१५ मार्च २०२० ला सरकारने EIA कायद्यात बदल करण्यासंदर्भात माहिती जाहीर केली. लोकांची मते जाणून न घेणे आणि कोरोनाचा गैरफायदा घेऊन उद्योगपतींच्या फायद्याचे कायदे बनवणे हा मुख्य हेतू.
२००६ च्या EIA नुसार जर एखादा प्रकल्प पर्यावरणावर परिणाम करत असेल तर त्या संदर्भात लोकांना सरकार जवळ मत मांडण्यासाठी ३० दिवसाचा कालावधी दिला गेला होता (जो खूपच कमी होता) पण २०२० च्या EIA नुसार हा कालावधी कमी करून २० दिवस इतका करण्यात
२०२० EIA नुसार एखादा प्रकल्प बांधणी सुरू झाला आहे किंवा पूर्ण झाला आहे आणि त्याच्याकडे EIA नाहीये तर त्याला कोणतीही अडचण येणार नाहीये. त्याला तो नंतर मिळवता येऊ शकतो.
(नियम पळण्यासंदर्भातील कायदे सुधारणा)
२००६ च्या EIA नुसार प्रत्येक प्रकल्पाला दर ६ महिन्याला पर्यावरण नियम पाळण्याचा रिपोर्ट सरकाकडे द्यावा लागत असे.तोच २०२० च्या EIA नुसार १ वर्ष इतका करण्यात आला आहे. याचा सर्वात मोठा परिणाम छोट्या गोष्टीवर होईल
( नियमांचे उल्लंघन केल्या संदर्भात तक्रार कोण देऊ शकते?)
जर एखादा प्रकल्प पर्यावरणावर परिणाम करत असेल तर त्या संदर्भात तक्रार करण्याचा अधिकार दोनच लोकांना असेल एक म्हणजे सरकार आणि दुसरा तो प्रकल्प स्वतः..😂
(सरकार कडून दिली गेलेली अत्यंत महत्त्वाची सूट)
एखाद्या प्रकल्पाबद्दल सरकारला वाटेल की यामध्ये लोकांचे मत जाणून घेण्याची गरज नाही. तर सरकार अशा प्रकल्पामध्ये जनतेची मते जाणून न घेता निर्णय देऊ शकते. यामुळे जनतेची ताकद कमी होईल.
LAC पासून १०० किमी अंतराच्या क्षेत्रात सरकार कोणताही प्रकल्प विना माहिती उघड केल्या सुरू करू शकतो. LAC भाग हा पूर्णतः पर्यावरण समृध्द आहे तिथे सरकार कोणतीही माहिती उघड न करता बेछूट वृक्षतोड करून प्रकल्प सुरू करू शकतो.
" eia2020-moefcc@gov.in " या मेल आयडी ला मेल करून सरकाच्या उणीवा दाखवून द्याव्यात आणि कायद्यात जे बदल केले जात आहेत ते चुकीचे आणि पर्यावरण विरोधी आहेत हे आपल्या शब्दात मांडून पाठवून द्यावे.🙏🏻
mediafire.com/file/t9ljyuyq1…
सर्वांनी सहभाग घेऊन पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करावे..🙏🙏
mediafire.com/file/mnjqyh88n…