My Authors
Read all threads
#बेरोजगार आहात? स्वतःचा #व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहात? व्यवसाय काय करावा हे सुचत नाहीये? नवीन कल्पना शोधत आहात? मग हे नक्की वाचा :

व्यवसाय म्हणजे मोठी रिस्क, व्यवसाय म्हणजे २४X७ ची नोकरी हे आपण ऐकलेच असेल.
👇
खूप सारे नवीन व्यवसाय, नवीन #स्टार्टअप्स चालू झालेले आपण पाहिले असतील. ७०% नवीन व्यवसाय एका वर्षात बंद पडतात हेही ऐकलं असेल. नवीन व्यवसाय उभारताना रिस्क कमी करण्यासाठी, चांगली कल्पना शोधण्यासाठी आणि व्यवसाय उभारण्यासाठी या काही टिप्स -
👇
१. व्यवसाय करायचा असेल तर पहिल्यांदा ग्राहकाची #गरज ओळखायला शिका. आपला ग्राहक कोण असावा हे ठरवा, त्यानुसार त्यांच्या गरजा त्यांचे प्रश्न काय आहेत हे समजून घ्या. एकदा का तुम्हाला ग्राहकाच्या गरजा समजल्या की त्या आपण कशा पूर्ण करू शकतो याचा विचार करा.
👇
२. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जी कल्पना सुचली असेल त्याच कल्पनेवर व्यवसाय करणारे इतर लोक असू शकतात. त्यामुळे मार्केट मध्ये तुमचे #स्पर्धक कोण कोण आहेत हे शोधा. त्यांच्या व्यवसायातल्या त्रुटी शोधा. त्यावर अभ्यास करा. त्या त्रुटींच्या मुळाशी जा.
👇
३. इतरांच्या त्रुटी तुमच्या व्यवसायात नसल्या पाहिजेत त्यामुळे त्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहा. तुम्ही जर त्रुटी दूर केल्या तर "ग्राहकाने तुमच्याकडे का यायचं?" या प्रश्नाचं ते उत्तर असेल. आणि हे उत्तर प्रत्येक व्यवसायात असायला पाहिजे.
👇
४. व्यवसायातून आर्थिक उलाढाली कशा होणार आहेत, पैसे येणार किती आणि खर्च किती होणार याचा ताळेबंद करा. आर्थिक नियोजन अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करा. वायफळ खर्च कसे टाळता येतील यावर भर द्या. CA/CS/मेंटॉर यांचा सल्ला घेतल्यास उत्तम.
👇
लक्षात घ्या, कोणत्याही व्यवसायात पैसे वाचवणे हे पैसे मिळवण्यासारखे असते.

५. व्यवसाय सुरु करताना किमान पुढच्या पाच वर्षांचे #ध्येय ठरवून आणि #नियोजन करून पावले उचला. भविष्यात व्यवसायाच्या विस्तार कसा करायचा आहे याचा विचार आणि प्लॅन तयार असणे उत्तम.
👇
६. भविष्यात येऊ शकणारी संकटे, व्यवसायातील #चढ_उतार याचा सविस्तर अभ्यास करून त्या संकटांवर मात करण्यासाठी तुमचे प्लॅन तयार ठेवा. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी तयार ठेवा. अगदी व्यवसाय अयशस्वी झालाच तर त्याचा #रिकव्हरी_प्लॅन पण तयार असायला हवा.
👇
७. तुम्ही जो काही व्यवसाय करणार असाल त्यासंबंधी सर्व #कायदेशीर बाबी समजून घ्यायला हव्यात. सर्व कायदेशीर बाबी तपासून, तुमची बिझनेस आयडिया, तुमचे प्लॅन, तुमचे पाठबळ आणि आर्थिक बाबी यावर आधारित एक तगडे बिझनेस मॉडेल तयार करा.
👇
८. कोणताही व्यवसाय #मार्केटिंग शिवाय अपूर्णच असतो. तुम्ही केलेले बिझनेस मॉडेल तोपर्यंत यशस्वी होत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचे मार्केटिंग ताकतीने करत नाही. ग्राहकांच्या गरजा भागवणारे बिझनेस मॉडेल ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी जबरदस्त मार्केटिंग असणे खूप गरजेचे असते.
👇
मार्केटिंग वर लक्ष द्या आणि व्यवसाय मोठा करण्यासाठी उत्तम मार्केटिंगचे प्लॅन करा.

९. वरील सर्व गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही प्रत्यक्षात व्यवसाय सुरु करायला हरकत नाही. इथे तुमचा रिस्क फॅक्टर कमी झालेला असेल. तुमची रिस्क कॅल्क्युलेटेड रिस्क मध्ये रूपांतरित झालेली असेल.
👇
टिप : माझ्या अनुभवातून मी या टिप्स देत आहे. काहींचे अनुभव कदाचित यापेक्षा वेगळे असू शकतील. तरी तुम्ही व्यवसाय करताना सखोल अभ्यास करावा आणि योग्य मार्गदर्शन घ्यावे. माझ्या टिप्स फायदेशीर ठरल्या तर नक्की कळवा. All the best..!

#दिग्विजय_004
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Digvijay Vibhute

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!