माझा एक वर्गमित्र जगप्रसिद्ध जनरेटर बनविणाऱ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट आहे,आम्ही दोघे काॅलेजपासूनचे चांगले मित्र.
मुंबईत काही वर्ष रुममेट म्हणून एकत्र राहिलो,तो सुरूवातीपासून एकाच कंपनीत,प्रचंड मेहनती,अत्यंत हुशार अन प्रामाणिक त्यामुळे कंपनीने त्याला
भरभरून दिलेय, तो मुंबई,दिल्ली,बंगलोर करत पुन्हा मुंबईतच स्थायिक झाला.
आज तो त्याच्या क्षेत्रात कमी वयातही उत्तम काम करतोय आणि बक्कळ पैसेही कमावतोय.
त्याचे त्रिकोनी कुटूंब, मुलगी, बायको आणि तो, बायको एका बॅंकेत चांगल्या ऊच्च पदावर, दोघांचे मिळून वर्षाला आठ आकडी ऊत्पन्न..2/14 #म
दहा-बारा वर्षांपूर्वीच त्याने मुंबईत तीन बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला होता, तो ही सुखवस्तू भागात आणि आता परत आल्यावर तो तिथेच राहत आहे.
दोन वर्षांपूर्वी तो मुंबईत आला तेंव्हा त्याला कंपनीतील सर्व सहकारी, मित्र, शेजारी नातेवाईक SUV किंवा जर्मन सेडान कार घ्यायचा हट्ट करत होते 3/14
त्याच्या बिल्डिंग,ॲाफिसमधे,सर्वांकडेच मोठ्या गाड्या होत्या,अगदी त्याची मुलगीही त्याच्या मागे होती.
एक दिवस आम्ही जेवायला दादरला जिप्सीत भेटलो तेंव्हा त्याने हा विषय माझ्याकडे काढला आणि म्हणाला- “अरे,आमच्या कंपनीत हल्ली प्रत्येकजण मोठी कार आणि पेंट हाऊसच्या मागे लागलेत,मी पण 4/14
Confuse झालोय, काय करावे सुचत नाही”
त्याच्याकडे आधीपासून एक खाजगी कार आहे...आणि कंपनीने ही त्याला एक चांगली सेडान गाडी दिलेलीच आहे.
त्यामुळे मी त्याला म्हटले-
“हे पहा, तुला तशी विकेंडसाठीच या कारची गरज लागेल आणि दुसरे म्हणजे स्टेटस सिंबल...बाकी तुझे आर्थिक गणित जर जुळत असेल 5/14
मनाला खरच पटत असेल, गरजही असेल तर तुझा तू निर्णय घे.”
त्यानंतर आठवडाभरात त्याचा फोन आला कि मी गाडी घेत नाही,पुढे काही वर्षांनी विचार करतो, तुर्तास मुलीच्या शिक्षणासाठी ते पैसे ठेवतोय, काही म्युचुअल फंड आणि उरलेले FD करतोय म्हणाला.
गेल्या डिंसेबरमधे (2019) त्याच्या पत्नीने 6/14
मुलीच्या शिक्षणासाठी नोकरीतून ब्रेक घेतला, अगदी आनंदाने....
कारण तशा त्यांच्या Liabilities काही नव्हत्याच. बऱ्यापैकी पैसे असल्याने ती घरूनच शेअर मार्केटचे ही काम पाहते आणि तिघेही आनंदात राहताहेत.
आज जेंव्हा सहा महिन्यापूर्वी आलेल्या कोविडने अर्थव्यवस्थेचे बारा वाजवलेत, 7/14
बऱ्याच जणांच्या नोकरीवर गदा आलीये,
तेंव्हा मला त्या मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीय लोकांची अवस्था पाहवत नाही...
बरेच जण Depression मधे गेलेत, काहींचे घटस्फोटाचे अर्ज तयार झालेत, काहींच्या अचानक नोकऱ्या गेल्यामुळे, व्यवसाय पुर्ण बंद झाल्यामुळे या स्टेट्स सिंबाॅल जपण्याच्या 8/14
नादात उडालेली भांबेरी,त्रेधातिरपिट स्पष्ट जाणवते.
माझा मित्र वहिनींची नोकरी नाही तरी पुर्णत: तणावमुक्त आहे...
कंपनीशी अत्यंत चांगले संबंध (ऋणानुबंधच म्हणा) असल्याने कसलेही टेंशन नाही...वर कंपनीच त्याला जपतेय, ते ही अत्यंत प्रेमाने, कोणतीही आर्थिक बंधन किंवा ताणतणाव नाहीत!! 9/14
परवा त्याला सहजच फोन केला होता, दोघांनीही निवांत गप्पा मारल्या, अगदी मनमुराद.....
त्याच्याशी बोलल्यावर पुन्हा #आर्थिकसाक्षरता या विषयाची आपल्या देशाला किती नितांत गरज आहे ते पुन्हा जाणवले.
आर्थिक साक्षरता म्हणजे Needs Vs Wants ची खरी लढाई आहे. 10/14
आपल्या गरजेचे (Needs) चे मूल्यांकन आपण स्वत:च करणे खुप महत्वाचे आहे ..
मित्र, शेजारी , सहकारी , नातेवाईक यांच्यापुढच्या दिखाव्याने, Comparison मुळे किंवा प्रतिष्ठेच्या हव्यासापायी कोणीच आर्थिक अडचणीत सापडू नये आणि हे पुर्णपणे आपल्या स्वत:च्या हाती असते.
11/14
#Covid_19 has taught us how simple life can be and how much less we actually need on all fronts...
Just calculate on how much expenses you did in last 6 months on your saloon, gadgets, cars, cloths, shoes, gifts, movies, travel, fuel, hoteling & all other fancy stuff..
12/14
आजही आपल्याकडे अनेक आर्थिक व्यवहार भावनेच्या आहारी जावून (मुलाबाळांच्या इच्छेखातर) प्रसिद्धीपोटी, खोट्या प्रतिष्ठेसाठी किंवा फक्त ब्रॅंड पाहून होतात.
या #कोविड महामारीतून आपण निदान हा आर्थिक साक्षरतेचा धडा तर घेतलाच पाहीजे.
Need Vs Wants ची लढाई विचारपुर्वक करायची.
13/14
सर्वात महत्वाचे -
“आनंद वस्तूत न शोधता तो आपल्या मनात आणि आपल्या कुटूंबात शोधायचा, जीवन सुखी होईल.”
गेले तीन दिवस महाराष्ट्राच्या वार्षिक आर्थिक पाहणी अहवालावर “सालाबाद” प्रमाणे चर्चा सुरूये.
त्यातील आकडेवारी, दरडोई उत्पन्न, एकूण कर्ज, इंफ्रास्ट्रक्चर, उर्जा, शिक्षण, इतर राज्यांशी तुलना, मॅन्यूफॅक्चरिंग-सर्व्हिस इंडस्ट्री, शेती या आणि अशा
#SaturdayThread #EconomicSurvey
१/७
अनेक महत्वाच्या मुद्यांवर “विचारांच्या धारेनुसार” मत व्यक्त केली जाताहेत.
यात एक चांगली आणि सकारात्मक बाब म्हणजे वर्ल्ड “हॅपीनेस इंडेक्स” किंवा “भूकेल्या देशांची यादी” ही जशी खोटी वा बदनामीसाठीच बनवलीये असा जो नेहमीचा सूर उमटतो तसा न उमटता “जे आहे, जसे आहे तसे” या तत्वावर सर्वांनीच ही आकडेवारी स्विकारलेली दिसतेय.
त्यातील प्रत्येकाला नक्की काय बरोबर किंवा काय चूक हे ठरवायचा वैयक्तिक अधिकार आहे आणि तोच लोकशाहीचा गाभा आहे अस मानून आपण पुढे जावूया.
आता या आकडेवारीतून अनेक गोष्टी स्पष्ट दिसताहेत, बरं त्या बऱ्यापैकी ट्रांसपरंटली ठेवल्यात त्यामुळे जो कोणी हा रिपोर्ट मेंदू वापरून वाचेल त्याला वर्तमान अगदी सहज कळेल.
परंतू अशा रिपोर्ट्समधून त्या आकडेवारीपलिकडे विचार करता यायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. - “जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत.”
वर्तमान आकडेवारीतून इतिहासातून झालेले बदल आपल्याला भविष्याची दिशा दाखवतात. आपल्याला फक्त त्याची नीट सांगड घालता यायला हवी.
२/७
उदाहरणादाखल आपण या रिपोर्टमधला हा एक मुद्दा पाहू -
साल १९६० मधे संपुर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या होती ३ कोटी ९५ लाख.
त्यात ग्रामिण भागात राहणारे तब्बल २ कोटी ८३ लाख आणि शहरी भागात फक्त १ कोटी ११ लाख.
आता हेच आकडे २०२३ मधे कसे आहेत पहा - महाराष्ट्राची लोकसंख्या झालीये तब्बल ११ कोटी १२ लाख.
आणि त्यात ग्रामिण भागात राहणारे ६ कोटी १५ लाख आणि शहरी भागात तब्बल ५ कोटी ८ हजार.
ही आकडेवारी फार महत्वाची आहे.
हे असं फक्त महाराष्ट्रातच घडलय का?
तर नाही. थोडंफार गुगल केलं तरी कळेल की जगभरात सगळीकडेच हा ट्रेंड आहे. आणि या प्रकारालाच “अर्बनायझेशन” असं म्हणतात.
मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात हजारो लाखो वर्षात जे घडलं नाही ते औद्योगिक क्रांतीनंतर घडलंय. सोळाव्या-सतराव्या शतकात केवळ ५% आसपास असलेलं शहरीकरणाच प्रमाण आता कसलं बदललय पहा. लोकांचा ओढा हा असाच शहरांकडे वाढत जाणार आहे. जगभरात प्रचंड मोठ्या मेगा सिटीज तयार होत जाणार आहेत.
गेल्या शतकानुशतकांपासून चालत आलेला गावगाडा आता हळूहळू मागे पडलाय.
लोकसंख्यावाढीने शेतीचे पडलेले तुकडे, शेतीमालाला नसलेला भाव, (अनिश्चितता) ग्रामिण भागातली भयान बेरोजगारी, जातीवाद, भाऊबंदकी तसेच शिक्षणाचे वाढलेले प्रमाण यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकं शहरांकडे वळलेत, नव्हे तर इकडे रूळलेतही. कित्येक जणं तर परदेशातील विविध शहरांत जावून स्थायिक झालेत.
शहरात असलेल्या शैक्षणिक सुविधा, आरोग्यसुविधा, कामधंदे, रस्ते, वीज, पाणी, रोजगार, त्यातल्या त्यात शेतीच्या तुलनेत असलेली स्थिरता आणि सर्वात महत्वाचं पैसे हे सर्वांनाच खुणावतात.
आपल्या स्वप्नांवर कुत्सितपणे हसणाऱ्यांना कधीही उत्तरं द्यायचं नसतं……आपल्या समाजाचा खूप मोठा हिस्सा अशा लहान लहान लोकांनीच भरलेला आहे.
हे वाक्य लहानपणापासून प्रचंड अवहेलना वाट्याला तमाशात काम करणाऱ्या वडीलांच्या मुलाचे आहे. तो एका मल्टीनॅशनल कंपनीत मलेशियात कंट्री हेड आहे.
कोण कोणाच्या पोटी जन्म घेतो. त्याचे आईवडील काय करतात? त्याची जात कोणती? धर्म कोणता? भाषा? रंग ? किंवा प्रांत यात कशातच कोणाला जन्माच्या आधी चॉइस नसतो. मग जी गोष्टीत आपले काहीच कर्तृत्व नाही त्याचा फुकाचा अभिमान बाळगून काय हशील?
आपापल्या कर्तृत्वाच्या जोरावर जो तो पुढे जातोच. एखाद्याच्या स्वप्नपुर्तीसाठी आपण हातभार लावत नसू तर निदान हे कुत्सितपणे हसणं किमान एकविसाव्या शतकात तरी थांबायला हवं.
काळ बदलला आहे. इंटरनेट आणि जगाच्या स्पर्धेत आपल्या माणसांनी आता १८ व्या, १९ व्या, २० व्या शतकातून बाहेर पडून
आपल्याकडे इंडस्ट्री आल्या, शहरीकरण वाढले,पायाभूत सोईसुविधांसाठी सरकारकडून जमिनींचे अधिग्रहन झाले.
खाजगी उद्योगासाठी,बिल्डींग्जसाठी जमिनींचे व्यवहार झाले.अनेकांकडे अचानक खूप पैसे आले.
काहींनी तो पैसा जपला परंतू बरीच मंडळी तो पचवू शकली नाहीत
#आर्थिकसाक्षरता #SaturdayThread १/१४
त्यातच इंटरनेटमुळे जागतिकीकरणास अधिक गती मिळाली.
काही मंडळी चांगली शिकली. काहींना सरकारी/खाजगी नोकऱ्या लागल्या.
चांगले पगार मिळायला लागले.
काहींनी उद्योग व्यवसायातून पैसा उभारला. बहुतांश लोकांनी आपापल्या बौद्धीक व सामुहीक परंपरेनुसार तो पैसा जसा वापरता येईल तसा वापरला,
२/१४
काहींनी तो गुंतवला.
ते करत असताना मात्र यातल्या अधिकाधिक लोकांनी तो रिअल इस्टेट, गाड्या,टोलेजंग घरं, ब्रॅंडेड वस्तू,गॅझेट्स, लग्न समारंभ, खाणपिणं, राजकारण किंवा एकमेंकांच्या द्वेष व मत्सरापोटी खर्च केला.
यातले बहुतांश फार लवकरच कफल्लक झाले किंवा पहिल्यापेक्षा अधिक गरिबीत
३/१४