#महाभारत
"तुला कधीच ह्याचे सत्य माहित होणार नाही!!", एक शांत वयोवृद्ध आवाज त्याचा कानी पडला. संजयने आवाज आलेल्या दिशेला पाहिले तर त्याला एक साधू तिथे दिसला.
साधू म्हणाला, "महाभारत हे एक महाकाव्य आहे - एक वास्तविकता आहे परंतु त्यापेक्षा अधिक ते एक तत्वज्ञान आहे." आणि एवढे सांगून तो हसू लागला. साधूचे हसणे पाहून संजय अजून जास्त भ्रमित झाला आणि विनंती करू लागला की, "मला तुम्ही ते तत्त्वज्ञान सांगू शकतात का?"
डोळे(दृश्य)
कान(आवाज)
नाक(गंध)
जीभ(चव) आणि त्वचा(स्पर्श).
आणि कौरव म्हणजे १०० दुर्गुण आहेत जे दररोज ह्या ५ पांडवांवर आघात करतात. पण आपण ह्या आघातापासून आपल्या ५ पांडवांचे रक्षण करू शकतो.
"जेव्हा आपल्या रथाचे सारथी - ह्या ५ पांडवांचे मित्र भगवान श्रीकृष्ण असतील तेव्हा??". साधू उत्तर एकून खूप खुश झाला. तो म्हणाला,"अगदी बरोबर! श्रीकृष्ण म्हणजे आपल्या आतला आवाज, आपला आत्मा, आपला पथदर्शी प्रकाश.
संजयला बराच मतितार्थ आता कळला होता. तरी त्याने परत प्रश्न केला, "मग जर कौरव हे दुर्गुणच होते तर त्यांच्या बाजूने गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म लढले त्याचा काय अर्थ होतो??"
संजयला आता सगळेच कळले होते.
"अरे हा!! कर्ण हा, ५ ज्ञानेंद्रियेसारखाच आपला असतो. तो आपलाच एक भाग असतो परंतु साथ देतो त्या १०० दुर्गुणांची!! हा कर्ण दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या स्वतःच्या वासना असतात.
संजयच्या डोळ्यातून अश्रू येत असतात.