My Authors
Read all threads
📌📌📌
मोडू चौकटी कालच्या..

(याला हेपललं, त्याने ब्लॉक केलं वगैरे रममाण होणाऱ्यांनी न वाचल्यास हरकत नाही. मात्र तसे न करणाऱ्यांनी जरूर वाचावे)

करोना आला. परप्रांतीय राज्याबाहेर गेले. चोहीकडे आनंदीआनंद झाला. आपण तत्काळ बिझनेसच्या गप्पा मारायला सुरुवात केली. लॉकडाउनच्या (१/१५)
काळात एकट्या मुंबईत किमान लाख - दीड लाख (जास्तच) तरुणांनी 'काहीतरी' बिझनेस करावा म्हणून विचार सुरु केला. काहींनी 'फक्त' विचारच केला. काहींनी विचार अंमलात आणला. मात्र यादरम्यान दोन गोष्टी प्रामुख्याने खटकल्या. आगामी काळात मराठी तरुणांनी यावर विचारपूर्वक काम (२/१५)
करायला हवे. पहिलं म्हणजे, वडापावची गाडी, चहाची टपरी आणि भाजीविक्री यापलीकडे देखील एक व्यावसायिक, उद्योगजगत आहे. आणि दुसरं म्हणजे, व्यवसायातील नियोजनशून्य प्रवेश! दोन्हीबाबत सविस्तर बोलू. पहिला मुद्दा : फार दूर जायची गरज नाही. वाचणाऱ्या प्रत्येकाने फक्त आपल्या (३/१५)
आजूबाजूला पाहा. तुमच्या शेजारीपाजारी, मित्रपरिवारात, नातेवाईकांत सुरु झालेले व्यवसाय हे वडापावची गाडी आणि भाजीविक्री आणि फारतर मासेविक्री यापलीकडे गेलेले नाहीत. कुठलाही व्यवसाय सुरु करताना भांडवल (इन्व्हेस्टमेंट) लागतं याची मला चांगली कल्पना आहे. आणि कमी भांडवल लागत (४/१५)
असल्यानेच वरील व्यवसायांकडे मराठी तरुणांचा अधिक ओढा आहे हे देखील मी जाणतो. मात्र हे केवळ आपल्या मनाला सुखावणारं कारण आहे. माझ्या 'नव्या' व्यवसायमित्रांनी स्वतःच्या मनाला जरूर विचारावं की, व्यवसाय सुरु करावा असा विचार केल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कुठले पर्याय आले? (५/१५)
किंवा इतरांनी आपल्याला कुठले पर्याय सुचवले? कोणी किराणामाल दुकान, हॉटेलिंग (आता या क्षेत्रात यश नाही म्हणत असाल तर तुम्ही चुकीचे आहात), लेबर कॉन्ट्रॅक्टर, शेतकरी किंवा आणखी नव्या आव्हानात्मक क्षेत्रात उतरण्याचा विचार केला नाही. केल्यास, त्यांची संख्या मूठभर! आणि (६/१५)
एकाच विभागात कितीजण भाजी किंवा पाणीपुरीचा ठेले लावणार आहात? आणि त्यात राजकीय पक्ष पण ग्रेटच.. आमचा तरुण भाजीगाडा, पाणीपुरी गाडी लावणार आहे, त्याला साथ द्या वगैरे.. अरे हे सगळं ठीके पण त्यापलीकडे अद्योहजगत आहे याची ओळख कोण करून देणार?

आपण आपली संकुचित वृत्ती (७/१५)
सोडायला हवी. साला, एक रिस्कवाली उडी तो बनती है यार! आता यासाठी आम्हाला भांडवल कोण देणार असा विचार निश्चित आला असेल. मग सरकार कशासाठी आहे? त्यांचा वापर कधी करून घ्यायचा ? की नुसतंच सोशल मीडियावर येऊन त्यांना हेलपायचं? इथे येऊन या राजकारण्याने ब्लॉक केलं, त्याने (८/१५)
ब्लॉक केलं असं म्हणणाऱ्यांना 'ते करण्याचा' पगार मिळतो. त्यांचं कुटुंब त्यावर चालतं. आपलं तस आहे का काही? नाही! त्यामुळे शासनाच्या स्टार्टअप किंवा मुद्रा योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळवा. (वाटल्यास मुद्रा योजनेची माहिती देणारा थ्रेड लिहू का?) आपण खरंच या ठरलेल्या (९/१५)
चोकटीतून बाहेर यायला हवं. आणि हो एकमेकांना धरून चाला बरं का.. म्हणजे एकट्यानेच आकाश गाठायला हवं असं काही नाही. आकाश फार फार मोठ्ठंय. तिथे मिळून भरारी घेतलात म्हणून काही होत नाही. त्यामुळे एकमेकांना पकडून चाला. लाकडाची एक काठी मोडता येते, लाकडाची मोळी मोडणं कठीण! (१०/१५)
दुसरा मुद्दा : या लॉकडाऊनमध्ये सुरु झालेले किमान ६० टक्के व्यवसाय काही दिवसात बंद होतील. असं बोलून मी मनोबल कमी करू इच्छित नाही. मात्र छान गोड-गोड बोलून विनाश करण्यापेक्षा, दोन कटू शब्द बोलून 'विकास' करण्यात अधिक रस वाटतो. तर व्यवसाय बंद होतील हे मी का म्हणतो, तर (११/१५)
अनेकांनी या क्षेत्रात 'नियोजनशून्य' उडी घेतलीय. एखाद्या क्षेत्रात उतरताना त्याचा 'रिसर्च' करावा हे आपल्याकडील साचेबद्ध शिक्षणव्यवस्थेत शिकवलं जात नाही. एकतर ते तुमच्यात जन्मजात असावं लागतं. किंवा ती अभ्यासू वृत्ती उपजत असावी लागते. किंवा मग लाखो रुपये उधळून तुम्हाला (१२/१५)
एमबीए करावं लागतं. आता यातील पहिला आणि तिसरा मुद्दा आपल्याकडे नाही असं समजू. मग अभ्यासूवृत्ती रुजवण्यासाठी प्रयत्न व्हावा. तुम्ही जो व्यवसाय करताय तो कुठे करताय, तिथे तोच व्यवसाय करणार आणखी किती जण आहेत, असल्यास आपला खप होईल का, या मार्केटमध्ये किती काळ (१३/१५)
तग धरणं शक्य आहे, आपण 'दर्जा' सिद्ध केल्यास स्वतःचा ग्राहकवर्ग बनण्यास किती काळ लोटू शकतो, एखाद्या नव्या क्षेत्रात पदार्पण करणं शक्य होईल का, आपला विरोधक (व्यवसायातला) काय स्ट्रॅटेजीस आखू शकतो वगैरे वगैरे.. हे विचार व्यवसाय सुरु करण्यापूर्वी आले का? तर त्याचे उत्तर (१४/१५)
असेल कदाचित नाही, कदाचित हो! केवळ व्यवसायच नाहीतर कुठल्याही क्षेत्रात उतरताना 'आर अँड डी' का महत्त्वाचं हे मागील काही वर्षात मला स्वतःला जाणवू लागलं. अर्थात निवड तुमची आहे.. अजून काय बोलावे, योग्य ते जाणिजे!
@ThinksRane
(१५/१५)
परंपरागत व्यवसाय तुमच्याकडे जन्मजात असावा लागतो, किंवा
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with प्रथमेश सुभाष राणे.

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!