My Authors
Read all threads
समर्थ रामदास स्वामी यांच्या बद्दल काही महत्त्वाची माहिती. 🙏🙏
समर्थांचे मूळ नाव म्हणजे नारायण सूर्याजी ठोसर. त्यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला. अगदी बालपणापासूनच ते रामाचे आणि हनुमानाचे उपासक होते.
#समर्थ_रामदास #स्वराज्य #samarth_ramdas #sajjangad #Maharashtra
श्रीरामांच्या प्रति त्यांची भक्ती पाहून लोकांनी त्यांना रामदास हे नाव दिले. किशोर वयातच त्यांनी संसाराचा त्याग करून नाशकाची वाट धरली. पुढील १२ वर्षे त्यांनी रामाची उपासना केली. बालपणापासूनच त्यांना कठोर व्यायामाची आवड होती. नित्य व्यायामाचा नेम ते कधी चुकवत नसत.
त्यांनी बलदंड अशी शरीरयष्टी कमावली होती. इ.स. १६३२ मधे त्यांनी भारत भ्रमण करण्यासाठी महाराष्ट्र देश सोडला. त्यांनी त्यांच्या अध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केली. पुढील १२ वर्ष त्यांनी भारतात लोकांची अवस्था कशी आहे ह्याची पाहणी केली.
या काळात त्यांनी आपल्याच देशात हिंदूंची कशी दयनीय अवस्था आहे, हे दर्शविण्यासाठी "आस्मानी सुलतानी" आणि "परचक्र निरूपण" हे दोन ग्रंथ लिहिले. याच काळात त्यांची भेट शिखांचे गुरु हर गोविंद सिंग यांच्याशी झाली.
या भ्रमंती वरून परत आल्यावर त्यांनी हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम हाती घेतले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मारुती मंदिरांची स्थापना केली. त्या काळी संपूर्ण भारतात पातशाही आणि आदिलशाही सारखी जुलमी राजवट होती. हिंदूंना स्वतःच्या परमेश्वराची पूजा करायची चोरी होती.
समर्थांनी ह्या विचारसरणीला झुगारून शत्रूच्या राज्यात जाऊन अध्यात्मिक मिरवणुका काढल्या. त्या काळात वारकरी संप्रदाय असल्याने सर्व जण विठ्ठलाची पूजा करत असत. परंतु परकीय शासन असल्या कारणाने आपण सर्वांनी रामाची पूजा अर्चा केली पाहिजे अशी संकल्पना मांडली.
प्रभू रामचंद्र म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे सशस्त्र प्रतीक. त्यांची उपासना करणे ही काळाची गरज होती. समर्थांनी रामदासी संप्रदायाची स्थापना केली. या संप्रदायात लोक रामाची उपासना करत. हे लोक युद्धसराव देखील करत असत. संप्रदायात येण्यासाठी किमान १०० सूर्यनमस्कार घालण्याची अट असे
रामदासांचे अनुयायी वेगवेगळ्या प्रदेशात फिरून पातशाही विरूद्ध प्रचार करण्याचे काम करायचे. लोकांना हिंदवी स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत जोडण्याचे आव्हान करायचे. आदिलशाही च्या भागात असणाऱ्या चाफळ येथे त्यांनी श्रीरामांचे भव्य मंदिर स्थापन केले.
समर्थांनी जावळी प्रांतातील शिवथर घळीत वास्तव्य करून तब्बल ८ वर्षांमध्ये दासबोध हा ग्रंथ रचला. एक दिवस शिवाजी महाराज आणि संत तुकारामांची आळंदी येथे भेट घडली होती. शिवाजी महाराजांनी संत तुकाराम यांच्या कडे अनुग्रहाची मागणी केली.
तुकाराम यांनी राजेंना नकार देत सांगितले की योग्य वेळ आल्यावर आपल्याला योग्य अशा गुरूंची साथ लाभेल. तो पर्यंत आपण प्रतीक्षा करावी. शिवाजी महाराज आणि समर्थांमध्ये नेहमी पत्र व्यवहार होत असे. समर्थांचे अनुयायी अनेक गुप्त कामांमध्ये महाराजांची मदत करत असत.
हिंदवी स्वराज्याच्या काऱ्यसिद्धी साठी समर्थांनी नेहमीच शिवाजी महाराजांचे मार्गदर्शन केले. पण प्रत्यक्षात त्यांची भेट ही इ.स. १६७२ मधे झाली. समर्थांनी शिवाजी महाराजांवर एक काव्य रचले होते. त्यामुळे जिजाबाईंनी राजांना समर्थांची भेट घेऊन त्यांचा अनुग्रह घेण्यास सांगितले.
छ्त्रपती शिवाजी महाराज आणि समर्थांची चाफळ मधे भेट घडली आणि शिवाजी महाराजांना गुरुमंत्र भेटला. एकदा युवराज संभाजीराजे ह्यांनी समर्थांना विचारले की या शत्रूच्या प्रदेशात तुम्ही लोक स्वतःचे रक्षण कसे करता. तेव्हा समर्थांनी त्यांच्या चालण्याच्या काठीतून एक धारदार पाते काढून दाखवले.
त्यांनी सांगितले की आम्हाला सर्व प्रकारच्या युद्धकला अवगत आहेत. पुढील काळात समर्थ रामदास स्वामी ही परळी च्या किल्ल्यावर वास्तव्यासाठी गेले. समर्थांसारख्या सज्जन पुरुषांचे वास्तव्य असलेल्या परळी च्या किल्ल्याचे नाव सज्जनगड पडले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर समर्थांनी छत्रपती संभाजी महाराजांना अनुसरून एक पत्र लिहिले आणि आपल्या पित्या प्रमाणे च धर्म रक्षणाचे काम हाती घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. समर्थांचे निधन १६८१ साली सज्जनगडावर झाले.

जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩🚩
वरील थ्रेड मधील सांगितलेल्या माहिती ची तुलना काही समाजकंटक लोकांनी सांगितलेल्या स्वरचित इतिहासा सोबत करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना हाती धरून आपले स्वतःचे मत बनवा. ही आहे समेथांची थोरवी.
#marathiblogger #swaraj #Maharashtra
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with PM Patil

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!