१८३० रोजी भोज या झांशीजवळील छोट्याश्या गावात झाला. वडील मूलचंद व आई धनिया यांची एकुलती एक कन्या. अत्यंत शूर. भोज हे गाव जंगलाजवळ असल्याने गावकऱ्यांना नेहमीच हिंस्र पशू व दरोडेखोरांशी सामना करावा लागे.
झलकारीबाई एकदा गुरे घेऊन रानात गेली असता अचानक एका चित्त्याने तिच्यावर झडप घातली.
लग्नानंतर दोघेही पतीपत्नी राजाराणीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले असता, झलकारीबाई मधील तडफ हेरून राणीने तिला आपल्या पदरी नोकरीत ठेवून घेतले.
" मेरी झांसी नहीं दूंगी।"
आणि एका क्षणी घात झाला. भारताला असलेला फितुरीचा शाप फळास आला. दुलाजी ठाकूर फितुर झाला. हे झलकारीबाईने राणीच्या कानावर घातले. राणीने महत्त्वाच्या सरदारांची बैठक घेतली.
हे ऐकून राणीच्या डोळ्यात अश्रू आले.
आणि झलकारीबाई किल्ला लढवण्यास सिद्ध झाली. ती निकराने किल्ला लढवत होती, पण दुलाजीच्या माणसांनी तिला पकडले व कैदेत ठेवले. पण ती तेजस्वी वीज होती, ती कैदेत कशी राहील?
अशा अनेक अनाम रणरागिणी व अनाम वीरांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे. आज त्यांच्यामुळे आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत.