छत्रपती शिवाजी महाराजांची व कवी भूषण यांची भेट रायगडावर झाली. ते कवी आहे हे महाराजांना समजले,त्यांनी म्हटलं, आपण कवी आहात? मला आपलं एखादं काव्य ऐकता येईल का?
कवी भुषणांनी म्हटलं हे राजन,
इंद जिमि जृंभपर। बाढब सअंबपर ।।
रावण सदंभपर। रघुकुलराज है ।।
पवन बारिबाहपर। संभू रतिनाहपर ।।
जो सहसबाहपर। रामद्विजराज है ।।
दावा दुमदंडपर। चीता मृग झंडपर ।।
भूषण वितुंडपर। जैसे मृगराज है ।।
तेज तम अंशपर। कन्नजिमि कंसपर ।।
जो म्लेंछ वंशपर। शेर शिवराज है ।।
राजा प्रभूरामचंद्र चालून गेले होते,
वारा जसा पाण्याने भरलेल्या ढगांवर,
शंकर जसा रतीचा पती मदनावर,
सहत्र क्षत्रियांवर जसा परशुराम चालून गेले होते,
आकाशातली विज जशी लाकडी बुंध्यावर,
चित्ता जसा हरणांच्या कळपावर,
सिंह(मृगराज) जसा हत्तीवर,
प्रकाशाचा किरण जसा अंधार कापतो,
कृष्ण जसा कंसावर,
तसेच शेर शिवराज म्लेंच्छ वंशावर चाल करून गेले आहेत.
#English_Translation:
Like lord Indra against the demons,
Like underwater volcanic fire over the ocean
Like lord Ram of the raghus clan against boastful ravana,
As strong wind scatters the clouds of rain
As lord Siva destroyed rati’s husband(kaamdev),
and Like parsurama destroyed sahastraarjuna -
Like fire which burns woods,
and a Cheetha on herd of deer ,
Like lion on hogs,
so says Bhushan.
Like a ray of light in darkness,
Like boy Krishna upon kansa,
So has descended king
Shivaji ,the Tiger.
upon the clan of mlecchas(barbarians)
कवी भुषणांचे हे अप्रतिम काव्य ऐकून महाराजांना आनंद झाला, त्यांनी या पाहुण्याचा आदर करून गडावर ठेवून घेतले. या काळात (म्हणजे सुमारे अडीच वर्ष) कवी भूषणांनी महाराजांच्या जीवनातील अनेक घटनांचा अन् विशेषत: युद्धप्रसंगांचा वेध
घेतला, हे निश्चित आणि त्यांनी महाराजांच्या जीवनावर काव्यरचना करावयास प्रारंभच केला.
शिवबावनी हा ग्रंथ त्याच पुस्तकातील एक भाग आहे असे समजतात. हिंदी साहित्यात चंद्रकृत पृथ्वीराज रासा या ग्रंथाच्या तोडीची मान्यता शिवराजभूषणास आहे.
#संदर्भ: श्री शिवबावनी, जेष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब.
सध्या एक नविन ऑनलाइन फ़्रॉड सुरु झालाय तरी कृपया सर्वांनी काळजी घ्यावी
तुम्ही २०१२/२०१३ मध्ये एक पॅालिसी काढली होती आणि तिचा प्रीमीयम १ वर्षच भरला आणि त्याची आता इतकी अमाऊंट झाली आहे पण ते पैसे काढण्यासाठी तुम्हाला दुसरया एका पॅालिसीचे २ वर्षाचे प्रीमीयम भरावे लागतील तरच ही
पॉलिसी स्विच होईल आणि पुढे ४/५ महिन्यांनी तुम्हाला पुर्ण पैसे काढतां येतील असे सांगुन तुमच्या गळ्यात वार्षिक ६०/६५ हजार प्रीमीयम असलेली पॉलिसी १०/१२ वर्षासाठी गळ्यात मारली जात आहे. आणि अगदी पद्धतशीर वेल इंग्लिश आणि हिंदी स्पीकिंग असणारी एकदम सोफ़िस्टिकेटेड मॅनर असणारी टिम हे सगळे
करत आहे तर कृपया असा फोन आल्यास त्यांनी दिलेला जुना पॅालिसी नंबर हा त्या इन्शुरन्स कंपनी च्या कस्टमर केअरशी बोलुन किंवा त्यांचे ॲाफिसला जाऊन चेक करावा कि ती पॅालिसी खरंच तुमची आहे का दुसरया कोणाचे नावावर आहे, तसेच त्यांना तुम्हाला भेटण्यास समक्ष बोलवा एक तर अशी कुठलिही पॉलिसी
पाऊस पिकू देईना,आणि आरक्षण शिकू देईना अशी गत आमची झाली असतांना सर्व पक्ष आरक्षणाला पाठिंबा देता आहे
सगळेच नेते म्हणतात आम्ही आरक्षणचे सोबत.सरकार म्हणत मागच्या सरकारनं आरक्षण अभ्यास करूनच दिलेलं नाहीये मागचं सरकार म्हणतंय याच सरकारला द्यायचं नाही.जाणकारांचे म्हणंणं आहे हे
न्यायालय
ठरवील.न्यायालय म्हणत ते सरकारच्या हातांत.अरे बाबांनो नक्की चाललय तरी काय.आणि पाठिंबा ही त्यांचा हा वरील फोटो सारखा आहे. माझी आज्जी मला सांगायची लबाडच आवतन जेवल्यावर खरं.समाजाची चेष्टा करण्याचं काम ही व्यवस्था करतेय.बांधवांनो विचार करा हम लाखोंसे आये थे,हमने हजारो मोर्चे निकाले थे
तरी पण आम्हाला न्याय नाही मिळाला.
आमचा समाज लढवय्या आहे शूर आहे, हे इथल्याच व्यवस्थेच्या खुपच डोळ्यात खुपतय. आगीचा सूड घेणारा हा मराठा नाहीये तर आगीशी खेळून तिला हळुवार हाताळणारा मराठा आहे, शिवरायांचाच इतिहास,शंभुराजेंची शौर्यगाथा,जिजाऊं
मॅांसाहेबांची प्रेरणा असलेला हा मराठा समाज
शिंडलर्स लिस्ट चित्रपटात एक जर्मन व्यावसायिक नाझी सैनिकांच्या मदतीने यहुदी लोकांना आपल्या कारखान्यात काम करायला ठेवून अफाट संपत्ती कमवतो. पण जसाजसा जर्मन नाझींचा अत्याचार वाढायला सुरू होतो त्याच संवेदनशील मन परिवर्तीत होत व तो आपली सर्व
संपत्ती जर्मन सैनिकांना लाच देऊन आपल्या कारखान्यातील 1100 लोकांचा जीव वाचवितो.जेंव्हा युद्ध संपत तेंव्हा शेवटी एक प्रसंग आहे शिंडलर आपल्या सहाय्यकाला जी भुमिका बेन किंग्जले यांनी केली आहे(गांधी चित्रपटात महात्मा गांधींची भुमिका केली आहे) म्हणतो की मी आणखी काही माणसे नाझींच्या
मृत्युसापळ्यातून वाचवू शकलो असतो. त्याचा सहाय्यक त्याला म्हणतो की तुम्ही अकराशे माणसे वाचवली आहेत, अकराशे लोकांचे जीवन मृत्यूच्या दाढेत जाण्यापासून वाचवले आहे. पण शिंडलर त्याला म्हणतो,माझी ही कार दिली असती तर दहा माणसे वाचू शकली असती, कशासाठी ही कार मी ठेवली,काय उपयोग त्या कारचा.
*काकूंचा १८०० रुपयांचा समज आणि आपली झाकली मूठ सव्वा लाखाची*
काल परवा सगळीकडे व्हायरल झालेला काकू आणि त्यांचा १८०० चा हिशेब चा व्हिडिओ त्यावर बनलेले जोक्स पाहिले तर काकू वर हसणे सोपे आहे पण त्यापैकी ५०% लोकांनी स्वतःला आरश्यात पाहिले तर लक्षात येईल...आज जे काकू ना समजत नाही आहे
ते आपल्याला समजते म्हणजे आपण शिक्षित आहे असा समज करून ट्रोल करणे सोपे आहे पण आपल्यातील ही ५०% लोक अजून आर्थिकदृष्ट्या अशिक्षित आहेत. ज्या पद्धतीने १८०० रुपये म्हणजे किती हे समजून घेताना किंवा समजून घेण्यात काकूंची तारांबळ उडते तशीच काहीशी परिस्थिती ५०-६०% लोकांची आहे ....
१.बचत
आणि गुंतवणूक यातील फरक ५०% लोकांना सांगता येत नाही.
२.स्वतःच्या फॅमिली चा महिन्याचा खर्च किती हे ७०% लोकांना सांगता येत नाही.
३.वयाची ४० उलटली तरी अजून टर्म इन्शुरन्स म्हणजे काय माहीत नाही.
४.हेल्थ इन्शुरन्स वरील खर्च म्हणजे काहीजणांना वायफळ खर्च वाटतो.
मी म्हटले, _"अरे उद्या फ्रेंडशिप डे. तुझे प्लॅन्स असतील मित्रांबरोबर..."_
_"ह्या..!! ते संध्याकाळी. आपण सकाळी जाऊन येऊ"_ बंड्याकडे उत्तर तयार असतेच.
_"ओके!!!"_ मीही तयार होतोच.
नाहीतरी बरेच दिवस त्याचे ते वृद्धाश्रम बघायची इच्छा होतीच. संधी मिळतेय तर जाऊच.
सकाळी लवकर उठून बंड्याबरोबर निघालो. वाटेत बंड्याने चिवडा, मिठाई, पत्ते, असे बरेच काही घेतले. आत शिरताच बंड्याला पाहून तिथली मंडळी खुश झाली. _"हाय हिरो!!... हाय चिकण्या!!!"_ अश्या हाक सुरू झाल्या....
सगळी वृद्ध आजी आजोबा आपले वय विसरून बंड्याला हाका मारीत होते. बंड्याही त्यांच्याशी हसत उत्तरे देत होता. हातातील सर्व वस्तू ऑफिसमध्ये जमा करून फक्त एक छोटा मिठाईचा बॉक्स हातात घेऊन कोपऱ्यातल्या खोलीत शिरला.
त्या खोलीत व्हीलचेअरवर एक वृद्धा बसली होती .पंच्याहत्तर वय असेल तिचे पण