My Authors
Read all threads
पंचमहाभूतं - Higgs Boson Particles - इंद्रदेव : भारतीय सांस्कृतिक इतिहास

जॉब करायचो तेव्हाचा प्रसंग. आमच्या मार्केटिंग डिरेक्टरशी हिंदू धर्माच्या इतिहासाबद्दल एक अनाहूत संवाद झाला.

झालं असं की मी काम करण्यात गुंग होतो आणि हा मागून आला आणि मला बघून मोठ्याने

१/n
"ओमकारा…!" म्हणाला. साहेबांचा मूड चांगला होता बहुतेक. मी हसून म्हणालो "Yes Sachin?"

"यार ये ओमकार का मतलब क्या होता है?"

हायला! आपल्याला तर चान्सच पाहिजे! मी एक छोटंसं भाषणच ठोकलं. सध्याचा प्रचलित अर्थ, वैदिक भारतात अपेक्षित असलेला अर्थ वगैरे.

बॉस तसा भयंकर अभ्यासू.

२/n
मन लावून ऐकत होता, मान डोलवत होता.

मग विचारतो - तुम्हे मेरे नाम का, सचिन का, मतलब पता है?

मी म्हटलं नाही.

तर म्हणतो - It's lord Indra's name, man. What a stupid name. If I knew my parents were going to have me named Sachin, I would out-rightly object.

३/n
What would you choose instead of Sachin? - मी!

जरा विचार करून म्हणतो - something related to Higgs Boson Particles.

मी थोडंसं हसून म्हणालो - But Sachin, इंद्र का मतलब, लगभग वही है...

ह्यां? What? Are you f*****g serious?

मी: Yeah of course.

You see, -

४/n
the Brahmna, Vishnu, Mahesh trio, other Gods and all...they came into picture in recent times of our civilization. Initially, it was the पंचमहाभूत that were worshiped as almighty gods.

And - Lord Indra was supposed to be their supreme authority.

५/n
Don't you know - the stories of यज्ञ and पूजा in the honor of Lord Indra, that used to happen to make him happy in order to get sufficient amount of rains and all?

६/n
So in a way, if you consider पंचमहाभूत as the composite of God Particles, Lord Indra IS the force behind the God Particle.

Unfortunately, these days the TV serials have depicted the pathetic image of Indra...that's why this origin of the concept is not known.

७/n
"क्या बात कर रहा है बे! Interesting! Thanks bhai! I will read on this!"

===========

काल "हिंदू ग्रंथांची खिल्ली उडवणे म्हणजेच चिकित्सा करणे" अश्या आवेशात भांडणारे लोक बघून हा तसा विस्मरणात गेलेला प्रसंग एकदम आठवला.

८/n
धार्मिक इतिहास, ग्रंथ, आख्यायिका हे सगळं दोन विरुद्ध टोकांमध्ये विभागलं गेलं आहे.

एकीकडे आमच्या पूर्वजांना विमानं उडवता येत, त्यांना अणुविज्ञान माहिती होतं असं ठरवलं जातं. दुसरीकडे प्राचीन भारत म्हणजे नाग खेळवणाऱ्या गारुड्यांशिवाय काहीच नाही असं भासवलं जातं.

९/n
आपले पूर्वज किती प्रगत होते हे थेट हडप्पा संस्कृतीच्या अवशेषांपासून कोणार्कच्या सूर्यमंदिरापर्यंत समोर उभ्या असलेल्या कित्येक पुराव्यांवरून कळत असताना, आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर तावूनसुलाखून सिद्ध करता येत नाही अश्या वैदिक विज्ञानाचा अट्टाहास का करावासा वाटावा कळत नाही.

१०/n
याने आपण हास्यास्पद ठरवलो जातो, खिल्लीचा विषय बनून जातो याचं भान बाळगायला हवं.

त्याचवेळी, हजारो वर्षांचा सांस्कृतिक इतिहास असलेल्या, एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच संस्कृती पृथ्वीवर आहेत आणि आपली त्यांपैकी एक आहे - हे साधं सत्य मान्य केलं तरी हे लक्षात येऊ शकतं

११/n
की इतक्या मोठ्या कालावधीत टिकलेली, रुजलेली, वाढलेली संस्कृती "मागास" नक्कीच असू शकत नाही. काही ना काही टेक्निकल-टेक्नॉलिजीकल प्रगती नक्कीच झालेली असणार. कात्रीपासून कितीतरी गोष्टी भारतीय मातीनेच दिल्यात जगाला. काव्यशास्त्रविनोदात आपल्या पूर्वजांचा हात फार कमी देश धरू शकतात.

१२/n
फार कशाला - उपनिषद गंगा नावाची दूरदर्शनवरील सिरीयल बघा. फक्त ५२ एपिसोड्स आहेत. भारतीय तत्वज्ञान काय चीज आहे कळेल.

दोन्ही बाजू समजून घेऊन, दोन्ही एक्स्ट्रीम टोकं नाकारून, आपल्याला एक अतिशय श्रीमंत वारसा लाभलाय - हे मान्य करून, त्याबद्दल धन्यता बाळगून, त्याचा आनंद लुटून -

१३/n
आजच्या जगात खणखणीत कर्त्तृत्व गाजवण्याची प्रेरणा नाही का घेऊ शकत आपण?

वरील प्रसंग, माझ्या बॉस आणि माझ्यातील संवाद, वाचून तुम्ही ३ वेगवेगळे निष्कर्ष काढू शकता.

पहिला - आमच्या पूर्वजांनी हिग्ज बोसॉनच्या गॉड पार्टिकलचा शोध लावून ठेवला होता!

दुसरा - फालतू काहीतरी काव्य आहे

१४/n
आणि त्याचा ओढूनताणून अर्थ लावून स्युडो सायन्स उभारलं जातंय!

तिसरा - आपले पूर्वज हुशार होते...तेव्हा उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीवर त्यांनी काही कलात्मक ठोकताळे उभारले, त्यावर तत्कालीन देवता निर्माण झाल्या...आज त्यांचं आधुनिक विज्ञानाशी असलेलं नातं एकाचवेळी गमतीशीर आणि

१५/n
विचारात टाकणारं आहे...!

तिसरा पर्याय - तुम्हाला पटो नं पटो - सर्वसामान्य भारतीयाने निवडलेला पर्याय आहे.

हा पर्याय समोर आल्यामुळे माझ्या बॉसला त्याचं नाव आवडायला लागलं.

काय वाईट आहे यात?

१६/n
आणि हो - हे फक्त भारतीयच नाही, जगभरात मान्य झालेलं वास्तव आहे की कित्येक आधुनिक वैज्ञानिक शोध काही शतकांपूर्वी होऊन गेलेल्या अनेक चित्रकार, लेखक, कवीच्या कलेत मांडल्या गेलेल्या संकल्पनांशी साधर्म्य बाळगतात. म्हणून ते कलाकार लोक शास्त्रज्ञ होतात का? अर्थातच नाही.

१७/n
हा फक्त अचाट होऊन समजून घेण्याचा, आनंद लुटण्याचा विषय आहे. तो आनंद का लुटू नये? त्यावर हरखून जाऊन चर्चा का करू नये?

एकदा हे सगळं समजलं ना, की मग तुम्हाला रामाने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली होती की नाही - याचं खरंखोटं करण्यात स्वारस्य उरणार नाही.

१८/n
आपण महाभारत वाचतो म्हणजे काही हजार वर्षांपूर्वीचा इतिहास कथारूपात वाचत आहोत - हे डोक्यात घुसलं की त्यातील चमत्कार, लग्न वगैरे विधी "समजून" घेणं सोपं पडतं.

आणि सर्वात महत्वाचं -

१९/n
वर्तमान काळातील नीतिमत्ता, सामाजिक नियम, वैज्ञानिक समज - यांच्या कसोटीवर आपला इतिहास तावूनसुलाखून बघण्याचा हास्यास्पद मोह टाळता येतो.

"चिकित्सा करणं आवश्यक आहे" असं म्हणताना - चिकित्सा कशासाठी, त्यातून काय साध्य होणार, त्यातून वर्तमान अधिक समृद्ध होणार का,

२०/n
भविष्य अधिक उन्नत असणार का - या कसोट्या वापरता यायला हव्यात.

जर हे भान आलं नाही, तर त्या गारुड्याने पुंगी वाजवल्यावर डोलणाऱ्या सापासारखे होऊन जाल तुम्ही.

२१/२२
डोलत रहाल फक्त. लोक येतील, टाळ्या वाजवतील, निघून जातील.

साध्य शून्य!

: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com

@threadreaderapp please unroll.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Omkar Dabhadkar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!