मध्ये सांगितले आहे की, 'जिथे मूर्तिपूजक (काफिर) भेटतील त्यांना मारा, कैद करा, जर ते माफी मागत असतील आणि नमाज पढायला तयार असतील तर त्यांना सोडून द्या'.
पासून पुढे लिहिलं आहे की, मक्का मध्ये राहणारे काफिर (गैर मुस्लिम) लोक जे मूर्ती पूजा करतात. ते मदिनेत येऊन मुस्लिम समाजावर अन्याय करत आहेत. धर्मस्थळे उध्वस्त करून मुस्लिमांना मारत आहेत.
सूरह तौबा 9 आयत नं.6
जे कैद केलेले लोक आहेत त्यांतील ज्या लोकांना अमन (शांती) हवे आहे अशा सर्व काफिर (गैर मुस्लिम) लोकांना संरक्षणासह सुरक्षित ठिकाणी पोहचवा.
अध्याय नं.11 श्लोक नं.32
भगवान कृष्ण म्हणतात की "मी वेळ आहे आणि मी जगाचा विनाश करण्यासाठी आलो आहे."
मी जर इतकेच बोललो तर तो अर्धवट संदर्भ होईल.
तुम्ही हिंदू असाल आणि तुमचा मित्र मुस्लिम असेल तर तो मुस्लिम मित्र तुमच्यासाठी काफिर असेल.
तुम्ही ट्विटर वापरता आणि तुमचा मित्र ट्विटर वापरत नसेल तर तो मित्र तुमच्यासाठी काफिर असेल.
कुराण मध्ये एक शिकवण आहे. शेजाऱ्याचा सन्मान करा त्याला संकट समयी मदत करा जरी तो काफिर (गैर मुस्लिम) असला तरी. जर काफिर लोकांना माराच सांगायचे असते तर त्याला मदत करा म्हणून तरी का सांगितले असते ??