेही भारताला
हे आठवायचं कारण हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन नावाचं औषध अमेरिकेने भारताला कोरोना उपचारासाठी मागितलं. एकूण काय काळ कुठलेच हिशोब बाकी राहू देत नाही.जगात प्रत्येक action ला reaction आहे असं न्यूटन म्हणतो.