My Authors
Read all threads
📌📌📌

सवय लावून घ्या. आता अशा 'अस्मिता' जाग्या होतच राहतील..

कंगनाबाई व्हायरल होणे नवीन नाही. यंदाचे व्हायरल 'ट्रोल'च्या माध्यमातले आहे. निमित्त असंय की, तिला 'मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे.' हा म्हणजे.. आम्हाला तितकंच सांगण्यात आलं.. त्याआधी राऊत साहेबांच्या..
धमकीबद्दल वर्तवलेली भीतीचे शब्द आम्ही विसरून गेलो. आम्हाला फक्त आमच्या मुंबईला बोलल्याचं लागलंय. एकदम खोलवर.. यापुढे कंगना बोलणार त्यावरून आमच्या मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाची रेंज ठरवली जाणार. बरोबर ना? असो.. थ्रेड लिहितो म्हटल्यावर अनेकांनी लाइक, रिप्लाय देणंच टाळलं.
उद्या कोणावर बरसणार हे माहिती नाही. उगाच आता समर्थन देऊन तोंडावर न पडलेलं बरं.. अर्थात या सर्वांचा आदर! मुळात थ्रेड कंगना किंवा राऊत यांच्यापैकी कोणाच्याही वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी नाहीचे.. म्हटलं, आपल्या 'अस्मिता' कशा कामचलाऊ आहेत त्यावर लिहू...आणि कंगनापेक्षा मुंबई मोठी आहे
म्हणून तिच्या वक्तव्याला मी महत्त्व देत नाही. राऊत काय आहेत हे महाराष्ट्र जाणतो त्यामुळे त्याच्या राजकारणच भाग आम्ही होऊ इच्छित नाही.

एकेका अस्मितेला हात घालू.. राजकारणाची अस्मिता वाचताना 'कार्यकर्ते' मंडळींनी बर्नोल किंवा आग विझेल असं काहीतरी जवळ घेऊन बसावं ही..
अस्मितेच्या नावाखाली प्रांजळ विनंती. तर या अस्मितेचा खेळ सुरु करू.

१. मुंबईची अस्मिता : तर #माझी_मुंबई हॅशटॅग ट्रेंड करून मुंबईवर उतू गेलेलं (खोटं) प्रेम पाहून डोळे (खोटे खोटे) भरून आले. म्हणजे हे ट्विटणारे तेच.. जे उद्या मुंबई विरुद्ध चेन्नईचा आयपीएल सामना असेल तेव्हा..
मुंबईची उणीधुणी काढायला पुढे असतील. मुंबई श्रेष्ठ की पुणे या विषयवार वाद घालताना पार दोन्ही शहरांच्या इज्जतीचा भुगा करतील. पण यामुळे आमच्या शहराची अस्मिता दावणीला लागणार नाही. फक्त कंगना बोलली की 'असं वाटतंय' तर तत्काळ आमचे सोशल मीडियावरचे क्रांतिकारक जागे झाले. (आता क्रांतिकारक
म्हटलं म्हणून, त्या शब्दाचा अपमान झाला असं म्हणणारे बिनडोकही बरेच आहेत) म्हणजे केवळ एखाद्या हॅशटॅग किंवा ट्रेन्डला समर्थन द्यायचंय, आपल्या 'रिट्विट करा रे' ग्रुपवर सांगितलंय म्हणून सहभागी व्हायचंय अशा मंडळींनी यापुढे मुंबई लोकलमधून लटकत प्रवास करताना, खड्ड्यांवरून पडून मेल्याने..
पालिकेच्या भोंगळ कारभाराची परिसीमा गाठल्यानंतर एकही विरोधी ट्विट करू नका.. कारण मुंबईला काहीएक म्हणायचं नाही. मुंबई शब्द घेऊन विरोधातील चकार शब्द काढायचा नाही. नाहीतर, पोट्टेहो 'तुमच्या स्वतःच्याच' अस्मिता दुखावतील.

२. मुंबई पोलिस अस्मिता : मुंबई पोलिसांची स्कॉटलंड स्कॉडसोबत..
तुलना होते हे ऐकून लहानपणापासून एक आदरपूर्वक उत्सुकता पोलिसांबद्दल माझ्या मनात आहे. अलीकडे सुशांतसिंह राजपूत केसमुळे 'मुंबई पोलिसांचा अपमान झाला' हे जे काही चित्र तयार केलं गेलं आणि मग आमच्या रिकामटेकड्या कार्यकर्त्यांना #ISupportMumbaiPolice चालवण्यात सांगितलं तो आपल्याच..
मूर्खपणाचा कळस होता. 'नेहमी चिल्लर आवाज करते, नोट शांतपणे आपले मोठेपण सांभाळत असते' हे साधं तत्त्व आपल्या ध्यानी येऊ नये? थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन पहा, आपल्याच राज्यकर्त्यांनी मुंबई पोलिसांवर विश्वास नाही का हा उलट प्रश्न विचारून प्रकरण चिघळवलं. आणि राऊत याबाबत ज्या हिरीरीने
लढत होते ते पाहता.. गलवान खोऱ्यात 'बिहार रेजिमेंट'ने शौर्य गाजवलं, तेव्हा इतर रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय? या वाक्याचा आम्ही काय अर्थ घ्यावा? इतरांमध्ये माची मराठा रेजिमेंटपण आलीच की.. दुसरीकडे मुंबईच्या आयुक्तांनी नेत्यांच्या घरी जाऊन भांडीधुनी करावी हे..
दस्तुरखुद्द उद्धव ठाकरेंचे वाक्य मुंबई पोलिसांची अस्मिता वेशीवर टांगणारे नाही का? शरद पवारांनी पुणे पोलिसांची चौकशी लावू म्हटलं की पुणे पोलिसांची अस्मिता जागृत झाली नव्हती का? उगीच आपण आपल्या अस्मितांना 'राजकारणी' लोकांच्या नादी लागून 'पक्षपाती' का करत आहोत? मुंबई पोलिस..
श्रेष्ठ होते, आहेत, राहतील. कोणाच्या ट्विटमुळे त्यांचे महत्त्व कमी होणार नाही.

३. मराठी माणूस अस्मिता : एकेकाळी राज्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी ज्वलंत असलेला विषय आजच्या बोलघेवड्या शिवसेना नेतृत्त्वामुळे हास्यास्पद झाला आहे हा माझा थेट आरोप आहे. मराठ्यांच्या मूक मोर्चाला..
मुका मोर्चा बोलून यांनी अस्मिता दुखावल्या. मात्र माफी मागण्याचे सौजन्य राऊतांनी दाखवले नाही. आणि शिवसेना काय म्हणून मराठी माणसासाठी लढतेय? किती टक्के मराठी माणूस मुंबईत उरलाय? व्यवसाय क्षेत्रात किती मराठी माणसांना बळकटी देण्यात आलीय? वडेवाल्यांची साखळी तयार व्हावी यासाठी प्रयत्न
करण्याऐवजी वर्षानुवर्षे वडापावच्या गाडीवर नाक्यावरची लफडी करण्यासाठी ठेवले. कसल्या मराठी माणसाच्या अस्मितेच्या गप्पा मारताय? आणि ओय पक्षाचे तसेच 'आपल्या मराठी माणसाला बोलतायत आणि हे मराठी भैये त्यांच्या बाजूने बोलतायत' कॅटेगरीवाले कार्यकर्ते जेव्हा शिवसेना पक्षाच्या नांदगावकरांना
आईवरून शिव्या घालण्यात आल्या तेव्हा शेपट्या गाडीत टाकून पळून गेले होतात ना? मराठी माणसाच्या कधी विजलेल्या 'किंबहुना' विझवलेल्या अस्मितेबद्दल बोलायला खूप आहे. नको तिथे 'मराठी कार्ड' वापरणं आता बंद करा. सामान्य माणसाला याचा ** फरक पडत नाही.

४. मराठी कल्लाकर! : कधी नव्हे ते मुंबईच
नाव घेतल्यानंतर ही लोक चेकाळली आहेत ते पाहून 'जागे' तरी झाले याच सुख वाटले. सुबोध भावे, हेमंत ढोमे, किंवा सुमित राघवन असे काही मोजके नट प्रतिक्रियांचा विचार न करता व्यक्त होतात. बाकी बहुतांश मंडळी, आय लव्ह मुंबईच्या पुढे पोहोचलेली नाहीत हेच वास्तव आहे. काहींनी कंगना प्रकरणाचा..
फायदा आपलं नाव किमान चर्चेत यावं यासाठी घेतला हे त्यांचं व्यावहारिक यश म्हणू. यांच्यासाठी तीन ओळी पुरे..

५. राजकारणाची अस्मिता : भिकारचाळे! बस की अजून काय वाचणार? इतकं पुरे नाही का?

तर सविस्तर लिहिताना.. सुशांतसिंह राजपूत केसमुळे अधिक चर्चेत आलेल्या कंगनाला, आता
महाराष्ट्र सरकार आपणहून प्रसिद्धीचं वलय देतंय. मागे सारायला सध्या महाराष्ट्र सरकार उतरलंय. पार गृहमंत्र्यांपासून परिवहन मंत्र्यांपर्यंत.. फक्त पीआरचे आदेश येईपर्यंत पितापुत्रांनी यावर बोलायचे नाहीये. तिच्या ट्विटमुळे आता मुंबई पोलिसांची, मुंबईची, महाराष्ट्राची ताकद ठरणार आहे का?
हे सर्वप्रथम ठरवायला हवं. एकीकडे आपण म्हणतो तिचा बोलवता धनी कोणीतरी वेगळा आहे? जातीय राजकारण सुरु आहे म्हणतो. आणि तिच्याच प्रश्नांना उगीच किंमत देऊन आपल्याच अस्मितांना ठेच पोहोचवतो. राऊत म्हणतात, दुर्लक्ष करू आणि स्वतःच पहिली माती खायला पुढे जातात? नेमकं म्हणायचं काय? आणि यांना
अस्मितेची इतकी पडलीय की काही दिवसांपूर्वी 'केम छो वरळी' यांनी विचारलं होतं. आणि शिवसेनेचा 'इम्पॅक्ट'ची मजा पाहायचीय? खाली फोटोत पहा.. मुंबईकर एडिट करून शिवसेना लिहिलंय. ही यांची भीती.. त्यात 'ये डर होना चाहिये' म्हणून मराठी अस्मिता जपतायत. वा रे वा.. आज निदर्शन करायला घराबाहेर
पडलात पण करिष्मा भोसलेसोबत मानखुर्दला जाऊन उभे राहण्याची ताकद कोणाच्या गाडीत दिसली नाही. आणि अंधभक्तहो, आपल्या त्या बिहारच्या दीडशहाण्याला सांगा. 'मुम्बई में आकर गरदा उड़ा देंगे' वगैरे लाड आपल्या घरी दाखवायचे. बहुदा मराठयांचा अटकेपार प्रवास त्याच्या वाचनात आलेला नाही. एका माणसाला
बोलताना अक्खी कम्युनिटी, शहराला दावणीला बांधण्याचे काम नाही..

यानिमित्ताने आमचे सहकारी महेश विचारे म्हणतात, 'महाराष्ट्र सरकारने कंगनाला सुपरस्टार करायचा चंग बांधला आहे. तिने केलेल्या ट्विट नंतर तर जणू महाराष्ट्रावर संकट कोसळले. संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांपासून ते
शिवाजी महाराजांपर्यंत सगळ्यांना या प्रकरणात ओढले गेले. एवढे अकलेचे दिवाळे निघालेले कधी पाहिले नव्हते. कंगना ट्विट करते आणि अख्खे महाराष्ट्र सरकार रस्त्यावर उतरते? काय ताकद आहे पाहा कंगनाची. आतापर्यंत सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरलेले पाहिले आता सरकार एका अभिनेत्री विरोधात
रस्त्यावर उतरले आहे. कमाल आहे! तिने संजय राऊत यांना आव्हान देत एक ट्विट केले. ते कुणी नीट वाचले का? काय होते त्यात? ती म्हणते 'मुंबईत पाऊल ठेवू नको असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत मला धमकावतात. पाकव्याप्त काश्मीर सारखी स्थिती मुंबईत आली आहे काय?' एका बाजूला म्हणायचे तिला...
कोण विचारतो, मेंटल केस आहे मग अशा व्यक्तीच्या ट्विटला प्रत्युत्तर देऊन 'तू मेंटल तर आम्ही शतपटीने मेंटल' असे म्हणण्याची काय गरज? तुम्ही सरकार आहात हे तरी लक्षात आहे ना? की कार्यकर्ते आहात? मुंबई पोलिसांवर तिला विश्वास नाही ना तर नसेल. कंगनाने विश्वास ठेवला तरच मुंबई पोलीस
विश्वासास पात्र ठरतात का? नाही ना. मग. तरी तुटेपर्यंत ताणायचे. बरे यात मुंबई पोलिसांकडून एकही स्टेटमेंट नाही. मीडिया पण काही झाले की थेट संजय राऊत यांनाच विचारते. कमाल आहे! तो बिचारा पांडुरंग रायकर अँबुलन्स अभावी मरण पावला. किती लोक रस्त्यावर उतरले? कंगना प्रकरणामुळे म्हणे
महाराष्ट्र पेटला. रायकर प्रमाणे अनेक लोक हॉस्पिटल अभावी मृत्युमुखी पडले, तेव्हा नाही तो महाराष्ट्र पेटला? रायकर प्रकरणी मीडियाने जाब विचारला का संजय राऊत याना किंवा सरकारला. आज मात्र महाराष्ट्र माझा, मुंबई माझीच्या नावाने कढ येत आहेत. आपल्या सहकाऱ्यासाठी साधा जाब विचारावासा
वाटत नाही? म्हणे हुतात्म्यांचा अपमान झाला. करोनाचे भयंकर संकट महाराष्ट्रावर आहे. कंगनापेक्षाही भयंकर. कोण त्याच्या कराल दाढेत सापडणार आहे हे कुणीच सांगू शकत नाही. त्याकडे लक्ष द्या. कंगनाला चार शिव्या दिल्यामुळे करोना विचलित होणार नाही. मुंबई, महाराष्ट्राचा अपमान होण्याएवढी
कंगना मोठी आहे का याचा विचार करा जरा. संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना जर खरोखरच श्रद्धांजली वाहायची असेल ना तर एवढे कराच!..'
-----------
निष्कर्ष काय?
आणखी काही दिवस ट्रोलिंग सुरु राहील. धुरळा खाली बसेल. यामुळे तिला किती फरक पडेल ही गोष्ट निराळी. पण इथे आम्ही दरवेळी सर्व..
कामधंदे बाजूला ठेऊन हॅशटॅग ट्रेंड करणं ही आमचीच जबाबदारी आहे असं मानून ट्विटर दणाणून सोडू. हा यामुळे १०-१२ फॉलोवर तितके पदरात पडून घेऊ.. कदाचित कंगनाला बीजेपीच तिकीट मिळेल. संजय राऊतांना भावासाठी पद मिळेल. कार्यकर्ते सोशल मीडियावर ट्रेंड करणारे क्रांतिकारकच राहतील. घे रे..
पुढचा ट्रेंड.. हीच एकजूट हेच प्रेम मराठी माणसाच्या मुंबईत थांबण्यासाठी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी करायची म्हटले की ९० टक्के सोशल मीडिया क्रांतिकारकांच्या चड्ड्या पिवळ्या पडतील. तिथे नाही रीट्विटची बरसात होणार..
(दुर्दैवाने अनेक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास..
करणारी पोरं/पोरी इथे काही जणांच्या नादाला लागून, उगीच 'इन्स्पायर' होऊन राजकीय ट्रेंड करण्यासाठी पुढे असतात हे पाहून मनस्वी दुःख होतं. जे करून घेतात ते मात्र कोपऱ्यात बसून अशांची मजा बघत असतात. त्यांचा राजकीय हेतू साध्य होतो हे या मुलांच्या ध्यानी येतच नाही. खरंतर आपला..
हेतुपुरस्पर वापर करून घेतला जात आहे, हे न कळणं म्हणजेच स्पर्धा परीक्षा अपयश निश्चित करणे)

अस्मिता इतक्या निर्लज्ज, बिनकामाच्या करू नका.. इतकीच विनंती. राजकारणी त्यांचे होत साधतील. आपला विकास आपल्याच हातानी साधायचा आहे.. अशावेळी स्वतःला ऊर्जा देण्यासाठी 'अस्मिता' धगधगत्या
आगीप्रमाणे मनात ठिणगी पाडणारी हवी. त्यासाठी ट्रेंडमध्ये 'उगीच' तो करतोय म्हणून सहभागी होऊन आहे ती अस्मिता बोथट करू नका.
आणखी काय बोलावे, योग्य ते जाणिजे
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with प्रथमेश सुभाष राणे.

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!