Sujit Pandurang Patil Profile picture
Mechanical Engineer | Traveller | Son of Farmer | Blogger | Dreamer | Jalgaonkar 😎🇮🇳
May 14, 2021 24 tweets 6 min read
#थ्रेड
#एका_डॉक्टरांच्या_पत्नीचे_मनोगत

आमचा रोजचा दिवस सकाळी साडेपाच पावणे सहाला सुरू होतो .
जग साखर झोपेत असताना आम्हाला जाग नवऱ्याच्या फोनच्या रिंगने येते
“सर इमर्जन्सी आहे ,सर ऑक्सिजन संपत आलाय सर पेशंट सिरियस झाला आहे
सर पेशंटला इंटीब्यूट करायच आहे.
👇 झोपेतून उठून भयंकर गडबडीत जाताना माझ्या नवऱ्याने एकदा चक्क माझी लहान मुलगी तूडवली होती , तिकडून परिस्थिती सेटल करून यायला त्याला सात-साडेसात होतात ,माझा जेमतेम चहा बनवून होईपर्यंत त्याने पाच ते दहा फोन उचललेले असतात.आपल्याला नाष्टा बनवायला किमान पंधरा- वीस मिनिटे लागतात पण
👇
Dec 18, 2020 11 tweets 6 min read
#थ्रेड
#ग्रामपंचायत_निवडणूक

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था सांभाळते.
#सरपंच, #उपसरपंच, #ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला #ग्रामपंचायत म्हणतात.

👇 #ग्रामपंचायत बद्दल थोडक्यात माहिती 👇

कायदा - १९५८ (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम) कलम ५ मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये ६०० लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
Nov 25, 2020 14 tweets 5 min read
#मुंबई_बॉम्बस्फोट
📌
#शिकवण
#अनुभव

25 नोव्हेंबर 2008 ,
इयत्ता आठवीत होतो
दोन दिवसांपूर्वीच तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धेत आमच्या टीम ने दोन राऊंड जिंकले होते ,
मांगील 2 वर्षाची मेहनत होती यंदा जिल्हास्तर गाठायचच होत , ह्या जिद्दीने आम्ही खेळत होतो .
👇 मी त्या टीम चा कॅप्टन होतो , आज आम्ही मित्र जमून उद्या कसं खेळायचा कोण आणि केव्हा रेड करेल अशी सर्व ठरवून घेत होतो,
व नेहमी प्रमाणे संध्याकाळी सर्व उद्याच आयोजन करून घरी गेलो,
तसच आठच्या सुमारास जेवण व उद्याच्या स्पर्धेची तयारी करून ठेवली,
👇
Nov 4, 2020 11 tweets 4 min read
#थ्रेड
#ब्लॅक_टायगर
#रवींद्र_कौशिक
#R_A_W
🇮🇳

भारतात एक असा गुप्तहेर झाला आहे की, तो मृत्यूनंतर देशाचा हिरो ठरला. ते गुप्तहेर म्हणजे रवींद्र कौशिक. भारताचे 'ब्लॅक टायगर' म्हणून ते ओळखले जातात.
👇 यांच्या जीवनावर एक हिंदी चित्रपट ही आला आहे ज्यात जॉन अब्राहम यांची भूमिका निभावतो.
#Romeo_Akbar_Walter
त्यात त्यांनी कशी महत्वाची महिती भारताला पुरवली याची कल्पना येते.
👇
Aug 15, 2020 8 tweets 2 min read
#थ्रेड 📌📌📌

🇮🇳

74 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी ही शपथ घेवून स्वंतत्र भारताचा नवा अध्याय सुरु झाला होता… या प्रवासात आपण कोठुन कुठपर्यंत आलोय याच सिंहावलोकन करण्याचा हा छोटासा प्रयत्न.. 👇 १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री पारतंत्र्याच्या काळ्याकुट्ट पडद्याला बाजूला सारून स्वतंत्र्याचा सोहळा रंगमंचावर मांडण्यात आला. सूत्रसंचालकाची भूमिका पंतप्रधान पंडित नेहरू यांनी चोखपणे निभावली..”अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता..” 👇
Jul 5, 2020 6 tweets 3 min read
#थ्रेड
#खरंच_याला_महत्त्व_द्यायचं_का
कोरोनामुळे आपल्याला आपल्या मुख्य गरजा काय आहे हे लक्षात आलंच आहे,
आपण काही गोष्टींना विनाकारण महत्व द्यायचो असा अनुभव अनेकांना आलाच असेलच,
अश्याच अजुन काही गोष्टी ज्याना आपण खूप जास्त महत्त्व देतो
पण यांना इतकं महत्त्व द्यावं का ? 🤔

1/6 ज्या गोष्टींचे जगात कुठेही नवल वाटल नाही अश्या गोष्टी आपण भारतात मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेतो
त्यातील हे ह्या काही गोष्टी 👇:
1. गोरेपणा - ह्या वर आपण भारतीय इतकं महत्त्व देतो की ह्यामुळे भारतात बऱ्याच कंपन्या गोरे व्हायची क्रीम विकून लाखो कोटी कमावतात .

2/6
Jun 29, 2020 5 tweets 4 min read
#खेळाडूपणा
#थ्रेड
एका शर्यतीत, केनियाचे प्रतिनिधित्व करणारा #धावपटू हाबेल मुताई शर्यतीच्या अंतिम रेषेपासून काही फूट अंतरावर होता, परंतु तो गोंधळून गेला आणि त्याने शर्यत पूर्ण केली असा वाटून धावणे सोडून दिले. स्पॅनिश धावपटू इव्हान फर्नांडिज त्याच्या पाठीमागे होता आणि काय घडत आहे Image हे लक्षात येताच त्याने हाबेलकडे #धावणे चालू ठेवण्यासाठी ओरडण्यास सुरवात केली, परंतु हाबेलला #स्पॅनिश येत नाही आणि त्याला समजले नाही. म्हणून इव्हान ने अंतिम रेषेजवळ येताच त्याला पुढे ढकलले आणि त्याला #जिंकू दिले.
Jun 21, 2020 11 tweets 3 min read
#थ्रेड
#कर्ण
#एक_वेगळा_विचार
#जिवन
" कर्ण " महाभारतातील एक शूर राजा
सर्वोत्कृष्ट धनुर्धर , दानशूर अश्या अनेक कारणांनी आपण त्याला ओळखतो.
त्यांच्या शुरतेच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असणार परंतु कर्ण व जीवन यांची सांगळ घालण्याचा हा प्रयत्न म्हणून कर्ण एक वेगळ्या रीतीने मांडतोय
1/11 महाभारतात कर्ण हि व्यक्तीरेखा "असून अडचण व नसून खोळंबा" या तत्वात बसणारी आहे.मी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे? मी अद्भुत आहे? आणि मी असामान्य व्यक्ती आहे? हे लहानपणापासून जाणले असतानाही त्या व्यक्तीरेखेनी स्वतःला संकुचित ठेवले
तो अजेय होता, तसेच जो पर्यंत त्याच्याकडे कवच-कुंडले आहेत
Jun 20, 2020 8 tweets 2 min read
#चला_अंधश्रद्धेचे_ग्रहण_सोडवूयात

उद्या एक खगोलीय घटना घडणार आहे ती म्हणजे सूर्य ग्रहण.उत्तर भारतातून काही भागात कंकणाकृती तर उर्वरित भारतात हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसेल
ग्रहणाविषयी अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज समाजात प्रचलित असतात.अशाच गैरसमजांचे निराकरण करण्याचा हा प्रयत्न ग्रहण अशुभ असते. ग्रहणे पाहू नयेत*
ग्रहण ही खगोलीय घटना आहे.जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत आणि एकाच प्रतलात येतात तेव्हा चंद्रामुळे सूर्यबिंब झाकले जाऊन सूर्यग्रहण होते. यात शुभ-अशुभ असे काही नाही