अस्पृश्य समाजातील उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणाचा म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्याचे ठरवले. या मंडळींचे जातीभेद मोडून काढून एकीने लढण्यासाठी परिषद घ्यायची असे ठरले. या चर्चेत खुद्द नाना मास्तर, गणू मसू सनदी, नागोजी यल्लापा कांबळे,
तिथून शाहू महाराजांनी दिलेल्या भाषणातील काही भाग..👇🏻
आज माझे मित्र आंबेडकर यांनी या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले आहे. त्यांच्या भाषणाचा लाभ मिळावा म्हणून मी शिकारीतून बुद्ध्या येथे आलो आहे. मिस्टर आंबेडकर हे ‘मूकनायक’ पत्र काढतात व सर्व मागासलेल्या जातींचा परामर्श घेतात‚ याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
(महाराजांनी नियतकालिकासाठी २५००/-रु. मदत बाबासाहेबांना दिली. या घटनेनंतर एक महिन्याने ‘मूकनायक’ बाबासाहेबांनी सुरू केले.)
क्रमशः
१. राजर्षी शाहू छत्रपती यांची भाषणे.
२. के. जी. भालेराव यांचा The Wire साठी लिहिलेला लेख.