My Authors
Read all threads
@OfficeofUT साहेब तुम्ही पूर्णपणे राजकीय व्यक्ती नाहीत आधीपासून म्हणून हे मनोगत मांडण्याचा प्रयत्न आहे.
तुम्ही कोरोनाशी लढण्यासाठी तुमच्या पातळीवर उपाययोजना करताय, परंतु दिवसेंदिवस त्या कुठेतरी कमी पडतायेत हे मान्य करा तुम्ही आता कृपया, अपयश मान्य करण्यात काही कमीपणा नाही.
अपयश मान्य केलेत तर ते दूर करण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्याचे मार्ग मोकळे होतील. तुम्ही तुमच्या पातळीवर निर्णय घेतले त्याला जनतेने जमेल तेवढे सहकार्य केले, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांनीही त्यात पूरक असे योगदान दिले. परंतु रोज नव्याने हजारात रुग्ण वाढतायेत.
त्यामुळे ह्या क्षणाला पारंपरिक राजकारण्यांसारखे न वागता संवेदनशील व्यक्ती म्हणून जनतेसमोर येऊन सद्यस्थितीची पूर्णपणे सविस्तर कल्पना द्या. मुंबईची परस्थिती खूप हाताबाहेर गेलेली आहे. तेथील नागरिकांना वाचवण्यासाठी का होईना मनाचा मोठेपणा दाखवून खुलेपणाने केंद्राकडे मदतीची मागणी करा.
केंद्राकडे मदत मागण्यात काही कमीपणाचे नाही, हक्क आहे तो राज्याचा. आपल्या कुटुंबावर संकट आल्यावर व्यक्ती स्वाभिमान बाजूला ठेवून सगळीकडे मदतीसाठी प्रयत्न करतो, तुम्हीही राजकीय अहंकार बाजूला ठेवून मोकळेपणाने केंद्र, स्वयंसेवी संस्था यांची मदत घ्या, परिस्थिती सुधारण्यासाठी.
मुंबई असो की पुणे ह्या शहरांत लोकसंख्येची घनता जास्त असल्याने तेथील आरोग्यकेंद्र अतिरिक्त भार सांभाळू शकत नाहीत हे वास्तव आहे. रुग्णांना अनेक ठिकाणी बेड उपलब्ध नाहीतर तात्काळ घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नाहीयेत. कुणी सरकारी कारवाईचा बडगा नको म्हणून जाहीरपणे बोलणारही नाही
पण संशयित रुग्णांना ज्या विलगीकरणं कक्षात ठेवले जातेय त्यातील अनेक ठिकाणी स्वछता, अन्न दर्जा(वेळेवर अन्न न मिळणे) अशा गोष्टी निकृष्ट दर्जाचे आहे. ज्या रुग्णांना लागण झालीय त्यांच्या कक्षात मृत रुग्णांचे मृतदेह अनेक तास तसेच प्लास्टिकने कव्हर करून पडलेले आढळतायेत. अशाने इतर
उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल याचाही विचार करा. रुग्ण वाढल्याने संशयितांची टेस्ट केल्यावर त्याचे रिपोर्ट यायलाही उशीर होत आहे, माझी बहीण मुंबईत स्वतः सरकारी वैद्यकीय कर्मचारी आहे. ती कोरोना रुग्णांना उपचार देत असताना आता तिला गेले 4 दिवसापासून
लक्षणे दिसु लागलीत तर, 3 दिवासापूर्वी तिची टेस्ट घेण्यात आली आहे. परंतु लॅब्सवर प्रचंड ताण असल्याने 3 दिवस उलटूनही अद्याप तिचे रिपोर्ट आलेले नाहीत. जर आरोग्य सेवा देणाऱ्या सरकारी डॉक्टर्सचे हे हाल असतील तर सर्वसामान्य व्यक्तीला अजून किती जास्त प्रसंगांना सामोरं जावं लागतं असेल
तुम्ही व तुमचे सर्व मंत्री मन लावून काम करत असला तरी तुमच्या सर्वांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो. कारण गेल्या काही दिवसात एकाच गोष्टीबाबत तुमचे, गृहमंत्री, आरोग्यमंत्री, परिवहन मंत्री यात मतभिन्नता आढळली. अशा परस्थितीत तुम्हा सर्वांच्या निर्णय घोषणेपासून अंमलबजावणी पर्यंत त्यात
एकवाक्यता हवी असे वाटते. गेले 60 दिवस राज्यात जशा इतर स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवक विविध उपक्रमातून समाजासाठी मदतकार्य करतायेत, तसे आमच्या येथे आम्हीही करतोय. त्यातील एक सदस्य म्हणून स्थानिक पातळीवरच्या अधिकारी वर्गालाही आपल्या निर्णयाची अधिकृत माहिती तात्काळ पोहचलेली नसते, असे
आढळून आले. त्यामुळे ह्या प्रशासकीय कामात तर सुसूत्रता आणण आपल्याला सहज शक्य आहे. जेणेकरून कधीच कुठला निर्णय घेतल्यावर गोंधळाची किंवा संभ्रमाची स्थिती निर्माण होणार नाही. वाढत्या प्रादुर्भावामुळे येणाऱ्या काळात घरोघरी जाऊन तपासणी करावी लागण्याची शक्यता अधिक आहे. यात गती येण्यासाठी
आपणास सरकारी कर्मचाऱ्यांसोबत स्वयंसेवकांची मदत उपयुक्त ठरेल, आपण त्यांनाही सरकारी उपाययोजनेतील कामात अल्प का होईना विमा संरक्षण देऊन सहभागी करून घ्यावे असे वाटते. काहीच नाही शक्य झालेतर स्वयंसेवकांची तात्पुरती आरोग्य केंद्रे उभारणीसाठी सक्रिय मदत घेतली जाऊ शकते.
हे सगळं करण्यासाठी तुम्हाला सोशल मीडियावरील फसव्या PRच्या चक्रव्यहातून बाहेर पडावे लागेल. घरबसल्या सोशल मीडियावर सर्वकाही आलबेल सुरू आहे अशी माहिती प्रसारित करणाऱ्या ह्या लोकांना ground reality अजिबात माहीत नाहीये. जनतेत असलेली काळजी, भीती, रोष हे लोक तुमच्यापर्यंत पोहचू देणार
नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या समस्या प्रत्यक्षात माहीत करून घेऊन, तुम्ही आत्तापर्यंत जिथे कमी पडलाय उपाययोजना करण्यात ते मान्य करून खुलेपणाने आवाहन करा, व नव्या जोमाने कामाला लागा. आवाहनामुळे केंद्र असो की खाजगी उद्योगांतर्फे आधीपेक्षाही मदतीचा ओघ वाढण्याची शक्यता तर निर्माण होईल.
हे संकट दूर होईपर्यंत का होईना आतील राजकारणी पूर्णपणे बाजूला ठेवत, मुंबई-पुणे आरखी शहरे व तेथील नागरिक वाचवण्यासाठी तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करा. ही कळकळीची विनंती आहे.🙏
आता गोड गोड भाषणबाजीचा खरोखर कंटाळा आलाय आणि त्याचे कौतुकही राहिले नाही.
✍️ #मार्मिक

#COVIDー19
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with मार्मिक

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!