सत्तेसाठी पूर्णपणे लायक असताना, कर्तृत्व सिद्ध केलेलं असतानासुद्धा ३ नापासांनी एकत्र येऊन केलेल्या बेरजेमुळे विरोधी पक्ष झालेला भाजप निस्तेज पडल्यासारखा झाला होता. +
फेब्रुवारीपासूनच समर्थकांची नाराजी ट्विटरवर पदोपदी दिसत होती. हळूहळू आवाज वाढत गेला. आणि भाजप नेतृत्वाने ऐकला!+
अर्थात, यात बाकीची समीकरणं देखील असतीलही.
परंतु भाजपच्या वर्तमान अवतारास समर्थकांकडून लावला गेलेला जोर निश्चितच कारणीभूत आहे. +
ठिकठिकाणी विविध भाजप पदाधिकाऱ्यांनी मोदींच्या नावामागे ठाम समर्थन उभं केलं होतं. कधीकधी तर रस्त्यावर आंदोलन सदृश निदर्शनं झाली होती. परिणामस्वरूप नरेंद मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब झालं...+
भाजपला फॅसिस्ट वगैरे म्हणवणाऱ्या पक्षांच्या समर्थकांनी आपल्या शब्दाला पक्षाच्या डिसिजन मेकिंगमध्ये किती किंमत आहे हे विचारायला हवं - स्वतःलाच!
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com