सावरकर असो वा नेहरू, कोणताही ऐतिहासिक महापुरुष संपूर्ण आणि १००% आवडायला हवाच हा दुराग्रह चूक आहे, चूकच असतो.
त्याचवेळी, नावडत्यावर टीका-टिपणी करताना - +
कळण्यास फार फार सोपं आहे हे. माणूस मुळातून सज्जन असेल तर हे आचरणात आणणं सुद्धा सहज - स्वाभाविक होऊन जातं. पण दोन्ही बाजूंच्या बहुतांश लोकांना जमत नाही. +
अर्थात - "त्यांनी 'आमच्या माणसावर' घाण उडवली मग आम्ही त्यांचा माणूस पण घाण करणार" - अशी शर्यत लागली की सगळ्यांचेच हात घाण होणं नैसर्गिक आहे.
इथेच आपलं वैचारिक दारिद्र्य सुरु होतं. +
मी स्वतःला गांधीजी, टिळक, सावरकर, आंबेडकर, छत्रपती ह्या सर्वांचा शिष्य म्हणवू इच्छितो. कारण त्या त्या महामानवाच्या विचार-आचारातून "आज" कामी येईल ते ते सर्व उचलावं असं मला वाटतं.
पण - +
ह्या सर्व थोर विभूतींचं मूळ तत्व एकच होतं. त्या-त्या काळातील महत्वाच्या प्रश्नांवर आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांवर लक्ष केंद्रित करून तशी कृती करणे.
फरक फक्त - +
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll