@sachin_rt 👏
"तमाम क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवत, २४ वर्ष स्वप्नवत समाधान देणारा जादुगार फक्त तूच होतास...
निम्मे आयुष्य आणि संपूर्ण बालपण आम्हाला दत्तक घेऊन मनमुराद आनंद देणारा फक्त तूच होतास... १/९
#HappyBirthdaySachin ❣
#मराठी

प्रतिस्पर्ध्याच्या विजयातील अडसर,
आपल्या विजयाचा शिल्पकार,
सामना पाहण्याचे आणि न पाहण्याचे कारण फक्त तूच होतास...२/९
#HappyBirthdaySachin ❣
#मराठी

शेकडो आले..शेकडो गेले..
निळ्या कपड्यातील नंबर '1'…
शुभ्र कपड्यातील नंबर '4' कायम तूच होतास.
'Bradman'ची प्रतिमा
'Shane Warne' चे भयस्वप्न
'Lara' चा हिरो आणि क्रिकेटचा मानदंडही तूच होतास...३/९
#HappyBirthdaySachin ❣
#मराठी

समोरच्या टीम मिटिंगचा 'Agenda' फक्त तूच होतास.
कसोटी हरल्यामुळे 'Man of The Match' घ्यायला न येणारा,
रणजी सामना जिंकल्यावरही लहान मुलासारखा नाचणारा क्रिकेटवेडा तूच होतास...४/९
#HappyBirthdaySachin ❣

वडिलांच्या निरोपाला धैर्याने तोंड देवून
पुढच्या क्षणाला देशासाठी धावणारा
आमच्या देशाचा खरा 'Family Man' तूच होतास...
'Cover Drive' चे पहिले प्रेम…'Upper Cut' चा जन्मदाता 'Paddle Sweep'चा कलाकार. ६/९
#मराठी

मुंबईचा 'तेंडल्या'…
क्रिकेटप्रेमींचा 'God'…
भारताचा 'कोहिनूर'…
आणि क्रिकेट जगताचा 'मास्टर'..
२२ यार्डांचा सर्वेसर्वा फक्त तूच होतास...७/९
#HappyBirthdaySachin ❣
#मराठी

पण आमच्यासाठी खेळाची ओळख फक्त तूच होतास.
इथून पुढेही खेळ चालूच राहील…
खेळाडू होतील…
विक्रमही होतील…
पण तुझी सर त्याला कधीच येणार नाही…
कारण तुझ्यासारखा फक्त तूच होतास...८/९
#HappyBirthdaySachin ❣
#मराठी

#HappyBirthdaySachin ❣
#HappyBirthdaySachinTendulkar
#TheGod
#Sachinism
#SRTForever
#SachIsGod
#मराठी
