मोठा मुलगा पायगोंडा शेतात काम करत होता. त्याला शेती बंद कराय सांगितलं व आष्ट्याच्या शाळेत शिकायला पाठवलं.
पायगोंडा जैन चतुर्थ समाजातून सातवी पास होणारा #सातारा जिल्ह्यातला पहिला माणूस ठरला.
तो महसुली खात्यात नोकरीला लागला. नोकरीनिमित्त पायगोंडा कराडात राहू लागला. आपल्या पोरांबरोबर भाड्याच्या ब्राह्मणाच्या घरात तो मांगाच्या पोरांना शिकवत असे.
त्याला चार मुलं आणि दोन मुली झाल्या. तात्यासाहेब कोल्हापूर संस्थानात वकिल झाला. बळवंतराव मेट्रिक होवून अबकारी खात्यात लागला. बंडेद्र पोलीस खात्यात लागला. आणि चौथा सधन पाटील “भाऊराव” होता.
पण भाऊराव “कर्मवीर” झाला.
#शाहूंची_लेकरे #कर्मवीर #भाऊरावपाटील