"आजपासून मी घरीच राहणार.....तेही तुझ्यासोबत. आता आपण आपला वेळ एकत्र घालवू...👇
"अहो कोणाला सांगताय हे ....मी अर्धागिंनी आहे तुमची...मला सर्व समजते... लाॅकडाऊन मुळे मंदिर बंद केलय.....नाहीतर गेली अठ्ठावीस युगे भक्तासाठी विटेवर उभा राहीलेले तुम्ही..👇
देवाची लबाडी रुक्मिणीदेवीच्या ध्यानात आली होती.
"तस नाही पण आता मी ठरवलंय तुला वेळ द्यायचा.."
"अरे वा रोज काकडआरतीला घराबाहेर पडून शेजआरती झाल्यावरच घरी येणारे तुम्ही केवळ या लाॅकडाऊनमुळे घरी बसलात.. आणि म्हणे वेळ देणार"
बर ते जाऊ दे आता आपण👇
"तुम्हाला बोलायला काय जातंय...घरात सर्व दासदासींना मी पगारी सुट्टी दिलीय..मला खुप काम आहे..."
समोर ठेवलेले एक बत्तासे तोंडात टाकत देवाने सांगीतले "रुक्मिणी तुझं काम लवकर आवर तोपर्यंत मी नारदाकडून जरा आजूबाजूला काय चाललंय याची माहिती घेतो.,👇
"मी मदत करायची..अग मी वैकुंठाचा राजा आहे ...तु मला काम लावणार..."
हो आता ते सर्व विसरा...दोन आठवडे मला मदत करायची..
हो केली असती पण मला काय येणार त्यातले.👇
"तुम्हाला काम येत नाही....माझ्या लक्षात आहे सार..."
"काय ते"
"तुमची काम"
"कोणती"
चोखोबांची गुरे राखलीत, त्या जनीसोबत जात्यावर बसून तिला दळण दळू लागलात, नाथांच्या घरी पाणी भरले, नामदेवाच्या घरी पंक्तित तुम्ही जेवण वाढायला होता👇
देव नजर चुकवत चाचपरत बोलू लागले "अग ते म्हणजे....."
आणखी सांगते ना सावतामाळ्याच्या शेतात भाजी पिकवायला जायचा, गोरोबाकाकांची मडकी भाजलीत, दामाजी पंताचे कर्ज फेडले, तुकोबांच्या आवलीच्या पायातील काटा तुम्ही काढलात पण घरी बायकोचे एक 👇
बर ठिक आहे अडला हरी .... अस म्हणत देवांने समोरच्या टेबलावरील आवराआवर करायला घेतली.
तुम्ही काहीच करू नका फक्त स्वस्थ बसून रहा. मी सारा स्वयंपाक केलाय तुमच्या आवडीची भाजीभाकरी केलीय. बर्याच दिवसांनी संधी आलीय आपण दोघे मिळून जेऊया.👇
नारदमुनी देवाच्या कानी लागले.. तसतसे रुक्मिणीकांताच्या चेहर्यावरील 👇
देवांनी नारदाला निरोप दिला आणि आवरायला घेतले.
हे काय?...कुठे चाललात.?..आणि हे बॅगेत काय भरलय?
देवीच्या प्रश्नांनी श्रीरंग भानावर आले.
हे काय हा खाकी युनिफॉर्म, हे स्टेथॅस्कोप, हा झाडू हे काय घेतलंय...कुठे चाललाय तुम्ही..?
रुक्मिणी मला जायला हवं....👇
रुक्मिणीदेवीलाही यातच आनंद होता...
रस्त्यावर सावळा पांडू हवालदार कमरेवर हात ठेवून विटेवरून उतरून वाटेवर उभा होता.. त्याचा भाजीभाकरीचा डबा त्याने रस्त्यावरील👇