My Authors
Read all threads
गांधींनी दक्षिण अफ्रिकेतून आल्या आल्या अहमदाबाद येथील कोचरब इथे आश्रम स्थापन केला. त्या आश्रमात एक जोडपं अस्पृश्य जातीच होतं. म्हणून आश्रमातच नव्हे तर त्या संपूर्ण भागात खळबळ माजली. त्या जोडप्याला आश्रमात ठेवू नये, असा दबाव जेवढा आश्रमातून होता तेवढाच तो बाहेरुनही वाढला होता.

1/ कोचरब आश्रम
त्या जोडप्याला आश्रमाबाहेर काढलं नाही, तर आश्रमासाठी देण्यात येणारी आर्थिक मदत बंद केली जाईल, अशी धमकीही आश्रमाला आर्थिक मदत करणाऱ्याने गांधीना दिली होती. त्या आश्रमातील त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा या मुद्द्यावर आश्रम सोडण्याची तयारी केली होती.

2
एवढेच नाही तर खुद्द कस्तुरबा देखील या दबावाला बळी पडल्या होत्या. त्याही जवळ जवळ आश्रम सोडण्याच्या मानसिकतेमध्ये आल्या होत्या. गांधी मात्र या प्रखर विरोधानंतरही कोणालाच बधले नाहीत.त्यांनी सर्वांनाच ठणकावून सांगितलं की, ‘ज्यांना आश्रम सोडून जायचं त्यांनी आश्रम सोडून जावं,

3
ज्यांना आश्रमाची आर्थिक नाकेबंदी करायची त्यांनी ती करावी. पण कोणत्याही परिस्थितीत हे अस्पृश्य जोडपं आश्रम सोडून जाणार नाही.’ खरं तर त्या वेळी नुकतेच भारतात आलेले गांधी पुरते स्थिरावलेही नव्हते. आश्रमच बंद झाला असता तर, त्यांची अवस्था बेवारशासारखी झाली असती.

4
तरीही ते एका अस्पृश्य जोडप्यासाठी सर्वस्वपणाला लावायला तयार होतात. _ही त्यांची कृती कोणत्या अर्थाने जातीयवादी ठरु शकते?

गांधी भारतात येण्याआधीपासून सामाजिक स्वातंत्र्य की राजकीय स्वातंत्र्य असा टोकाचा वाद सुरु होता.

5
काँग्रेसच्या राजकीय व्यासपीठाला कोणत्याही प्रकारे सामाजिक प्रश्नांचा ‘विटाळ’ नको आणि तसं झाल्यास ते व्यासपीठच पेटवून देवू, इतपत प्रखर आणि तीव्र विरोधी भावना असतानाही गांधी नागपूरच्या १९२० च्या काँग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव स्वत: मांडतात.

6
तो काय गांधी जातीयवादी आहेत म्हणून? हे जर गांधी जातीयवादी आहेत, तर १९१८ मध्ये ते जाहीरपणे म्हणतात, ‘या देशाच्या सर्वोच्चपदी भंग्याची वा चांभाराची मुलगी असणं हे माझं स्वप्न आहे आणि तोच माझ्या स्वातंत्र्याचा अर्थ आहे.’

7
सनातन्यांचा प्रचंड विरोध सहन करीत गांधी यावरुन उठणारं वादळ अंगावर ओढवून घेतात. का? तर गांधी जातीयवादी आहेत म्हणून ?

अस्पृश्यता ही धर्माने मान्य केलेली बाब नाही, तर ती सैतानाची करामत आहे. सैतानाने नेहमीच धर्मग्रंथांचा आधार घेतला आहे’ असं गांधीजी म्हणत.

8
एवढं म्हणूनही वर ते स्वत:ला धार्मिक म्हणवत. यामुळे ते नेहमीच धर्मांधांशी लढत आले.

याबाबत गांधींचं आणखी एक वाक्य देखील आपण लक्षात घेतले पाहिजे ते म्हणजे, ‘अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा भाग नाही, आणि जर तसं असेल तर मग असा हिंदू धर्म मला नको.

9
मी हिंदू धर्मावर जीवापेक्षाही अधिक प्रेम करत असल्याने मला या अस्पृश्यतेच्या कलंकाचा भार असह्य होवू लागला आहे.

येरवडा तुरुंगातुन सुटल्यावर गांधींनी प्रदीर्घ अशी साडेबारा मैलाची 'हरिजन यात्रा' काढली. त्यामुळे सवर्ण हिंदुमध्ये प्रचंड स्वस्थता, खळबळ आणि संतापाची भावना होती.

10
त्यांच्या या यात्रेला अनेक अडथळे निर्माण करून रोखण्याचे प्रयत्न झाले. एवढेच नव्हे तर १९३४ मध्येच त्यांच्या पुण्याच्या हरिजन यात्रेच्या दरम्यान त्यांच्यावर बॉम्बहल्ला झाला. सुदैवाने त्यातून ते बचावले.

11
१९३२ च्या ‘पुणे करारा’नंतर गांधीजींना अस्पृश्यतेविरोधात देशव्यापी चळवळ सुरू करायची होती. या काळात वाई येथील प्राज्ञपाठशाळेच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व अन्य धर्मपंडितांबरोबर त्यांची आगा खान पॅलेस येथील तुरुंगात हिंदू धर्मातील अस्पृश्यतेबाबत चर्चा झाली.

12
अस्पृश्यता धर्मसंमत नाही, तिला धर्मग्रंथाची मान्यता नाही, हे शास्त्रीबुवांनी दाखवून दिल्यानंतर गांधींनी त्यांना तसे पत्रक काढावयास सांगितले. अस्पृश्यतेला धर्मग्रंथाची मान्यता असती, तरीही गांधीजींनी त्याविरोधात चळवळ केलीच असती. कारण तसे वचनच त्यांनी पुणे करारात दिले होते

13
व सामाजिक न्यायाविरोधातली कुठलीही सामाजिक आणि धार्मिक रूढी-परंपरा त्यांना अमान्य होती.

पुणे तुरुंगात गांधींबरोबर असलेल्या सरदार पटेल यांनी गांधींना स्पष्ट सल्ला दिला होता, परंपरावादी आणि आंबेडकरांचे अनुयायी यांच्यात त्यांनी मधे पडू नये. दोन्ही बाजूला आपसात भांडू देत.

14
पण गांधींनी पटेल यांचा सल्ला नाकारला. ते म्हणाले की, ‘यामुळे लक्षावधी दलितांना असं वाटता कामा नये की, आपण त्यांना वाऱ्यावर सोडलंय.’

परंपरावाद्यांच्या वादळात एकट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निभाव लागणार नाही हे समजून उमजून गांधींनी हे वादळ स्वत:वर ओढून घेतलं होतं.

15
हे कदाचित खरं असेल की डॉ. बाबासाहेबांनी या प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य दिलं तसं गांधींनी दिलं नसेल. पण याला कारणंही आहेत. दोघांमध्ये या प्रश्नावरुन मतभेदही आहेत आणि तसे मतभेद असणे स्वाभाविकही आहे.
गांधीजी आणि बाबासाहेब या दोघांच्याही संघर्षरेषा भिन्न आहेत.

16
डॉ. आंबेडकरांनी दलित विरुद्ध सवर्ण ही संघर्ष रेषा आखली असेल तर गांधींची संघर्षरेषा साम्राज्यवादी ब्रिटीश विरुद्ध भारत अशी आहे. त्यामुळे गांधीना या प्रश्नावर आंबेडकरांइतकं आक्रमक होणं शक्य झालं नाही. कारण स्वातंत्र्यलढ्यासाठी सवर्ण आणि दलितांच्या एकीचं बळ त्यांना हवं होतं.

17
स्वातंत्र्यलढ्याला हानी पोचणार नाही याचं भान ठेवण्याचा ताण त्यांच्यावर होताच. दुसऱ्या बाजूला आंबेडकर या ताणातून मुक्त होते. हे सर्व लक्षात न घेता गांधीना जातीयवादी ठरवणं अन्यायकारकच आहे.
एका बाजूला त्यांना परंपरावाद्यांच्या विरोधात लढायचंय.

18
तर दुसऱ्या बाजूला देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते ब्रिटीशांच्या विरोधात संघर्ष करत आहेत. तिसऱ्या बाजूला त्यांना हिंदू मुस्लीम ऐक्यासाठीही जीवाचं रान करायचंय. हे सर्व करताना स्वातंत्र्यलढ्याची फळं शेवटच्या माणसांच्या पदरात पडतील का, याचीही चिंता आहे.

19
अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे बघताना याही गोष्टींकडे बघून गांधींच्या भुमिकेचं मुल्यांकन व्हायला हवं.

#गांधी चातुर्वर्ण्य मानत होते’ हे वाक्य शंभर टक्के खरंय आणि तेवढंच ते खोटंय. आता या वाक्याने अधिकच गोँधळ उडण्याची शक्यता आहे.

20
कारण हे वाक्य त्यांनी वापरलेल्या पूर्ण वाक्यातील अर्धाच भाग आहे. गांधी म्हणाले होते, `मी चातुर्वर्ण्य मानतो. पण असा चातुर्वर्ण्य ज्यात उच्चनीच भेदभाव नसेल.` असा चातुर्वर्ण्य नव्हताच. हे वाक्य ‘आजीबाईंना मिश्या असत्या तर’ अशा धर्तीचं आहे.

21
उच्चनीच भेदभावाशिवाय चातुर्वर्ण्य नाही. गांधी अस्तित्वात असलेला चातुर्वर्ण्य मानत नाहीत आणि असा चातुर्वर्ण्य मानतात जो मुळी अस्तित्वातच नाही. हा केवळ शाब्दिक कसरतीचा भाग नाही. गांधींनी त्यांच्या आयुष्यात कधी उच्चनीच भेदभाव केलेला दिसत नाही.

22
श्रमालाच प्रतिष्ठा असली पाहिजे. म्हणजे कोणाला प्रतिष्ठा असली पाहिजे? तर चातुवर्ण्याच्या सगळ्यात खालच्या पायरीवर असलेल्या शुद्राला प्रतिष्ठा असली पाहिजे.
चातुर्वर्ण्याच्या कोणत्या तात्विक मांडणीत श्रमाची प्रतिष्ठा आणि पर्यायाने शुद्राला प्रतिष्ठा आहे?

23
श्रम न करताच जो खातो तो चोर आहे. आता हा श्रम न करणारा कोण आहे? तर ज्याचा जन्म ब्रम्हदेवाच्या तोंडातूनच झाला म्हणून तो जन्मत:च श्रेष्ठ आहे. चातुर्वर्ण्याच्या उतरंडीवर जो जन्मत:च शिखरावरच बसलाय म्हणून तो इतर वर्णाच्याही बोकांडी बसलाय. त्याला श्रम करण्याची गरज नाही.

24
कारण अध्ययन करणं हाच त्याचा एकाधिकार आहे. त्या वर्णाला तो श्रम करत नाही म्हणून गांधी त्याला चोर म्हणत असेल तरीही गांधी चातुर्वर्ण्य मानत होते, असं आपण म्हणत असू तर आपण आपलेच ‘चेकअप’ करुन घेणं आवश्यकच नाही तर अत्यावश्यक आहे.

25
एका वाक्यात, ‘अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा भाग नाही,’ असं गांधी म्हणतात. या वाक्याचा दुसरा अर्थ असाही होतो की जे अस्पृश्यता पाळतात ते हिंदू धर्मीय असूच शकत नाहीत. परत इथं पहिल्यांदा धर्माचा जो काही अवकाश आहे तो व्यापणं आणि ज्यांनी हा अवकाश व्यापलाय त्यांना तिथून हुसकावणं.

26
मनुवाद्यांनी गांधीना ‘धर्मबुडव्या’ ठरवत त्यांची हत्याच नव्हे तर ‘वध’ करावा. त्यांना ‘राक्षस’ ठरवावं आणि मनुविरोधकांनी त्यांना मनुसमर्थक जातीयवादी चातुर्वर्ण्य मानणारे म्हणत त्यांना दुश्मन ठरवावं याच्या एवढं दुसरं दुर्देव नाही.

27
धर्मांधाच्या नजरेत गांधींचे असंख्य ‘प्रमाद’ आहेत. त्याचाच प्रसाद म्हणून त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला.
एकतर गांधी धर्माचा अवकाश कब्जात घेवून बसले आहेत  त्यातही धर्माचा खरा अर्थ ते सांगताहेत. हे खरंतर ‘पाप’ आहे. कारण गांधी ज्या जाती, वर्णाचे आहेत.

28
त्या जाती, वर्णाला धर्माचा अर्थ सांगण्याचा अधिकारच नाही. तसा तो सांगत असेल तर हे महापाप आहे. कारण चातुर्वर्ण्यानुसार हा कर्मसंकर आहे. असा कर्मसंकर करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा आहे. संत तुकारामानेही ‘वेदांचा तो अर्थ आम्हासिच ठावा’ असं म्हणत कर्मसंकर केला,

39
म्हणून त्यांची ‘सदेह वैकुंठात’ रवानगी करण्यात आली. गांधी तर आयुष्यभर हा कर्मसंकर घडवून आणत होते. इसकी सजा मिलेगी, भरपूर मिलेगी, म्हणत धर्माच्या गब्बरांनी त्यांना हत्येची शिक्षा दिलीच आहे.

30
Continue.....
चातुर्वर्ण्यामधे जेवढा ‘कर्मसंकर’ निषिद्ध आहे त्याहीपेक्षा निषिद्ध वर्णसंकर आहे. गांधींनी कर्मसंकर तर घडवून आणलाच पण, वर्णसंकरही घडवून आणण्याला उघड प्रोत्साहन दिलं. या वर्णसंकराला तर क्षमाच नाही. आणि तो घडवून आणणाऱ्याला तर नाहीच नाही.

31 गांधीजी
सुरवाती सुरवातीच्या काळात गांधी कोणत्याही लग्नाला जात आणि वधुवरांना आशीर्वाद देत. पण नंतरच्या काळात त्यांनी एक कठोर निर्णय घेतला. ते कोणत्याही सजातीय विवाहाला म्हणजे जातीअंतर्गत विवाहाला हजर राहिले नाहीत.

32
पण विवाह एक सवर्ण आणि दलित, त्यांच्या भाषेत हरिजन असा असेल तर अशा लग्नाला ते आवर्जून उपस्थित राहत होते. हे सरळ सरळ चातुर्वर्ण्याविरोधात वर्णसंकर घडवून आणण्याबाबतची गांधींची बंडखोरी होती.
महादेवभाई देसाई आणि महात्मा गांधी यांचे पितापुत्राचे मानलेले नाते होते.

33
महादेवभाई देसाईंना महात्मा गांधी पुत्रवत मानत. त्याच महादेव भाईंच्या मुलाचं लग्न ठरलं. म्हणजे एका अर्थाने गांधींचा नातू, नारायण देसाईंचं लग्न. पण या लग्नाला गांधी गेले नाहीत. कारण ते लग्न सजातीय होत.
महादेवभाई देसाईंनी आपल्या परीनं समजावून बघितलं.

34
त्यांच्या वतीने त्यांनी गांधींचे जवळचे मित्र नरेनभाईंनाही या मोहिमेवर लावलं की त्यांनी या लग्नात हजर रहावं. पण त्याला यश आलं नाही. अखेर गांधी त्यांना म्हणाले, एक वेळ दुसऱ्या कुणाबाबतीत अपवाद होऊ शकतो. पण घरच्या मुलासाठी माझ्या प्रतिज्ञेत कसा अपवाद करू?

35
कर्मसंकर आणि वर्णसंकर घडवून आणणाऱ्या गांधींना जेवढं त्यांच्या शत्रूंनी ओळखलं होतं, तेवढं त्यांच्या मित्रांना ओळखता आले नाहीत. गांधी जातीयवादी आहेत. गांधी चातुर्वर्ण्य मानतात, असं म्हणत ते जातीयवाद्यांना, मनुवाद्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतच करीत राहिले.

36
आज जातीयवाद्यांच्या, मनुवाद्यांचा, हिंदुत्ववाद्यांचा अश्वमेध चौफेर उधळलेला दिसतो. त्याची बीज महात्मा गांधींना ओळखण्यात पुरोगाम्यांनी, क्रांतिकारकांनी केलेल्या महाभयंकर चुकीत आहेत, असं वाटतं.

37
सुरुवातीला सनातन्यांप्रमाणे जातीय व्यवस्थेसंबंधी मते मांडणाऱ्या गांधीजींच्या विचारात पुढे पुढे मोठा बदल झालेला दिसतो.
_“सहभोजन आणि आंतरजातीय विवाह यांची अस्पृश्यता निवारण्यासाठी जरुरी नाही, असे मला वाटते. माझी वर्णाश्रमधर्मावर श्रद्धा आहे; तरी मी भंग्याबरोबर जेवतो ... ....

38
माझ्या योजनेत आंतरजातीय विवाहाला स्थान नाही एवढेच मी सांगतो.” (यंग इंडिया, २२-१-१९२५)_ असे १९२५ साली आपले मत सांगणारे म. गांधी पुन्हा १९४६ च्या २८ जुलैच्या ‘हरिजन’मध्ये म्हणतात, _“सहभोजन हा अस्पृश्यता निवारण्याच्या कार्यक्रमाचा आवश्यक असा भाग नाही, असे मी एकेकाळी म्हटले आहे.

39
पण मी स्वत: सहभोजनवादी आहे. हल्ली मी या कार्याला उत्तेजन देतो. वास्तविक आज मी त्याही पुढे जात आहे.” - (‘हरिजन’, २८-७-१९४६).

गांधीजींचे आंतरजातीय विवाहाबद्दलचे बदललेले मत महत्त्वाचे आहे.
गांधीजी म्हणतात, “जर एखाद्या सुशिक्षित हरिजन मुलीने सवर्ण हिंदूबरोबर लग्न केले तर त्या

40
जोडप्याने अस्पृश्यता निवारण्याच्या कार्याला वाहून घ्यावे... एका हरिजन मुलीने चांगल्या वर्तणुकीच्या शीलवंत सवर्ण हिंदूबरोबर लग्न केल्यास त्यामुळे सर्व हरिजन सवर्ण हिंदूंचे चांगले मित्र होतील आणि हे चांगले उदाहरण होईल. ‘सवर्ण हिंदू मुलीने आपला भावी सहकारी पती म्हणून हरिजनाची

41
निवड करावी हे अधिक योग्य होईल. त्यापुढे जाऊन मी म्हणेन, हे अधिक चांगले होईल.... मी माझ्या मार्गाने जावयाचे ठरविले तर ज्या मुलींवर माझे नैतिक वजन आहे अशा सवर्ण मुलींनी हरिजन पतीची निवड करावी असे मी त्यांना आवाहन करीन.” - (‘हरिजन’, ७-७-१९४६)

42
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with आत्मनिर्भर

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!