देशभर अपप्रचाराची मोठी फळी उघडली गेली. बिनबुडाचे आरोप केले गेले. अख्खी इकोसिस्टिम कामाला लावली गेली. पण नरेंद्र मोदी नावाच्या माणसावर या देशाने विश्वास कायम ठेवला. +
रात्री विचार केला - मोदी पुनश्च निवडून आल्याने "मला" आनंद व्हावा असं खरंच काही आहे का?
उत्तर निःसंदिग्ध "हो" असंच मिळालं.
दुसऱ्या दिवशी फेसबुकवर एक लेख खरडला. तो आजही १००% व्हॅलिड आहे. तो लेख पुढे देतोय : +
आमच्यासारखे असे काही लोक, जे चहूकडे सुरु असलेल्या दांभिक, अप्पलपोट्या प्रचारकी प्रस्थापितांना वैतागून ठोस भूमिका घेत होते. +
म्हणूनच कालचा विजय फार महत्वाचा होता. आमच्या सारख्यांसाठी.
आम्ही फक्त सत्य बोलतो म्हणून पेड ठरवले जात होतो.
खोटं उघडं पाडतो म्हणून मूर्ख ठरवले जात होतो. +
हे ठरवलं जाणं कुणा पक्षाकडून, पक्ष कार्यकर्त्यांकडून होणं सहाजिक होतं. त्याचं फार काही वाटलं नसतं. पण हा मानसिक त्रास त्या लोकांकडून होत होता जे चहूकडे वैचारिक, विश्लेषक, विचारवंत वगैरे म्हणून मिरवत होते. +
या कंपूने गेली २-३ वर्षं काय नाही केलं?!
आमच्या व्यवसायावर शेरेबाजी केली. फेक प्रोफाईल्स तयार करून अपमानास्पद लिखाण केलं. आमच्या कुटुंबाच्या, +
आणि हे सगळं कशासाठी? का बरं?
कारण आम्ही सत्य काय ते मांडत होतो.
आम्ही हे मांडत होतो की मोदींनी १५ लाखांचं वचन दिलंच नव्हतं. आम्ही हे दाखवून देत होतो की - +
भारतात मॉब लिंचिंग "वाढलं" आहे हे दाखवणारी आकडेवारी कुठेही उपलब्ध नाही - हे स्पष्टपणे म्हणालो म्हणून आम्ही कम्युनल ठरलो. +
विविध मार्गांनी गुडूप होणारा पैसा डीबीटी द्वारे कसा वाचवला गेला - हे समोर आणलं म्हणून आम्ही कॉर्पोरेटचे दलाल ठरलो.
कुणी ठरवलं हे सगळं? +
आणि हे लोक आम्हाला देश तोडणाऱ्या मानसिकतेचे समर्थक ठरवत होते. +
वाटायचंच कधीकधी...ज्यातून कोणताही व्यावहारिक लाभ होत नाही, त्या लढाईत पडायचंच कशाला?! खासकरून तेव्हा - +
पण काल या सगळ्या त्रासाचा निचरा झाला.
गेल्या ५ वर्षांत - खासकरून गेल्या अडीच वर्षांत - ज्या अपप्रचाराविरोधात आपण उभे राहिलो - तो प्रोपागंडा काल परास्त झालेला दिसला आणि सगळ्या त्रासाचा निचरा झाला.+
कालचा विजय मोदी शहा - भाजप संघ वगैरे सर्वांचाच होता - +
जय हिंद!
वंदे मातरम!
भारतीय लोकशाहीचा विजय असो!
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com