किसानपुत्र आंदोलनाने घेतलेल्या अनोख्या व्हिडीओ स्पर्धेत वसमत येथील संगीता देशमुख यांना प्रथम पुरस्कार मिळाला व चंद्रकांत झटाले व गायत्री देशमुख (अकोला) यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय पुरस्कार घोषित झाला आहे.
#videocontest #WINNER
खालील प्रमाणे निकाल जाहीर करण्यात आला आहे
#antifarmerlaws
1) सर्जक (स्त्री व शेतकरी) - राहुल धाकडे (अंबाजोगाई)
2) संविधानाचे परिशिष्ट ९ - तुषार भगत (शिरूर, पुणे)
3) शेतकरी विरोधी कायदे पुस्तक परिचय - ऐश्वर्या तनपुरे (परतूर, जालना)
4) शेतकरी आत्महत्या - ओंकार पाटील (हातकणंगले, कोल्हापूर)
youtube.com/channel/UCAJTg…
प्रथम पारितोषिक ३००१ रु, ऑनलाईन प्रमाणपत्र, व्दितीय पारितोषिक २००१ रु, ऑनलाईन प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक १००१ रु, ऑनलाईन प्रमाणपत्र, तर उत्तेजनार्थ ऑनलाईन प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
बक्षिसाची रक्कम विजेते स्पर्धकांच्या खात्यावर ऑनलाइन पाठवली जाईल. असे संयोजक असलम सय्यद व मयूर बागुल यांनी सांगितले.
शेतकरी विरोधी कायद्याचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने किसानपुत्र आंदोलनाने एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला,
1) 'शेतकरीविरोधी कायदे" या पुस्तिकेचा परिचय
2) शेतकऱयांच्या आत्महत्या
3) सर्जकांचे स्वातंत्र्य
4) संविधानातील परिशिष्ट 9
स्पर्धेचा उद्देश्य शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या मनातील खदखद व दडलेले वक्तृत्व कलागुण यासर्वांना अनुभवण्याची संधी,
सर्वाधिक "शेतकऱयांच्या आत्महत्या" या विषयावर व्हिडीओ प्राप्त झाले.
असलम सय्यद व मयूर बागुल यांनी स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. सगळेच स्पर्धक तोडीचे होते, निकाल घेण्यास खूप अवघड झाला असल्याचे त्यांनी सांगितले. Unroll @threadreaderapp