प्रिये बघ ना,
देशाची सेवा करता करता
समाजाला शिस्त लावता लावता,
अखेर मी ही संक्रमित झालोय,
मला आणखी जगायचं होतंं
#कोरोना शी अजुन लढायचं होतं,
कायमचं त्याला हद्दपार करुन
मग घराकडंच निघायचं होतं,👇 @DGPMaharashtra
कारण मी ही संक्रमित झालोय....
प्रिये,
अाता घर कायमचं सुटलं
मरणाचं अखेर नभं दाटलं,
उघड्या डोळ्यासमोरच आता
बघ माझंही सरण पेटलं,
मी आॅनड्युटी परका होऊन गेलोय
कारण मी ही संक्रमित झालोय...
प्रिये,
तुला वेळ द्यायचं राहुन गेलं
आता होत्याचं नव्हतं झालं, 👇
देवदुत बनुन तरी कोण आलं,
आयुष्यभर नुसताच विरह पिलोय
पण आता मीच संक्रमित झालोय,...
प्रिये,
जवळ माझ्या येऊ नको
थोडं दुरुनच तुझं प्रेम दे,
उणीव माझी जाणवेल पण
आता लेकरांसाठी श्रम घे,
जवळ असुनही आता दुर गेलोय
कारण मी ही संक्रमित झालोय...👇
सांग त्यांना ठणठणीत आहे,
जमलं तर नक्कीच येईल घरी
कारण सगळेच आता आठवणीत आहे,
माफ कर मी परस्परच चाललोय
कारण मी ही आता संक्रमित झालोय.
प्रिये,
घरी आलोच तर अनर्थ होईल
हा पोलीस बाप तुमचा काळ होईल,
त्यापेक्षा नकोच हा विध्वंस सखे
मी श्वास अखेरचा इकडेच घेईल👇
कारण मी ही संक्रमित झालोय.....
मी ही आता संक्रमित झालोय...
कविता कोणाची आहे माहित नाही. पोलीस बांधवांशी निगडीत आहे. आवडली, म्हणून टाकत आहे......🙏. RT