दरवर्षी गुरूपौर्णिमा अब्दुल कलामांच्या स्मृती दिनाच्याच काळात येते. २ वर्षांपूर्वी तर गुरुपौर्णिमा २७ जुलैलाच होती. दर वर्षी भावनिक होतो मी या काळात. गुरुपौर्णिमा म्हटलं की कलामांचं लोभस, गोड व्यक्तिमत्व मनात उभं रहातं. +
कलामांनी माझ्यावर पाडलेला प्रभाव म्हणजे एखादा विलक्षण माणूस एका अति-उत्साही + अति-कन्फ्युज्ड मुलाला किती किती आणि काय काय शिकवू शकतो - एक पिढीच कशी घडवू शकतो - याचा वस्तुपाठ आहे.
+
+
दुसऱ्या दिवशी सकाळीच लेक्चर घ्यायला जायचं होतं...जावंसं वाटत नव्हतं अजिबात. पण खुद्द कलामांनाच ते आवडलं नसतं...म्हणून गेलो +
काहीही नं ठरवता, आधी विचार नं करता जे जे बोललो ते नंतर त्याच दिवशी फेसबुकवर लिहिलं होतं.
===
कलाम…अख्खी पिढी घडवणारं विलक्षण रसायन
रात्रभरात ४ दा डोळे टिपून झालेत. आज सकाळी क्लासमध्ये कलाम सरांबद्दल बोलताना +
आमचं नातंच असं होतं.
माझी कलाम सरांशी ओळख झाली तेव्हा मी ८वी-९वीत असेन. नुकताच "कहो ना प्यार है" आला होता. ह्रतिकने जाम वेड लावलं होतं. माझी उंचीसुद्धा ह्रतिक इतकीच पाहिजे असं वाटायचं +
तेव्हा "शास्त्रज्ञ" होण्याची पण खूप स्वप्नं बघायचो. विविध शास्त्रज्ञांची चरित्रं वाचायचो, +
त्याच खटाटोपात अब्दुल कलाम नावाच्या "रॉकेट सायंटिस्ट" बद्दल कळालं.
तेव्हा गुगल करायला internet cafe वर जावं लागायचं. घरून ३० रुपये घेऊन, दोन आठवड्यातून एका शनिवारी +
एका शनिवारी google केलं "abdul kalam" .
माझ्या जीवनाला कलाटणी देणारा search होता तो.
कलामांची, त्यांच्या चाहत्यांनी तयार केलेली एक वेबसाईट सापडली. त्यावर सरांचे २-३ speeches होते. १ तास वाचण्यात घालवणं परवडणार नाही म्हणून +
घरी येऊन ते स्पीच वाचले.
मी काय वाचून बसलोय कळेच ना. काहीतरी वेगळंच होतं ते.
विज्ञान-तंत्रज्ञान-अपंग माणूस --- ह्यांचा संबंद जोडणारा माणूस, भारत भविष्यात नक्की मोठ्ठा होणार - हे सांगणारा माणूस, एका बेटावरून अनेकांच्या मदतीने शिकलेला माणूस… +
त्या नंतर कित्येक दिवस स्पीच वाचत राहिलो. घरी पाहुणे आले की त्यांना स्पीचची फोटो-कॉपी भेट म्हणून द्यायचो. शास्त्रज्ञ होवो नं होवो - हा आशावाद प्रत्यक्ष उतरवण्यात मी सहभाग नक्की घेणार, हे तेव्हाच ठरवलं.
+
असेच अनेक तरुण स्वतःच्या हृदयात कलामांना स्थापित करत होते. आशावादाचं, आत्मविश्वासाचं नातं बनत होतं.
पुढे अग्निपंख वाचलं. Ignited Minds वाचलं. +
काल अनेक मान्यवरांच्या टिप्पणी ऐकल्या. प्रत्येकजण म्हणत होता की "कलाम हे फक्त राष्ट्रपती नाही, तर एक… … …होते".
+
+
त्यांच्या यशोगाथेत एकाहून एक सरस नोंदी आहेत.
+
कलामांनी आमची पिढी घडवली आहे. आम्ही त्यांना असं जाऊ देणार नाही.
+
We won't let you die, Kalam Sir!
तुम्ही प्रज्वलित केलेलं एक मन
===
गुरुपौर्णिमेनिमित्त कलाम सरांना वंदन!
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll.