"पूजा, पाठ, गौरी, गणपती, सोयर-सुतक, संक्रांत, द्वादशी, दसरा, दिवाळी प्रभृती शेकडो प्रसंगी भटावाचून काही एक अडणार नाही. स्वतः पोथी वाचावी किंवा +
अश्या पुरोगामी, सुधारणावादी, आधुनिकतावादी वर्तनामुळे - सनातन्यांचा इतका तिळपापड होतो - की - +
तो आवाज म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर.
हाच सावरकर तुमच्या आमच्यात ही वसावा.
नीच कृतघ्न टोळक्यांना जाब विचारताना, ह्याच आवाजाची किंकाळी आमच्यातूनही उठावी.
आणि मग आपण ही म्हणावं - #IAmSavarkar +
मी सावरकरांना #खरोखर "मानावं".
मला सावरकर आवडतात. मी सावरकरांना मानतो. : म्हणजे नेमकं काय?
तर
मी जन्माधिष्ठित जात-वर्ण वर्चस्व नाकारतो.
फक्त नाकारत नाही, कृतीत आणतो. त्यामुळे सनातन्यांची टाळकी फिरली तरी मला फरक पडत नाही. +
मी मानवता नाकारत नाही, पण राष्ट्रवादाचं मूल्य आणि गरज ही मान्य करतो. +
मी जाती-धर्माचा दुराभिमान बाळगत नाही. पण जन्माने ती ओळख मिळाली म्हणून तिची शरम ही बाळगत नाही. +
आणि मी गांधीजीना नाकारत नसलो, तरी छ. शिवाजी महाराज माझ्या हृदयात वास करत असतात. +
म्हणून मी सावरकर मानतो.
म्हणून मी सावरकर आचरतो.
अनेकांना यातलं थोडंसंच काहीतरी आवडतं. अनेकांना यातलं बरचसं खुपतं.
ते सगळं दिसत असूनही मी सावरकर माझ्या हृदयात, मेंदूत, रक्तात भिनवून घेतो. +
मी सावरकर जगत असतो.
म्हणूनच #मी_सावरकर असतो.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
--------------------------
@threadreaderapp please unroll