जिओ और जिने दो..

जगासाठी यंदाचं वर्ष मृतकाय असेलही.. पण मुकेशसाठी नाही. कारण त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज ली. (RIL) ने मिळवलेली गुंतवणूक.
जानेवारी 2020 मध्ये सरकारी मालकीच्या 83 PSU चं मिळून मार्केट कॅपिटलायझेशन (m-cap) होतं ₹ 19.3 लाख कोटी . #म #धागा 👇
आणि अंबानींच्या RIL चं m-cap त्यावेळी होतं.. ₹ 9.6 लाख कोटी. कालच्या मंगळवारी सरकारी कंपन्यांचं मिळून भाग भांडवल होतं.. ₹ 15.16 लाख कोटी आणि RIL चं भाग भांडवल होतं..₹ 15.30 लाख कोटी. सरकारची सर्वात मोठी फर्म SBI चं m-cap आहे ₹1.79 लाख कोटी. 👇
गेल्या सहा एक महिन्यात RIL ने कशाप्रकारे गुंतवणूक मिळवली.. कंपनीची स्थिती स्टॉक मार्केट मध्ये कशी मजबूत होत गेली आपण पाहिलेलं आहे. जवळपास $ 33 बिलियन एवढा इक्विटी कॅपिटल उभं केलं गेलं..त्याने कंपनीचं एकूण कॅपिटल हे $207 बिलियन एवढं काल नोंदलं गेलं.👇
या सगळ्यात अंबानींची संपत्ती झालीय $88.4 बिलियन..जगातील सहावे श्रीमंत मानव आहेत ते.संपत्ती निर्मिती व्हायला हवी..पण तिचं एकात्मिकरण व्हायला नको..समान वाटप व्हायला हवं.. नाहीतर मग मक्तेदारी तयार होते. जो कोणी मक्ता घेईल त्याचंच सगळ्यांना ऐकावं लागतं..मग ते बरोबर असो की चूक.. 👇
एक म्हण आहे 'जिओ और जिने दो.' त्यातील 'जिओ' तर जनतेने फुकट होतं म्हणून आपलंसं केलं.. आता 'जिने दो' ला कसं भिडायचं एवढाच प्रश्न शिल्लक आहे.. येत्या काळात ते ही कळेल.❤

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with डेडपूल...

डेडपूल... Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MarathiDeadpool

27 Sep
भारतात लोकशाही आहे का?

या अगोदर लोकशाही संबंधित मला तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक मुलाखत इथं दाखवायची आहे.
22 जून 1953 रोजी BBC चे जेष्ठ पत्रकार एडन क्रॉली यांनी पाचेक मिनिटं घेतलेली ही मुलाखत.
माझं आवाहन आहे..तुम्ही ही मुलाखत वाचावी आणि पुढे वाचण्यास द्यावी.🙏 #म 1/n
एडन क्रॉली : डॉ. आंबेडकर, भारतात लोकशाही काम करेल असं वाटतं का?

डॉ. आंबेडकर : नाही ती फक्त नावापुरती असेल. म्हणजे लोकशाहीचा लवाजमा, पंचवार्षकि निवडणुका, पंतप्रधान इत्यादी. 2/n
एडन क्रॉली : तुम्हाला निवडणुका महत्त्वाच्या वाटतात काय?

डॉ. आंबेडकर : नाही. या प्रक्रियेतून चांगले लोक तयार होत नसतील तर निवडणुका महत्त्वाच्या नाहीत. 3/n
Read 18 tweets
26 Sep
डॉ.मनमोहन सिंग.

पाकिस्तान फाळणीच्या धगीने तावूनसुलाखून निघालेलं बालपण...त्यातून आलेली जिद्द,चिकाटी,सचोटी. त्याजोरावर पुढे शिक्षण.. प्रशासकीय अधिकारी ते सर्वोच्च पदावर मांड ठोकली..तरीही जनतेने त्यांना 2014 साली नाकारले..ते का? याचा जुजबी उहापोह.. #म 1/n
पंतप्रधान म्हणून डॉक्टरांना कारकिर्दीच्या शेवटी उद्विग्नपणे 'इतिहास माझी योग्य दखल घेईल.' अस त्यांना म्हणावं लागलं..इतकं आपण त्यांना टॉर्चर केलं अस म्हणण्यास वाव आहे.तत्कालीन विरोधकांच्या 'स्वच्छ प्रतिमेस निच आणि मलिन प्रतिमेस सर्वोत्तम' दाखवण्यामुळे हे झालं हाही एक पदर आहेच. 2/n
या अगोदर काहीतरी मांडतोय मी..
2004 साली सगळ्यांना सुखद धक्का देताना काँग्रेसने MMS ना पंतप्रधान पदी आरूढ केलं..वास्तविक त्यांना पंतप्रधान करण्यासाठी जनतेनं काँग्रेसला मत दिलं न्हवतं..पण 2009 साली मात्र जनतेनं MMS साठी मतदान केलं असं म्हणता येईल. 3/n
Read 17 tweets
25 Sep
व्यक्त होण्यातील अभिजातता विसरत चाललोय आपण..सुज्ञांनी हा क्षय रोखायला हवा..विरोधी विचारांचा योग्य मान सन्मान व्हायला हवा..त्यासाठी प्रत्येक विषयाचा अभ्यास हवा..त्यानंतरच मत प्रदर्शन करायला हवं..उथळ टिंगल टवाळीयुक्त व्यक्त होण्याने आपण अंतिमतः समाजाचं नुकसान करत असतो. #म 1/n
एखाद्याचे काही विचार आपल्याला न पटल्यास त्या विचारास मोडीत काढायला हवं..पण आपण ते न करता त्या विचार मांडणाऱ्यास टिंगल कम् ट्रोल करतो.. हे जरी तो विचार योग्य असला तरी घडते आहे.. याची प्रचिती समाजमाध्यमातून वारंवार येत आहे.. 2/n
स्त्रियांचा आणि पुरुषांचा आदर राखायला हवा.. हे अतीव गरजेचं आहे.. सध्या फक्त स्त्री-आदराखाली या समस्येचा लंबक आपण एकदम दुसऱ्या टोकाला नेला आहे..समाजमाध्यमात सध्या आमच्यासारख्या युथ चे बहुमत आहे.. उसळत्या रक्ताचे वय असल्याने विवेकास तिलांजली देण्याचे पातक युथ कडून घडते आहे. 3/n
Read 9 tweets
24 Sep
एक एकसंध समाज म्हणून असलेली ताकद आणि प्रगल्भता आपण गमावून बसलोय.. 'Divide and Rule' हा खेळ आपल्यावर खेळला गेलाय..आणि समाज त्यात हरला. मग त्यास धर्म,जात,वेश,उदरनिर्वाहाचे साधन,आर्थिक परिस्थिती,लिंग, वय असे अनेक पदर आहेत. #म 1/n
मी काल म्हणलं तसं.. नोटबंदीचा फायदा मला नाही झाला तरी चालेल पण या श्रीमंतांचा माज उतरायला हवा..अशी विचारपद्धती बळ धरू लागली त्यासाठी 'सूड' हे नाट्य वेळोवेळी रंगवलं गेलं.. गरिबांसाठी नोटबंदी हा श्रीमंतांवरील सूड आहे असं चित्र रंगवलं गेलं..पठाणकोट, उरी ही उदाहरणे.. 2/n
मॅगी अजिनोमोटो प्रकरणात परदेशी कंपन्यांवर आपल्याला सूड उगवायचा आहे ही मानसिकता रुजवली गेली.. 'आपलं घर' या विषयी ममत्व असणाऱ्या जनतेत स्वदेशी विषयी तर ममत्वाचा लोंढाच आला..त्यातून फायदा नेमका या फूट पाडणार्यांनी उठवला ही वस्तुस्थिती आहे.. 3/n
Read 13 tweets
23 Sep
हेदवी आणि वेळणेश्वर किनारा...

काही ठिकाणं अशी असतात.. तिथं गेलं की काळाच्या उदरात दाबून ठेवलेल्या आठवणींच्या जखमा ठसठसू लागतात. त्या जखमेवरील वाळत आलेली विसराळूपणाची खपली निघून जाते..मग वाहती जखम त्याच आठवणींच्या रक्ताने माखून जीव नकोसा करते. #म #धागा 👇 Image
हेदवी आणि वेळणेश्वर किनारा.. अतीव सूंदर.. स्वच्छ..तुलनेने कमी गर्दीचा किनारा.. नजर टिकेपर्यंत खोलवर पहुडलेला अरबी. त्यावरून येणारी वाऱ्याची प्रत्येक शाखा नसानसात शिरून नसा टच्च फुगवून टाकते.👇
इथं जवळच गणेश मंदिर आहे.. भाविक मनोभावे प्रार्थना करताना पहाणे हा माझा आवडता छंद. तो अशा दूरवरच्या प्रार्थनास्थळी हमखास उफाळून येतो. नमस्कार करताना भक्तांच्या चेहऱ्यावरील निरागसता पिता यायला हवी. मनःशांती मिळते त्याने. मंदिराच्या सभा मंडपात बसून हे करायचं असतं.👇
Read 7 tweets
22 Sep
कट्टरता..

ती जीवनात असो की खेळात त्यामुळे जी नामुष्की येते ती सध्या #CSK चे पंखे अनुभवत असणार.. खेळ कोणताही असो तो खेळणारे आणि त्यांचे चाहते यांच्या अंगी एक खिलाडूवृत्ती असावी लागते..तिचा अभाव असला की खेळ खेळणारे देव होतात आणि त्यांचे चाहते भक्त. #म #धागा 👇 Image
वास्तविक कोणी कोणाचा भक्त व्हावं हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न.. पण माझ्यासाठी जो देव आहे तो इतरांसाठीही देवच असायला हवा ही कट्टरता आत्मघातकी असते.. CSK च्या भक्तांकडे बघून ती कट्टरता उतू जात असल्याची सल अखंड भारताने गेले दशकभर अनुभवली.👇
इतर संघांवर, त्यांच्या मालकांवर आणि खेळाडूंवर नको नको ते आरोप करताना आपला संघ दोनेक वर्ष या IPL नामक कुंभमेळ्यास का मुकला होता? हा नैतिक प्रश्न ते स्वतःस कधीही विचारताना दिसत नाहीत..कारण त्यांच्या नैतिकतेच्या व्याख्येत ते बसत नाही. 👇
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!