हे आहेत नेहरूंचे बोल. जनरल करिअप्पा, आपल्या कमांडर इन चीफने चीनच्या संकटावर प्लॅन सांगितल्यावर टेबलवर दाणकन हात आपटून 1/n
पुढे काय घडलं तो इतिहास आहे.
देश कठीण काळात असताना, त्याची फिकीर नसलेल्या लोकांची या नेहरूंना आज मोदींपेक्षा "भारी" दाखवण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे.
नेहरू दासांची कीव करावीशी वाटते.
2/n
पण मग नेहरू चिकित्सा केली की फाऊल वाटतो यांना!
3/n
मोदी लेहला गेल्यावर नेहरूंचा फोटो तुम्हीच समोर आणलात, हो की नाही?
इसरोने कर्तृत्व गाजवल्यावर नेहरूंच्या आठवणींनी डोळे तुम्हीच टिपले, येस ऑर नो?
4/n
स्वतः इतिहास उकरून काढायचा, - 5/n
ऐसा कैसा चलेंगा?
बरं तुम्ही इतिहाससुद्धा सोयीचा काढता लेक हो!
आता म्हणे नेहरूंचं "Scrap The Army!" विधान उघड करणारे लॉकहार्ट "खोटारडे" होते. "भारतद्रोही" होते. (यांना आवडेल ते नं लिहिणारे, बोलणारे असेच खोटारडे असतात!
6/n
आपल्या पुस्तकात हा प्रसंग नोंदवणारे मेजर जनरल डी के पलीत कोण होते? स्वतः आर्मी व्हेटरन तर होतेच, भारत-चीन युद्धाच्या वेळी मिलिटरी ऑपरेशन्सचे डायरेक्टर जनरल होते. अश्या पदावरचा माणूस काहीही लिहून ठेवेल का?
7/n
हे विधान तर सोडाच - चीनच्या संकटाच्या बाबतीत नेहरू किती भोळसट, अनभिज्ञ राहिले यावर भरभरून लिहिलं गेलं आहे.
8/n
"As the author of the official history of that war, I can vouch for one fact, that is all the faulty decisions and strategies in that ill-fated war flew from the basic premise 'China will never attack'. The origin of that premise was
9/n
वर्मांनी तर जागोजागी नेहरू कसे कमी पडले यावर भाष्य केलं आहे.
एक गोष्ट अगदी साधी आहे. चीन आणि भारताचा काहीही संबंध नव्हता. इंग्रजांनी तो हुशारीने, जाणीवपूर्वक येऊ दिला नव्हता -
10/n
अश्या परिस्थिती, तिबेट स्वतंत्र, स्वायत्त रहावा - आणि भारताच्या बाजूने असावा - हा साधा सेन्स होता.
पण नेहरूंच्या सरकारमध्ये तिबेट काय चीज आहे हेच अनेकांना माहिती नव्हतं.
11/n
"कन्फ्युजन" ची...!
वर्मा म्हणतात :
When the Tibetan government turned desperately to India for help, Nehru seemed completely at sea. Appeals for aid were turned down and
12/n
तिबेटने भारताला मदत मागितली...नेहरू कन्फ्युज्ड...!
13/n
आपल्याकडे शेतीची भांडणं डोकी फोडून थांबतात. इथे तिबेट गिळायला चीन आसुसला असताना आमचं ग्लोबल व्हिजन असलेले
14/n
आपल्या सीमा कुणाला भिडल्या आहेत, या प्रकरणानंतर कुणाशी भिडणार आहेत, त्याचे परिणाम काय होणारेत याची काही कल्पना असायला हवी की नको पंतप्रधानांना?!
बरं ही कल्पना "दिली" गेली नव्हती का? तर हो! दिली गेली होती!
15/n
16/n
नेहरूंची प्रतिक्रिया काय?
शिव कुणाल वर्मा उवाच :
17/n
18/n
नेहरूंना चीनला वर्ल्ड स्टेजवर आणायचं होतं, म्हणून मग मिलिटरी नको! शिवाय "जगात" आपली इमेज नको ना बिघडायला!
चिनी ड्रॅगनचं संकट सांगणारे एकटे मुलीक नव्हते. सरदार वल्लभभाई पटेल, शामा प्रसाद मुखर्जी आणि इतर अनेकांनी चीन-तिबेट विषयावर कठोर कृतीचा
19/n
ज्या मीटिंगमध्ये मुलीक यांनी चीन-तिबेट बद्दल आग्रही मत मांडलं, त्यात सरदार पटेल सहभागी नव्हते. नंतर त्यांनी नेहरूंना एक पत्र पाठवलं.
स्टेट्समन कसा असतो - परिस्थितीची जाण कशी असते - याचा अप्रतिम नमुना म्हणजे ते पत्र.
पत्रात सरदार म्हणतात -
20/n
21/n
22/n
काय ओळखलंय पहा चीनला! तिबेटने आपल्यावर विश्वास टाकलाय..आपण मात्र चीनच्या मगरमिठीतून त्यांना सोडवू शकलो नाही आहोत याची जाणीव करून देताहेत!
23/n
"ही आपल्या मित्राची भाषा नाही - हे जणू आपला संभाव्य शत्रू आपल्याशी बोलतोय असं वाटतंय..."
"Their last telegrame to us is an act of gross discourtesy not only in the summary way it disposes of our protest
24/n
पुढे जो भाग देतोय तो कसा बावनकशी सोनं आहे पहा.
25/n
"Chinese irredentism and communist imperialism are different from the expansionism or imperialism of the western powers. The former has a cloak of ideology which makes it ten times more
26/n
28/n
हा विचार जागतिक आऊटलूक असलेल्या
29/n
आणि - सरदार पटेल फक्त इतकाच विचार, मत व्यक्त करून थांबले नाही! त्यांनी भारताने चीन बाबतीत लॉंगटर्म काय विचार करायला हवा हे पण नोंदवून ठेवलं. एक नव्हे, दोन नव्हे, नऊ प्रॉब्लम्स आणि
30/n
त्यातले फक्त दोन सांगतो.
(d) The question of Chinese entry into UN. In view of rebuff which China has given us and the method which it has followed in dealing with Tibet, I am doubtful whether we can advocate its claims any longer.
31/n
(g) Improvement of our communication, road, rail, air and wireless, in these areas and with the
32/n
वाचलात ना? पुन्हा वाचा.
व्हिजनरी नेहरूंनी यांवर काय केलं हा इतिहास तर सर्वज्ञात आहेच.
बाय द वे - हे पत्र कधीचं आहे माहितीये?
७ नोव्हेम्बर १९५०
ही तारीख दोन गोष्टींसाठी महत्वाची आहे.
पहिली महत्वाची गोष्ट - पटेल हे पत्र पाठवल्याच्या अवघ्या ३८ दिवसांत
33/n
दुसरी-भारत चीन युद्धाच्या बारा वर्ष - बा रा व र्ष - आधी पटेलांनी ब्लु प्रिंट आखून दिली होती हो! जर त्यावर काम झालं असतं तर आज दक्षिण आशियातील पावर डायनॅमिक्स वेगळंच असलं असतं. अर्थात, नेहरूंनी
34/n
पुढे पंचशील - जी नेहरूंची व्हिक्टरी म्हणून गाजवली गेली, त्यातून तिबेटची भारताने अधिकृतरीत्या केलेली घोर प्रतारणा, भारताने चीनवर
35/n
आणि हे नेहरू आज तुमच्या आमच्या समोर वर्तमान पंतप्रधानांना "प्रत्युत्तर" म्हणून समोर आणले जातात.
मग का होऊ नये चिकित्सा?
36/n
37/n
चीनने तिबेटवर पूर्ण नियंत्रण मिळवल्यानंतर करिअप्पांनी नेफाच्या सेक्युरिटीचा प्लॅन नेहरूंना सांगिल्यावर नेहरू भडकले. टेबलवर दाणकन हात आपटत म्हणाले -
38/n
सैन्याने काश्मीर आणि पाकिस्तान बघावं.
आम्ही चीन बघू.
छान बघितलात हो. फारच छान.
बरं, काश्मीर तरी सैन्याला हॅन्डल करू दिला का यांनी?
39/n
नेहरूंची देशाच्या संरक्षण स्ट्रॅटेजीच्या बाबतीत हीच लेगसी आहे. भारतावर "नसलेले" दोन प्रश्न लादणे!
40/n
हे इतकं असून आमची आर्मी नेहरूंनी "सक्षम" करून भारतावर फारफार उपकार केले असं सांगत आधुनिकीकरणाची उदाहरणं दिली जातात.
ते आधुनिकीकरण कुठे गेलं ६२च्या युद्धात? इतकी नामुष्की कशी ओढवली? आर्मी चीफ, आयबी, मंत्रिमंडळातील वरिष्ठजन कानीकपाळी ओरडून सांगत होते...
41/n
पराभवाचं कारण हे आहे :
लेफ्टनंटजनरल व्ही के कपूर सांगतात :
"Nehru continued to appease the Chinese and the untimely death of Sardar Patel took away all opposition to Nehru’s views.
42/n
"भारतीय सैन्याला कार्यवाही करण्याची "खुली छूट" दिली आहे" - असं छातीठोक सांगू शकणाऱ्या मोदींच्या समोर स्पर्धा करायला या नेहरूंना आणून बसवताय तुम्ही?
43/n
तरी नेहरूंची चिकित्सा करू नका म्हणताय?
वरील सर्व गोष्टी नाकारू शकता तुम्ही.
वरील सर्व प्रसंग खोटे, सर्व दाखले फेक, सगळे लोक संघी.
वाट्टेल ते नाकारू शकता.
पण -
44/n
तो इतिहास कसा बदलाल?
त्यासाठी कुणाला जबाबदार धराल?
एक गोष्ट समजून घ्या.
नेहरू फक्त तुमचेच "पहिले पंतप्रधान" नाहीत. माझेही आहेत. त्यांचं अपयश माझ्या देशाचं अपयश आहे. मोदींचं एखादं खरं-खोटं अपयश तुम्हाला असुरी आनंद देऊन जात असेल.
45/n
पण, माझ्यासाठी वर्तमान जास्त महत्वाचा आहे. तो तुम्ही नासवताय. माझ्या देशाच्या वर्तमान पंतप्रधानाची खिल्ली उडवायला तुम्ही सोयीस्कर इतिहास उगाळताय. मग आम्ही गप्प बसू शकत नाही.
46/n
तुम्हाला कुणाचं भक्त व्हायचंय, कुणाची चाकरी करायचीय हा तुमचा प्रश्न आहे. काहीच हरकत नाही.
पण आज देशासमोर कठीण परिस्थिती असताना, देशाचं सैन्य मोठ्या आव्हानाला सामोरं जात असताना आमचे पंतप्रधान आणि आम्ही सगळेजण एकत्र आहोत.
47/n
जुने फोटो शेअर कराल तर फोटोमागच्या खऱ्या कहाण्या देखील बाहेर येतील.
48/n
पुढे तुमची मर्जी.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
facebook post link: facebook.com/OmkarDabhadkar…
@threadreaderapp please unroll.