नको ती कामं केली असतील, अडकला असेल कशातरी!
मी काहीही झालं तरी असं करणार नाही!
हट...असं हरून थोडीच चालत असतं...!
ही सगळी वाक्यं कशी आहेत माहितीये? +
काहीही झालं तरी हार मानायची नाय - हे वाक्य लाईक्स अन शेअर्स मिळवायला फेसबुक पोस्टवर आणि भाषणात टाळ्या मिळवण्यासाठी स्टेजवर वापरायला मस्तंय. पण - +
आपण कर्तृत्व गाजवून कमावलेल्या आत्मविश्वासा जोरावर जगत असाल. पण प्रत्येकाला हे जमत नाही ना...प्रत्येकाची काहीतरी स्टेज असते ना! +
त्याला तुम्ही जज करताय? +
कोणत्याही, कितीही गंभीर गोष्टीचा "इतका" ताण येऊच देऊ नये;
मी आयष्यात खूप काही बघितलं आहे पण मी कधीच असा विचार केला नाही, भविष्यातपण करणार नाही;
वगैरे वगैरे सगळं सगळं ठीक आहे हो. पण हे "तुम्ही" म्हणताय. तो तिकडे - +
कळतंय का तुम्हाला?
हे सगळं मी संपूर्ण जबाबदारीने आणि स्वानुभवावरून बोलतोय.
कारण मी स्वतः या फेजमधून गेलोय. +
उलट "कसं काय जमत नाही मला हा असा विचार करायला?" असं वाटून अधिक दूर ढकललो गेलो असतो मी. अधिक डिप्रेस झालो असतो. +
आणि ते मिळणं देखील पुरेसं ठरत नाही कधीकधी. +
मग का जजमेंटल होताय बाबांनो? +
फक्त "अरेरे...असं नव्हतं करायला हवंस रे!" इतकंच मनापासून नाही का म्हणू शकत आपण?
आणि त्याहून महत्वाचं - +
- हे असं काही का लिहू शकत नाही आपण?
नाही लिहू शकत. कारण आपण "मी" मध्ये बुडालेलो आहोत. +
कॉलेजच्या दिवसांमधील नरकयातना भोगून बाहेर आलो तेव्हा येईल ते संकट अंगावर झेलायची तयारी झाली होती. तावूनसुलाखून निघालो होतो. त्यामुळे स्टार्टअपला शेप देताना येत असलेले आर्थिक-कौटुंबिक ताण कधीच टोकावर गेले नाहीत.
तरीदेखील - +
मला माहित होतं की ही वेळ येणार नाही. आलीच तर जवळचे मित्र, सख्खेसोयरे भरपूर आहेत. पण तरी कुणीतरी असं हक्काने म्हणणं खूप मोठा आधार देऊन जातं. मनावरचं दडपण घेऊन जातं. +
त्याहून महत्वाचं - आपण कधी बोलतो का असं कुणाला?
आपण आज सुशांत राजपूतच्या निमित्ताने आत्महत्या करणाऱ्यांची अक्कल काढणं - मला आलेल्या वरील अनुभवाच्या पूर्णपणे विपरीत आहे. १८० डिग्री विरुद्ध आहे. आणि अश्यात हे अनेकदा घडलं आहे. +
डिप्रेशन ते जीव देण्याची अवस्था - यात मोठा मानसिक प्रवास असतो. त्या प्रवासात आपण आपापल्या शक्तीनुसार कुठलातरी आधार होऊ या. +
प्लिज, प्लिज, प्लिज...आणखी सुशांत होणार नाहीत याची काळजी घेऊ या.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com