उद्या एक खगोलीय घटना घडणार आहे ती म्हणजे सूर्य ग्रहण.उत्तर भारतातून काही भागात कंकणाकृती तर उर्वरित भारतात हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसेल
ग्रहणाविषयी अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज समाजात प्रचलित असतात.अशाच गैरसमजांचे निराकरण करण्याचा हा प्रयत्न
ग्रहण ही खगोलीय घटना आहे.जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत आणि एकाच प्रतलात येतात तेव्हा चंद्रामुळे सूर्यबिंब झाकले जाऊन सूर्यग्रहण होते. यात शुभ-अशुभ असे काही नाही
सुर्यग्रहणात चंद्राची सावली पृथ्वीच्या काही भागावर पडते.सावली ही सावलीच असते.झाडाची सावली,डोंगराची सावली किंवा चंद्राची सावली सारखीच असते.जर झाडाच्या सावलीत हवा अशुद्ध होत नसेल तर चंद्राच्या सावलीत देखील होणार नाही.
ग्रहणानंतर घरातील अन्न पदार्थ जर फेकून दिले जात असतील तर सगळी शेते उघड्यावर आहेत.त्यांचे काय??शेतातील धान्य, बाजारातील अन्नपदार्थ, हे जर चालत असतील तर घरात शिजवलेल्या अन्नच कस दूषित होते??
या सगळ्या अंधश्रद्धा आपण भारतीय संस्कृतीच्या नावाखाली पाडतो.
*छादयति शशी सूर्यं शशिनं महती च भूच्छाया*॥(आर्यभटिय-गोलपाद अध्याय४ श्लोक ३७)
त्यामुळे कुठलीही अंधश्रद्धां न बाळगता ग्रहण बघणे , इतरांना बघायला लावणे आणि गैरसमजाचे निराकरण करणे हाच खरा भारतीय संस्कृतीचा सन्मान होईल
साभार - विनय जोशी सर.