स्युडोसेक्युलर लबाड आणि टोकाचे हिंदुत्ववादी यात अडकलेल्या सामान्य हिंदू माणसाची अवस्था अगदी अशीच आहे.
१+
दाभोलकरांचे विचार आणि त्यांच्या कृतीची दिशा काय होती यावर व्यवस्थित प्रकाश टाकणारं
२+
दाभोलकर "फक्त हिंदू धर्मावरच घसरतात" ही टीका चुकीच्या गृहितकावर आधारित आहे.
३+
पण क्षणभर
४+
दाभोलकरांनी फक्त हिंदू धर्मातल्याच अनिष्ट प्रथांवर काम का केलं? - ही तक्रार "तुमच्या आईवडिलांनी फक्त तुमचाच अभ्यास का घेतला?" असं विचारण्यासारखी आहे.
५+
एकीकडे हिंदू समाज परिवर्तनीय आहे, आमच्याकडे प्रबोधनाचा वारसा आहे हे सगळं अभिमानाने म्हणायचं. पण वर्तमान प्रबोधनकार,
६+
"हिंदू ग्रंथप्रामाण्य मानत नाहीत",
७+
हिंदूना नरेंद्र मोदी विश्वासार्ह का वाटतात, महात्मा गांधी का आवडतात - नरेंद दाभोलकर आदरणीय का वाटतात - हे याच गौरवशाली इतिहासाला हिंदू मनासोबत पडताळून बघितलं की जाणवतं.
८+
नरेंद्र मोदी फक्त राम मंदिर बांधत नाहीत, मेट्रो पासून ऑप्टिक फायबरपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर ही उभारतात : म्हणून आवडतात हिंदूंना.
हा आजचा नव्हे - छत्रपती शिवरायांपासूनचा इतिहास आहे.
९+
ज्या इतिहासाचा आपण अभिमान बाळगतो, मोठ्या अभिमानाने, "आपण हिंदू सतत बदलत, सुधारत आलो आहोत" असं म्हणतो, तो इतिहास कुणी घडवला? सुधारकांनीच ना?
मग तो इतिहास जर गौरवशाली वाटतो, तर तोच इतिहास वर्तमानात घडवणाऱ्यांना मदत करायची की पाय ओढायचे?
१०+
११+
दुटप्पी लोक स्वतःला सुधारक म्हणवतात आणि इस्लामची तळी उचलतात...म्हणून सगळेच सुधारक तसेच असतात असा समज व्यवस्थित रुजला आहे. हिंदू धर्मातील अनिष्ट गोष्टींचा विरोध करायचा म्हणजे तिची फक्त
१२+
१३+
हिंदुत्ववाद फक्त इस्लाम, ख्रिश्चन धर्मांच्या "संकटा"मुळे उभा आहे का?
१४+
हिंदू धर्माचं "प्राचीन ऐश्वर्य" पुनःप्रस्थापित करायचं आहे म्हणजे नेमकं काय? हिंदू समाज आधुनिक करायचा आहेच ना?
आपण "प्रतिगामी" नाही आहोत - हे कुणाला
१५+
हिंदुत्व फक्त सेंटीमेंटल भडक
१६+
ते तपासलं की मग अंधश्रद्धा निर्मूलन समाजवाद्यांच्या, डाव्यांच्या, तुमच्या मते - "हिंदुद्वेषी" असणाऱ्या लोकांचा कॉपीराईट विषय रहाणार नाही. आपण देखील त्यात उतरू शकू.
१७+
दाभोलकरांचा द्वेष करणारे लोक बघून ही गरज पुनःश्च प्रकर्षाने जाणवली.
सुदैवाने, दाभोलकरांबद्दल मनापासून आदरच नव्हे, प्रेम, आपुलकी असणारे अनेक हिंदुत्ववादी आहेत.
१८+
"हिंदुत्ववाद हिंदूहितापासून दूर जाणार नाही" ही आशा याच काही चेहऱ्यांमुळे कायम आहे.
१९+
प्रबोधन करणं आवश्यक आहे.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp please unroll.