सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचं रिपोर्टींग किती किळसवाणं केलं गेलं हे तर आपण बघितलंच...पण त्याहून मोठं पाप माध्यमांकडून घडत आहे. +
जबाबदारी पार पाडणं सोडाच - खरी माहिती समोर येऊच नं देण्याची कामगिरी माध्यमांनी प्रामाणिकपणे पार पाडलेली दिसतीये. +
पण पॅनलमधला प्रत्येकजण चीड यावी अशी बुळचट उत्तरं देतो...ती खपवून ही घेतात. +
बाकीच्या क्षेत्रांची चर्चा करू नंतर - सध्या सुशांतसिंग आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बॉलिवूडमधील नेपिटिझम वर बोला - +
काल एका चर्चेत एक चित्रपट समीक्षक म्हणाले की "इन्सेक्युरिटी सर्वांनाच असते...सलमान खानलासुद्धा "आपण मागे पडू" अशी भीती आहेच...त्याचा ट्यूबलाईट अपयशी गेलाच ना..." या भंकसवर चर्चेचा अँकर मान डोलावत होता! +
इतकं अवघड लॉजिक आहे का हे?
बॉलिवूडमधील घाणेरडे अनिष्ट प्रकार - कास्टिंग काऊच पासून ड्रग्जपर्यंत - या पत्रकारांना माहिती नसतात काय? +
या प्रकरणांना चिवटपणे धसास लावण्याची एकाही माध्यम पंडिताची बिशाद नाही - मग +
हेच नव्हे, प्रत्येक क्षेत्रातील घाण लपवण्याचं पाप आहे पत्रकारांच्या माथी.
३-४ दिवसांपूर्वी पत्रकार श्री श्री श्री श्री निखिल वागळेंचा उद्धव ठाकरेंवर टीका करणारा व्हिडीओ व्हायरल झालाय. +
अख्ख्या महाराष्ट्राला केव्हाच कळालं हे. व्हिजनरी पत्रकारांना ३ महिने आणि कित्येक मृत्यूंनंतर ही उपरती झाली. +
कोण तुम्ही? का तुमच्या प्रश्नांना भीक घालावी? जवळीक असेल त्या राजकीय पक्षांना सोयीच्या वाटतील तश्या बातम्या ट्रेन्ड करण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेण्यापलीकडे कर्तृत्व काय आहे तुमच्या जमातीचं? +
सर्वात मोठा कहर म्हणे मुंबई मनपावरील टीका. +
ऐसा? अब्बी समजा क्या ये तुमकू?
किती प्रकरणं बाहेर काढलीत हो तुम्ही बीएमसीची? किती भ्रष्ट अधिकाऱ्यांना जेलमध्ये पाठवलं आहे तुम्ही? मुंबईत हॉस्पिटल्स भग्न अवस्थेत आहेत हे कळायला कोरोना यावा लागतो काय? +
इतकी वर्षं कोणत्या व्हिस्की-स्कॉचच्या नशेत पडून होती तुमची जमात?
बॉलिवूड काय, बीएमसी काय...पर्यावरण, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण, आरोग्य...प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार आहे. कित्येक प्रश्न आहेत. +
काय झालं त्यानिमित्ताने समोर आलेल्या मूलभूत प्रश्नांचं? सोवळ्यात बसलेल्या किती पत्रकरांनी विषय लावून ठरलेत?
हेच नाही - भारतीय माध्यमांनी कोणता एक विषय चिवटपणे धसास लावला आहे सांगावं. +
पण आपले पत्रकार मात्र काहीतरी वेगळ्याच धुंदीत असतात. +
प्लिजच बॉस. स्वतः निवडलेल्या क्षेत्रात जॉब करतोयस. रीतसर पगार घेतोयस. उपकार करत नाहीयेस.
आणि हो - तू प्रामाणिक असशील ही कदाचित - पण +
त्यामुळेच वाटतं.
ही अख्खी इंडस्ट्री बंद पडली तरी काहीही फरक पडणार नाही.
झालंच तर जरा भलंच होईल समाजाचं.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll.