SANDESH BHAGWAT Profile picture
🅾+ | काॅफी ☕ IS IN MY BLOOD 😘 |TREKKING SOUL❣| |PROUD NON DRINKER & NON SMOKER 💪 |BIKER, TRAVELLER ✈ MUSIC 🎧| |LIVESTRONG🔥 |PHOTOGRAPHY 💓| NEVER GIVE UP|
Dec 19, 2022 11 tweets 3 min read
"नाव: किलियन एमबाप्पे..!!!❤
वय २३ वर्षे.
@KMbappe

फुटबॉल विश्वचषकाच्या ९२ वर्षांच्या इतिहासातील दुसराच खेळाडू, ज्याने अंतिम फेरीत हॅट्ट्रिक गोल केला.
अर्जेंटिनासमोर ७९ मिनिटे गुडघे टेकलेल्या संघाचे एमबाप्पेने सिंहात रूपांतर केले. बर्‍याचदा चित्रपटांमध्ये शेवटच्या क्षणी नायक येतो आणि सगळा खेळ फिरवतो.
८० व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या खेळाडूच्या चुकीमुळे फ्रान्सला पहिली पेनल्टी मिळाली आणि एमबाप्पेने चेंडू गोलपोस्टमध्ये मारला. मेस्सीच्या पहिल्या विश्वचषक विजयाच्या सेलिब्रेशनची वाट पाहत जगाने श्वास घेतला होता.
Jun 29, 2020 4 tweets 2 min read
'जुन्नर तालुक्याचा ताजमहाल म्हणजेच हापूसबागचा हबशी घुमट किंवा सौदागर घुमट.'

१७ व्या शतकातील निजामशाही राजवटीतील मुघलकालीन स्थापत्य शैलीचा एक अनोखा नमुना.
आफ्रिकेतील हाबसन प्रांतातून आलेल्या निजामशाहाचा वजीर मलिकांबर जुन्नर येथील हबशीबाग येथे वास्तव्यास होता.

#हबशीघुमट
#जुन्नर आज याच हबशीबागचा उल्लेख हापुसबाग असा करण्यात येतो.
ऊंचच ऊंच 55 फुट रुंद व 60 फुट लांब कोरीव शिळेतील चौरसाकृती ही वास्तू लक्ष वेधून घेते.
साधारण 50 फुट ऊंचीच्या नक्षीदार भिंतीवरील कमानीवर 30 फुट उंच असलेला वरील घुमट अलगद तोलुन धरल्याचे एक उत्कृष्ट उदाहरण पहावयास मिळते...
Apr 24, 2020 10 tweets 8 min read
🙏"तूच होतास.. तूच आहेस.. तूच राहशील"🙏

@sachin_rt 👏

"तमाम क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवत, २४ वर्ष स्वप्नवत समाधान देणारा जादुगार फक्त तूच होतास...

निम्मे आयुष्य आणि संपूर्ण बालपण आम्हाला दत्तक घेऊन मनमुराद आनंद देणारा फक्त तूच होतास... १/९

#HappyBirthdaySachin
#मराठी नव्वदच्या दशकात क्रिकेट जगताच्या तोफखान्यासमोर अखंड भारताची 'Batting Order' तूच होतास.

प्रतिस्पर्ध्याच्या विजयातील अडसर,
आपल्या विजयाचा शिल्पकार,
सामना पाहण्याचे आणि न पाहण्याचे कारण फक्त तूच होतास...२/९

#HappyBirthdaySachin
#मराठी